डरबन SA Beat PAK by 11 Runs : दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघानं पाकिस्तानविरुद्धचा पहिला T20 सामना 11 धावांनी जिंकला आणि यासह 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. पण, दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचा हिरो कोण होता हे तुम्हाला माहीत आहे का? तरुणांचा खेळ म्हटल्या जाणाऱ्या या फॉरमॅटमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या विजयात एका 33 वर्षीय खेळाडूचं योगदान होतं. जो डर्बनच्या मैदानावर इतर खेळाडूंसोबत टीम बसमध्ये नाही तर पोलिस व्हॅनमध्ये आला होता. आम्ही बोलत आहोत जॉर्ज लिंडे बद्दल, ज्यानं आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेला पहिला T20 जिंकण्यात मदत केली.
डेव्हिड मिलर आणि जॉर्ज लिंडे यांची स्फोटक फलंदाजी :
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 9 गडी गमावून 183 धावा केल्या. 30 धावांत 3 गडी बाद झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेला 180 पेक्षा जास्त धावसंख्या गाठता आली, कारण डेव्हिड मिलर आणि जॉर्ज लिंडे यांनी एकत्रितपणे शानदार फलंदाजी केली होती. मिलरनं 40 चेंडूत 8 षटकारांसह 82 धावा केल्या, ज्यात त्याचा स्ट्राइक रेट 205 होता. त्याचप्रमाणे जॉर्ज लिंडेनंही 200 च्या स्ट्राईक रेटनं केवळ 24 चेंडूत 48 धावा केल्या. त्यानं 4 षटकार मारले.
लिंडेची फलंदाजीनंतर गोलंदाजीत सर्वोत्तम कामगिरी :