केपटाऊन Ryan Rickelton Double Hundred : दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात खेळल्या जात असलेल्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना न्यूलँड्सच्या केपटाऊन मैदानावर खेळला जात आहे, ज्यात आतापर्यंत यजमान आफ्रिकन संघाचं वर्चस्व दिसून आलं आहे ज्यात त्यांनी पहिल्या डावात 400 हून अधिक धावा केल्या आहेत. यात दक्षिण आफ्रिकेसाठी प्रथमच कसोटीत सलामीला आलेल्या रायन रिकेल्टनच्या बॅटमधून उत्कृष्ट द्विशतक झळकावलं. त्याच्या खेळीच्या जोरावर रायननं जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये दक्षिण आफ्रिकेसाठी एक नवा इतिहासही रचला आहे, ज्यात तो WTC मध्ये आफ्रिकेसाठी द्विशतक झळकावणारा पहिला खेळाडू ठरला आहे.
केले अनेक विक्रम : रायन रिकेल्टनला कसोटी क्रिकेटमध्ये प्रथमच दक्षिण आफ्रिकेकडून सलामीच्या फलंदाजीत खेळण्याची संधी मिळाली, ज्याचा त्यानं पुरेपूर फायदा घेतला. प्रथमच कसोटीत सलामीवीर म्हणून खेळताना द्विशतक झळकावणारा रायन हा दक्षिण आफ्रिकेचा दुसरा आणि जागतिक क्रिकेटमधील चौथा खेळाडू ठरला आहे. रायनच्या आधी 1987 मध्ये श्रीलंकेसाठी ब्रेंडन कुरुप्पू, आफ्रिकेसाठी ग्रॅमी स्टिम आणि त्यानंतर डेव्हॉन कॉनवे यांची नावं या यादीत समाविष्ट आहेत. 2016 नंतर प्रथमच दक्षिण आफ्रिकेतील खेळाडूनं कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावण्यात यश मिळवले आहे. यापूर्वी 2016 साली बेन स्टोक्स आणि हसिम आमला या दोघांनी द्विशतक झळकावलं होतं आणि या सामन्यात शतक झळकावणारा टेंबा बावुमा त्यातही शतक झळकावण्यात यशस्वी ठरला होता.
कसोटी क्रिकेटमध्ये प्रथमच सलामीला येत द्विशतक झळकावणारे खेळाडू :
- रायन रिकेल्टन (दक्षिण आफ्रिका) - वि पाकिस्तान (केप टाऊन, 2025)
- ब्रेंडन कुरुप्पू (श्रीलंका) - विरुद्ध न्यूझीलंड (कोलंबो, 1987)
- ग्रॅमी स्मिथ (दक्षिण आफ्रिका) - विरुद्ध बांगलादेश (लंडन, 2002)
- डेव्हॉन कॉनवे (न्यूझीलंड) - विरुद्ध इंग्लंड (लंडन, 2021)