महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

मालिका गमावल्यानंतर कीवी संघ श्रीलंकेत प्रतिष्ठा राखणार? शेवटचा वनडे सामना 'इथं' पाहा लाईव्ह - SL VS NZ 3RD ODI LIVE IN INDIA

श्रीलंका आणि न्यूझीलंड क्रिकेट संघ यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे. यातील तिसरा सामना आज होणार आहे. श्रीलंकेनं मालिकेत 2-0 आघाजी घेतली आहे.

SL vs NZ 3rd ODI Live Streaming
श्रीलंका आणि न्यूझीलंड क्रिकेट संघ (AP Photo)

By ETV Bharat Sports Team

Published : Nov 19, 2024, 7:30 AM IST

पल्लेकेले SL vs NZ 3rd ODI Live Streaming :श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज म्हणजेच 19 नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे. उभय संघांमधील हा सामना पल्लेकेले येथील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दुपारी अडीच वाजल्यापासून खेळवला जाईल. दुसऱ्या वनडे सामन्यात श्रीलंकेच्या संघानं न्यूझीलंडचा तीन गडी राखून पराभव केला. यासह श्रीलंकेनं मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. या मालिकेत श्रीलंकेची कमान चरित असालंकाच्या हाती आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडचं नेतृत्व मिचेल सँटनर करत आहे.

दुसऱ्या वनडे सामन्यात काय झालं : त्या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार चारिथ असलंकानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या न्यूझीलंडचा संपूर्ण संघ 45.1 षटकांत केवळ 209 धावा करु शकला. न्यूझीलंडकडून मार्क चॅपमननं सर्वाधिक 76 धावांची खेळी खेळली. हा सामना जिंकण्यासाठी श्रीलंकेच्या संघाला 47 षटकांत 210 धावा करायच्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या संघानं 46 षटकांत सात गडी गमावून लक्ष्य गाठलं. श्रीलंकेसाठी स्टार यष्टिरक्षक-फलंदाज कुसल मेंडिसनं नाबाद 72 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली.

कीवी संघ प्रतिष्ठा वाचवणार : या मालिकेत न्यूझीलंडचा संघ आता आपली प्रतिष्ठा वाचवण्याचा प्रयत्न करणार आहे. दुसरीकडे, श्रीलंकेचा संघ मालिकेत क्लीन स्वीप करण्याचा प्रयत्न करणार आहे. दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेनं उत्कृष्ट फलंदाजीचं प्रदर्शन केलं. संघाची टॉप ऑर्डर मजबूत दिसत आहे, यष्टिरक्षक फलंदाज कुसल मेंडिसनं डाव सांभाळला आणि सामना जिंकणारी खेळी खेळली. तर गोलंदाजीत महेश थिक्षणा आणि जेफ्री वँडरसे यांनी घातक गोलंदाजी केली. मिचेल सँटनरच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड संघाची कामगिरी आतापर्यंत निराशाजनक राहिली आहे. त्यांची फलंदाजी ही फिरकी गोलंदाजीसमोरील कमकुवत दुवा ठरली आहे. मात्र, मार्क चॅपमन आणि मिचेल हेसारख्या फलंदाजांनी काही प्रमाणात धावा केल्या आहेत. विल यंग आणि टीम रॉबिन्सन यांना वरच्या क्रमानं वेगवान सुरुवात करावी लागेल.

दोन्ही संघांचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यात आतापर्यंत एकूण 103 वनडे सामने खेळले गेले आहेत. यात न्यूझीलंडचा वरचष्मा दिसतो. न्यूझीलंडनं 103 पैकी 52 सामने जिंकले आहेत. तर श्रीलंकेनं 42 सामने जिंकले आहेत. हेड टू हेड रेकॉर्ड पाहिल्यास न्यूझीलंड संघ अधिक मजबूत आहे.

खेळपट्टी कशी असेल :श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा वनडे सामना पल्लेकेले इथं खेळवला जाणार आहे. पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर फलंदाजांना खूप मदत मिळते. या खेळपट्टीवर पहिल्या डावाची सरासरी धावसंख्या 310-350 दरम्यान असू शकते. या मैदानावर वेगवान गोलंदाजांना विकेट घेण्यात काही अडचण येऊ शकते, तर फिरकी गोलंदाजांना खेळपट्टीची मदत मिळू शकते. जसजसा सामना पुढं जाईल तसतशी खेळपट्टी संथ होऊ शकते, ज्यामुळं धावा काढणं कठीण होते. या खेळपट्टीवर गेल्या 10 सामन्यांमध्ये वेगवान गोलंदाजांनी 60 तर फिरकी गोलंदाजांनी 49 विकेट्स घेतल्या आहेत. या मैदानावर नाणेफेक जिंकणाऱ्या कर्णधाराला प्रथम गोलंदाजी करणं फायदेशीर ठरु शकतं. मागील चार सामन्यांमध्ये पाठलाग करणाऱ्या संघांनी विजय मिळवला आहे.

श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसरा वनडे सामना कधी खेळवला जाईल?

श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसरा वनडे सामना आज 19 नोव्हेंबर रोजी पल्लेकेले येथील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता खेळवला जाईल. तर नाणेफेकीची वेळ या आधी अर्धा तास असेल.

श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसरा वनडे सामना कुठं आणि कसा पाहायचा?

श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड वनडे मालिका भारतात सोनी स्पोर्ट्स टेन 5 आणि सोनी स्पोर्ट्स टेन 5 एचडी टीव्ही चॅनेलवर प्रसारित केली जाईल. याशिवाय या सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग सोनी लिव्ह ॲप आणि फॅनकोड ॲपवर उपलब्ध असेल.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11 :

श्रीलंका : पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (यष्टिरक्षक), सदिरा समरविक्रमा, चरिथ असलंका (कर्णधार), जेनिथ लियानागे, कामिंदू मेंडिस, महिष टेकशाना, जेफ्री वांडरसे, दिलशान मदुशंका, असिथा फर्नांडो.

न्यूझीलंड : विल यंग, ​​टिम रॉबिन्सन, हेन्री निकोल्स, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (कर्णधार), मिचेल हे (यष्टिरक्षक), नॅथन स्मिथ, ईश सोधी, जेकब डफी.

हेही वाचा :

  1. सौदी अरेबियात खेळाडूंवर 641 कोटी रुपयांची होणार उधळपट्टी; आतापर्यंत IPL लिलावात किती रुपये झाले खर्च?
  2. श्रीलंकेनं 12 वर्षांची प्रतीक्षा संपवली, क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच 'हे' घडलं

ABOUT THE AUTHOR

...view details