बुलावायो ZIM vs AFG 2nd Test Live Streaming : झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना आज म्हणजेच 2 जानेवारी रोजी खेळवला जाणार आहे. उभय संघांमधील हा सामना बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लब इथं भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता खेळवला जाईल. दोन्ही संघांमधील पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला होता.
Afghanistan will be playing second test match against Zimbabwe at Queen Sports Club, Bulawayo tomorrow at 12:30 PM AFT. The first match between the two sides was drawn.#GloriousNationVictoriousTeam #AFGvsZIM pic.twitter.com/YEzBelEXtN
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) January 1, 2025
पहिल्या कसोटीत काय झालं : बॉक्सिंग-डे कसोटीत झिम्बाब्वेचा कर्णधार क्रेग एरविननं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर झिम्बाब्वेनं पहिल्या डावात 135.2 षटकांत 586 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात पहिल्या डावात फलंदाजीला आलेला अफगाणिस्तानच्या संघानही 197 षटकं फलंदाजी करत 699 धावा केल्या. तर दुसऱ्या डावात फलंदाजी करताना झिम्बाब्वेनं 34 षटकात 142 धावा केल्या आणि सामना ड्रॉ झाला.
𝐀 𝐍𝐞𝐰 𝐇𝐢𝐠𝐡 𝐟𝐨𝐫 𝐀𝐟𝐠𝐡𝐚𝐧𝐢𝐬𝐭𝐚𝐧! 📈
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) December 30, 2024
Afghanistan's first-inning total of 699 runs against Zimbabwe in the first Test match is now their highest total in an inning of a Test match. 🙌#AfghanAtalan | #ZIMvAFG | #GloriousNationVictoriousTeam pic.twitter.com/Sk8ODGNYNX
दोन्ही संघांचा मालिका जिंकण्याचा प्रयत्न : या मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिल्यानंतर मालिकेतील दुसरा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तानचे संघ नव्या रणनीतीसह दुसऱ्या सामन्यात उतरतील आणि सामना जिंकून मालिकाही जिंकण्याचा प्रयत्न करतील. मालिकेतील पहिल्या सामन्यात झिम्बाब्वेचा स्टार फलंदाज शॉन विल्यम्सनं 154 धावांची शानदार खेळी केली. याशिवाय क्रेग एर्विन आणि ब्रायन बेनेट यांनीही शतकी खेळी खेळली. अफगाणिस्तानच्या रहमत शाह आणि हशमतुल्ला शाहिदी यांनी द्विशतकं तर अफसर झझाईनं शतक झळकावलं होतं.
MATCH DRAWN! 🚨
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) December 30, 2024
The first test match between Zimbabwe and Afghanistan has been drawn. 👍#AfghanAtalan | #ZIMvAFG | #GloriousNationVictoriousTeam pic.twitter.com/JLd5QKuzWe
दोन्ही संघांचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यात आतापर्यंत एकूण तीन कसोटी सामने खेळले गेले आहेत. यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाली. दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. तर, एक सामना अनिर्णित राहिला.
खेळपट्टी कशी असेल : झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यातील दुसरा कसोटी सामना बुलावायो इथं होणार आहे. बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लबची खेळपट्टी फलंदाजांसाठी उपयुक्त ठरते. पहिले तीन दिवस या मैदानावर फलंदाजी करणं सोपं जाईल. या खेळपट्टीवर पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 500 हून अधिक धावांपर्यंत जाऊ शकते. जसजसा सामना पुढं जाईल तसतशी फिरकीपटूंचीही मदत मिळू शकेल, पण वेगवान गोलंदाजांना या खेळपट्टीकडून फारशा आशा नसतील. या खेळपट्टीवर, नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करण्यास प्राधान्य देऊ शकतो, कारण सुरुवातीच्या दिवसांत फलंदाजीसाठी परिस्थिती खूपच अनुकूल असेल.
The inaugural New Year’s Test is upon us as Zimbabwe and Afghanistan lock horns again!
— Zimbabwe Cricket (@ZimCricketv) January 1, 2025
If the drawn Boxing Day Test is anything to go by, we are in for some riveting action once again at Queens Sports Club!
𝗙𝗥𝗘𝗘 𝗘𝗡𝗧𝗥𝗬!#ZIMvAFG #VisitZimbabwe pic.twitter.com/ibixN4iBXr
झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यातील दुसरा कसोटी सामना कधी खेळला जाईल?
झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यातील दुसरा कसोटी सामना आज 2 जानेवारीपासून बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लब इथं भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता खेळवला जाईल. ज्याचा टॉस अर्धा तास आधी होणार आहे.
झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यातील दुसरा कसोटी सामना कुठं आणि कसा पाहायचा?
भारतातील टीव्ही चॅनेलवर झिम्बाब्वे विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील कसोटी मालिकेच्या प्रसारणाबाबत सध्या कोणतीही माहिती नाही. तथापि, कसोटी मालिकेचं लाईव्ह स्ट्रीमिंग फॅनकोड ॲप आणि वेबसाइटवर भारतात उपलब्ध असेल.
𝗗𝗮𝘆 𝟱 - 𝗦𝗲𝘀𝘀𝗶𝗼𝗻 𝟯: Zimbabwe - 586 & 119/4 after 30 overs
— Zimbabwe Cricket (@ZimCricketv) December 30, 2024
(Sean Williams 21*, Craig Ervine 13*), lead Afghanistan by 6 runs#ZIMvAFG #VisitZimbabwe 📝 https://t.co/HCDfKNlkKl pic.twitter.com/JmQoOljW1R
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11 :
झिम्बाब्वे : जॉयलॉर्ड गॅम्बी (यष्टिरक्षक), बेन कुरन, ताकुडझ्वानाशे कैटानो, शॉन विल्यम्स, क्रेग एर्विन (कर्णधार), डिओन मायर्स, ब्रँडन मावुता, ब्रायन बेनेट, न्यूमन न्यामाहुरी, ब्लेसिंग मुझाराबानी, रिचर्ड नगारवा.
अफगाणिस्तान : अब्दुल मलिक, सेदीकुल्लाह अटल, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), एएम गझनफर, अफसर झझाई (यष्टीरक्षक), अजमतुल्ला ओमरझाई, शाहिदुल्ला कमाल, नवी झदरन, झिया-उर-रहमान, झहीर खान.
हेही वाचा :