नेल्सन SL Beat NZ in 3rd T20I : न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तिसरा T20 सामना 2 जानेवारी रोजी सॅक्सटन ओव्हल, नेल्सन इथं खेळला गेला. या सामन्यात श्रीलंकेनं न्यूझीलंडचा 7 धावांनी पराभव करत क्लीन स्वीप टाळला. मात्र, कीवी संघानं तीन सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली. या सामन्यात कुसल परेरानं श्रीलंकेकडून शतक झळकावलं. कुसल परेरानं 46 चेंडूत 101 धावा केल्या. याशिवाय कर्णधार चारिथ असलंकानं 24 चेंडूत 46 धावांची खेळी केली. ज्यात त्यानं एक चौकार आणि 5 षटकार मारले. तसंच गोलंदाजीतही कर्णधार चारिथ असलंकानं 3 बळी घेतले.
Sri Lanka take the win in the final KFC T20I. Rachin Ravindra (69), Tim Robinson (37) and Daryl Mitchell (35) contributing to a close chase in Nelson. Catch up on all scores | https://t.co/UzJ3jpZKSC 📲 #NZvSL #CricketNation pic.twitter.com/6Qj7PyCUpb
— BLACKCAPS (@BLACKCAPS) January 2, 2025
एका सामन्यात 429 धावा : न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या T20 मालिकेतील शेवटच्या सामना इतका चुरशीचा होता की मोठी धावसंख्या असूनही विजय-पराजयामधील फरक फक्त 7 धावांचा होता. या सामन्यात श्रीलंकेनं प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 5 गडी गमावून 218 धावा केल्या. प्रत्युत्तर देण्यासाठी आलेल्या न्यूझीलंड संघानंही आपलं सर्वस्व पणाला लावलं पण लक्ष्यापासून 7 धावा कमीच राहिल्या. त्यांनी 20 षटकांत 7 गडी गमावून 211 धावा केल्या. अशाप्रकारे, दोन्ही संघांच्या धावसंख्येची बेरीज करुन, सामन्यात एकूण 429 धावा झाल्या, ज्या दोन्ही संघांदरम्यान खेळल्या गेलेल्या T20 सामन्यातील एकूण धावांचा एक नवीन विक्रम आहे.
Sri Lanka hold on in a high-scoring Nelson encounter 🙌#NZvSL 📝 https://t.co/s2MXFyZ9cl pic.twitter.com/kr1uKMHpjJ
— ICC (@ICC) January 2, 2025
कुसल परेरानं श्रीलंकेसाठी झळकावलं सर्वात जलद T20 शतक : या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेच्या संघानं 218 धावा केल्या. कारण त्यांच्याकडून कुसल परेरानं शतकी खेळी केली. त्यानं श्रीलंकेसाठी सर्वात जलद T20I शतक झळकावून एक नवा विक्रम रचला. कुसल परेरानं न्यूझीलंडविरुद्ध 45 चेंडूत 101 धावांची खेळी केली. यादरम्यान त्यानं अवघ्या 44 चेंडूंमध्ये 13 चौकार आणि 4 षटकारांसह आपलं शतक पूर्ण केलं. श्रीलंकेसाठी सर्वात जलद T20 शतक झळकावण्याच्या बाबतीत, परेरानं 2011 मध्ये दिलशानचा 55 चेंडूत शतकाचा विक्रम मोडला.
KFC T20I series winners! 🏆 #NZvSL pic.twitter.com/9CdBllbnYg
— BLACKCAPS (@BLACKCAPS) January 2, 2025
श्रीलंकेचं धावडोंगर न्यूझीलंडचा पलटवार : कुसल परेराच्या धमाकेदार शतकामुळं न्यूझीलंडचा संघ श्रीलंकेनं केलेल्या धावांना उत्तर देण्यासाठी आला तेव्हा तिथूनही धावांचा पाऊस कमी झाला नाही. सलामीच्या जोडीनं 81 धावांची धमाकेदार सुरुवात केली. किवी संघातील एकाही फलंदाजानं शतक झळकावलं नसले तरी षटकार मारण्यात तो श्रीलंकेपेक्षा एक पाऊल पुढं राहिले.
With 8 wickets through the series and game-changing performances in T20I 1 and 2 at Bay Oval, the KFC Player of the Series - Jacob Duffy 🏏 #NZvSL #CricketNation pic.twitter.com/k2CaS4zzYi
— BLACKCAPS (@BLACKCAPS) January 2, 2025
सामन्यात 25 षटकार, न्यूझीलंडचा पराभव : या सामन्यात श्रीलंकेनं 12 षटकार ठोकले, तर प्रत्युत्तरात न्यूझीलंड संघानं 13 षटकार ठोकले. पण, त्यानंतरही 25 षटकारांच्या या सामन्यात न्यूझीलंडला शेवटच्या स्थानावर येऊन पराभवाला सामोरं जावं लागलं. यासह मालिकेत क्लीन स्वीप करण्याच्या कीवी संघाच्या आकांक्षाही धुळीला मिळाल्या. शेवटचा सामना गमावूनही त्यांनी मालिका 2-1 अशी जिंकली. न्यूझीलंडनं याआधी झालेले दोन्ही T20 सामने जिंकले होते. या सामन्यात विजयासह श्रीलंकेनं 19 वर्षांनी कीवींच्या धर्तीवर T20 सामना जिंकला आहे. याआधी श्रीलंकेनं 2006 मध्ये कीवींच्या धर्तीवर सामना जिंकला होता.
The 50 partnership up for Tim Robinson (34*) and Rachin Ravindra (14*) inside the fifth over in Nelson. Follow the chase LIVE in NZ with TVNZ 1, TVNZ+, Sport Nation and The ACC. LIVE scoring | https://t.co/UzJ3jpZKSC 📲 #NZvSL pic.twitter.com/MVi5v3iBkD
— BLACKCAPS (@BLACKCAPS) January 2, 2025
हेही वाचा :