नैरोबी (केनिया) Highest Total in T20I : T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वोच्च धावसंख्येचा नवा विक्रम रचला गेला आहे आणि हे काम भारत, ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंडसारख्या मोठ्या संघांनी केलेलं नाही. काही दिवसांपूर्वी भारतीय संघानं 297 धावा करून हा विक्रम करण्याच्या जवळ होता. मात्र 11 दिवसांनंतर अखेर हा विक्रम झिम्बाब्वेच्या नावावर झाला आहे. झिम्बाब्वेनं हा विक्रम केला आहे. सिकंदर रझाच्या नेतृत्वाखालील झिम्बाब्वे क्रिकेट संघानं गॅम्बियाविरुद्ध 20 षटकात तब्बल 344 धावा करत नवा विश्वविक्रम केला आहे. यापूर्वी हा विक्रम नेपाळच्या नावावर होता, त्यांनी मंगोलियाविरुद्ध 314 धावा केल्या होत्या.
सध्या केनियाची राजधानी नैरोबी डथं पुरुष T20 विश्वचषक स्पर्धेतील आफ्रिका उप-प्रदेशातील पात्रता सामने खेळली जात आहे. या क्वालिफायर स्पर्धेत झिम्बाब्वे आणि गांबिया बुधवार 23 ऑक्टोबर रोजी आमनेसामने आले. आता गांबियासारखा अननुभवी संघ झिम्बाब्वेसमोर टिकू शकणार नाही आणि झिम्बाब्वे सहज जिंकेल हे आधीच जवळपास निश्चित झालं होतं पण मैदानावर जे घडले ते अजिबात अपेक्षित नव्हतं.