नागपूर How to Buy Match Tickets : भारत आणि इंग्लंड क्रिकेट संघांतील पहिला वनडे सामना नागपूरच्या जामठा स्टेडियमवर खेळला जाईल. या सामन्याच्या तिकिटांची विक्री सुरू झाली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना 06 फेब्रुवारी रोजी नागपूरच्या व्हीसीए स्टेडियमवर खेळला जाईल.
𝙒𝙄𝙉𝙉𝙀𝙍𝙎!
— BCCI (@BCCI) February 2, 2025
Congratulations #TeamIndia on winning the #INDvENG T20I series 4️⃣-1️⃣ 👏👏 🏆@IDFCFIRSTBank pic.twitter.com/ucvFjSAVoK
5 वर्षांनी होणार वनडे सामना : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना अशा ठिकाणी खेळला जाईल जिथं कसोटी सामना खेळला गेला आहे. परंतु गेल्या पाच वर्षांत एकही वनडे सामना खेळला गेला नाही. हा सामना नागपूरमधील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जाईल. 2019 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात इथं शेवटचा वनडे सामना खेळला गेला होता. या मालिकेनंतर चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने पाकिस्तान आणि यूएईमध्ये होणार आहेत. भारतीय संघ दुबईमध्ये खेळेल पण इंग्लंड संघाला पाकिस्तानमध्ये खेळण्यासाठी जावं लागेल. तयारीच्या बाबतीत, या मालिकेपेक्षा चांगलं काहीही असू शकत नाही. म्हणूनच दोन्ही संघांसाठी प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे.
हेड-टू-हेड रेकॉर्ड : भारत आणि इंग्लंडमध्ये एकूण 107 वनडे सामने खेळले गेले आहेत. ज्यात भारतीय संघानं 58 विजय मिळवले आहेत. तर इंग्लंडनं 44 सामने जिंकले आहेत. तर पाच सामने अनिर्णित राहिले.
𝙏𝙝𝙖𝙩 𝙒𝙞𝙣𝙣𝙞𝙣𝙜 𝙁𝙚𝙚𝙡𝙞𝙣𝙜! 🏆
— BCCI (@BCCI) February 2, 2025
Congratulations to the Suryakumar Yadav-led #TeamIndia on the T20I series win! 👏 👏#INDvENG | @IDFCFIRSTBank | @surya_14kumar pic.twitter.com/QvgUH8iClq
कधी आणि कशी खरेदी करायची तिकिटं : या सामन्याची तिकिटं ऑनलाइन उपलब्ध होतील अशी घोषणा केली आहे. आता चाहते डिस्ट्रिक्ट बाय झोमॅटो मोबाईल अॅपवरुन ऑनलाइन तिकिटं खरेदी करु शकतात. या मालिकेतील प्रत्येक सामना प्रेक्षकांसाठी खास आहे आणि आता तिकिटांची उपलब्धता निश्चित झाली आहे, त्यामुळं चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. या सामन्यासाठी कमीत कमी तिकिटाची किंमत ही 800 रुपये आहे तर जास्तीत जास्त 4000 रुपये आहे.
भारत-इंग्लंड वनडे सामना कुठं आणि कसा पाहायचा : आगामी वनडे मालिकेतील सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरु होतील. तुम्ही हे सामने जिओ सिनेमावर लाईव्ह पाहू शकता. याशिवाय, स्पोर्ट्स 18 वर थेट प्रक्षेपण देखील पाहता येईल. हे सामने जिओ सिनेमाच्या वेबसाइट आणि अॅप्लिकेशनवर प्रसारित केले जातील.
वनडे मालिकेसाठी दोन्ही संघ :
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जयस्वाल, हर्षित राणा
इंग्लंड संघ : जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक (उपकर्णधार), फिल साल्ट (यष्टीरक्षक), जेकब बेथेल, लियाम लिव्हिंगस्टोन, रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, गस अॅटकिन्सन, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ, आदिल रशीद, साकिब महमूद आणि मार्क वूड.
हेही वाचा :