महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

का रे दुरावा... युजवेंद्र चहल-धनश्री वर्मांत होणार घटस्फोट? समोर आली मोठी अपडेट - CHAHAL AND DHANASHREE DIVORCE

क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्यातील नात्यात दुरावा निर्माण झाला आहे.

Chahal and Dhanashree Divorce Rumors
युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा (IANS Photo)

By ETV Bharat Sports Team

Published : Jan 4, 2025, 4:43 PM IST

नवी दिल्ली Chahal and Dhanashree Divorce Rumors : क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्यातील नात्यात दुरावा निर्माण झाला आहे. घटस्फोटाच्या अफवांमध्ये दोघांनी एकमेकांना इंस्टाग्रामवर अनफॉलो केलं आहे. युझवेंद्रनं धनश्रीसोबतचे सर्व फोटोही डिलीट केले आहेत. इतकंच धनश्रीनं युझवेंद्रला अनफॉलो केलं आहे, पण त्याचे फोटो काढलेले नाहीत. टाइम्स ऑफ इंडियाच्या सूत्रांनी घटस्फोटाच्या अफवा खऱ्या असल्याचं म्हटलं आहे. तसंच 'घटस्फोट अंतिम आहे, फक्त औपचारिक घोषणा होणे बाकी असल्याचही टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालात म्हटलं आहे.

धनश्रीनं 2023 मध्ये काढलं होतं चहलचं नाव : त्यांचं वेगळं होण्याचं खरं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. 2023 मध्ये धनश्रीनं तिच्या इंस्टाग्राम नावावरुन 'चहल' हटवल्यानंतर या बातम्या सुरु झाल्या. एका दिवसानंतर, युझवेंद्रनं एक रहस्यमय इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट केली, ज्यामध्ये लिहिलं होतं, 'नवं आयुष्य सुरु होत आहे.' त्यावेळी युझवेंद्रनं या अफवा फेटाळून लावत नोट जारी केली होती. अशा अफवांवर विश्वास ठेवू नका आणि पसरवू नका असं त्यानं त्याच्या चाहत्यांना सांगितलं होतं.

कधी झालं होतं लग्न : 11 डिसेंबर 2020 रोजी युजवेंद्र आणि धनश्रीचं लग्न झालं होतं. झलक दिखला जा 11 मध्ये धनश्रीनं तिची प्रेमकहाणी सांगितली होती. ती म्हणाली, 'लॉकडाऊन दरम्यान एकही सामने होत नव्हते आणि सर्व क्रिकेटपटू घरी बसून कंटाळले होते. त्यादरम्यान एक दिवशी युझीनं नृत्य शिकण्याचा निर्णय घेतला. सोशल मीडियावर त्यानं माझ्या डान्सचे व्हिडिओ पाहिले होते. पूर्वी मी नृत्य शिकवायचे. नृत्य शिकण्यासाठी तो माझ्याकडे आला. मी मान्य केलं.

युजवेंद्र चहल भारतीय संघातून बाहेर : युझवेंद्र चहल सध्या भारतीय संघातून बाहेर आहे. 2024 चा T20 विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा तो भाग होता पण त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यानं भारतासाठी शेवटचा वनडे जानेवारी 2023 मध्ये आणि शेवटचा T20 ऑगस्ट 2023 मध्ये खेळला. यानंतरही पंजाब किंग्जनं त्याला आयपीएल 2025 च्या लिलावात 18 कोटी रुपयांना विकत घेतलं.

हेही वाचा :

  1. 29 चेंडूत मोडला 50 वर्षे जुना विक्रम... SCG वर ऋषभ पंतची तुफानी खेळी
  2. 4,4,4,4... जैस्वालची 'यशस्वी' खेळी, भारतीय क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच मोठा रेकॉर्ड

ABOUT THE AUTHOR

...view details