सिडनी Playing 11 For 5th Test : ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघानं सिडनी कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठा बदल झाला आहे. ऑस्ट्रेलियानं मिचेल मार्शला संघाबाहेर केलं असून एका नव्या खेळाडूचा संघात समावेश करण्यात आला आहे. त्यांनी सिडनी कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये ब्यू वेबस्टरची निवड केली आहे. कर्णधार पॅट कमिन्सनं सिडनीमध्ये ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग इलेव्हनची पुष्टी केली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेतील शेवटचा कसोटी सामना 3 जानेवारीपासून सिडनीत सुरु होत आहे.
A massive selection call with #AUSvIND series honours and #WTC25 points on the line 👀
— ICC (@ICC) January 2, 2025
More from Sydney 👇https://t.co/gCjjzFNDNH
मिचेल मार्शच्या जागी ब्यू वेबस्टरला संधी : पर्थ कसोटीतील पराभवानंतरच ब्यू वेबस्टरला संघात स्थान मिळालं होतं. पर्थ कसोटीदरम्यान मिचेल मार्शला दुखापत झाली होती, त्यामुळं वेबस्टरचा बॅकअप म्हणून संघात समावेश करण्यात आला होता. मात्र, मार्शची दुखापत फारशी गंभीर नव्हती आणि पर्थ कसोटीत अपयशी ठरल्यानंतरही व्यवस्थापनाचा त्याच्यावरचा विश्वास अबाधित राहिला. त्यामुळं तो खेळत राहिला. पण, पर्थनंतर ॲडलेड, ब्रिस्बेन आणि मेलबर्नमध्ये त्यानं धावा केल्या नाहीत, आता ऑस्ट्रेलियन संघ व्यवस्थापनानं त्याच्या जागी ब्यू वेबस्टरला पदार्पण करण्याचा निर्णय घेतला आहे.
It's Mitch Starc's resilience that has kept him going at 145km/h for 15 years and what's got him in the XI for the Sydney Test despite injury concerns #AUSvIND
— cricket.com.au (@cricketcomau) January 2, 2025
More: https://t.co/J0wH1MMDch pic.twitter.com/kNHKDON4Kv
ब्यू वेबस्टरला पदार्पणाची संधी का मिळाली? : मिचेल मार्शनं सध्या सुरु असलेल्या बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेच्या 7 डावात 10.42 च्या सरासरीनं फलंदाजीत केवळ 73 धावा केल्या आहेत. तर गोलंदाजीत त्यानं 6 डावात फक्त 3 विकेट्स घेतल्या आहेत. या खराब कामगिरीचे परिणाम मार्शला भोगावे लागले आहेत. मिचेल मार्श सध्या खराब फॉर्मशी झुंजत असेल. पण, तो ऑस्ट्रेलियाचा अव्वल अष्टपैलू खेळाडू आहे. ऑस्ट्रेलियाला वनडे विश्वचषक जिंकण्यात त्याची भूमिका महत्त्वाची होती, जिथं त्यानं 10 सामन्यांमध्ये 2 शतकं आणि 1 अर्धशतकासह 441 धावा केल्या होत्या.
Another Test debutant for Australia 👀
— ICC (@ICC) January 2, 2025
More from #AUSvIND 👉 https://t.co/F3H5aC65gX#WTC25 pic.twitter.com/25QfyB2yZc
दुसरीकडे, जर आपण ब्यू वेबस्टरबद्दल बोललो तर तो कसोटी पदार्पण करणारा 469 क्रमांकाचा ऑस्ट्रेलियन खेळाडू बनणार आहे. मार्च 2022 पासून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याची सरासरी 57.10 आहे. यात त्यानं 31.70 च्या सरासरीनं 81 विकेट्स घेतल्या आहेत.
Learn a little bit more about Beau Webster before he receives Baggy Green No.469 in Sydney this week #AUSvIND pic.twitter.com/gnzbZYxh8z
— cricket.com.au (@cricketcomau) January 2, 2025
मिचेल स्टार्कही संघात खेळणार : सिडनी कसोटीपूर्वी मिचेल स्टार्कच्या दुखापतीबाबत काही प्रश्न उपस्थित झाले होते. पण, प्लेइंग इलेव्हनची घोषणा करताना ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सनं त्यालाही उत्तर दिलं. तो म्हणाला की काळजी करण्यासारखं काही नाही. मिचेल स्टार्क सिडनी कसोटीत खेळणार आहे.
JUST IN: Pat Cummins confirms a change to the playing XI for the SCG Test #AUSvIND
— cricket.com.au (@cricketcomau) January 1, 2025
सिडनी कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाची प्लेइंग 11 :
सॅम कॉन्स्टन्स, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, ब्यू वेबस्टर, ॲलेक्स केरी, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड
हेही वाचा :