Paris Olympics 2024 :भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाटने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये महिलांच्या 50 किलो फ्रीस्टाइल कुस्तीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरीत तिने युक्रेनच्या ओक्साना लिवाचचा 7-5 असा पराभव केला.
उपांत्य फेरीत धडक : विनेश फोगाटने संपूर्ण सामन्यात प्रतिस्पर्ध्यावर वर्चस्व राखले आणि 2-0 अशी आघाडी घेत शानदार सुरुवात केली. मधल्या काही चुका वगळता विनेशने माजी जगज्जेत्याविरुद्ध चमकदार कामगिरी केली आणि उपांत्यपूर्व फेरीत 7-5 असा विजय मिळवून उपांत्य फेरीसाठी पात्र ठरली.
उपांत्य फेरीचा सामना कधी : महिलांच्या 50 किलो फ्री स्टाईल कुस्तीमध्ये भारताची स्टॉक कुस्तीपटू विनेश फोगाटचा उपांत्य फेरीचा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 10:25 वाजता खेळवला जाईल. या सामन्यात तिचा सामना पॅन अमेरिकन गेम्समधील विद्यमान चॅम्पियन क्युबाच्या युस्नेलिस गुझमन लोपेझशी होईल.
पदक जिंकण्यापासून फक्त 1 विजय दूर : स्टार कुस्तीपटू विनेश फोगाट आता पॅरिसमधील तिसऱ्या ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यापासून फक्त एक विजय दूर आहे. आज रात्री खेळल्या जाणाऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात तिनं क्युबाच्या युस्नेलिस गुझमन लोपेझचा पराभव केला तर ती भारतासाठी रौप्य पदक जिंकेल.
विनेश फोगाटने महिलांच्या 50 किलो फ्रीस्टाइल कुस्तीच्या 16 फेरीच्या सामन्यात टोकियो 2020 ची चॅम्पियन जपानची युई सुसाकी हिचा 3-2 ने पराभव केला. हा विजय खास होता कारण, जपानची युई सुसाकी ही सध्याची ऑलिम्पिक चॅम्पियन आहे. ती 3 वेळा विश्वविजेती राहीली आहे. युई सुसाकी सध्याची आशियाई चॅम्पियन देखील आहे.
हेही वाचा
- गोल्डन बॉय नीरज चोप्राचा 'बाहुबली थ्रो', पहिल्याच प्रयत्नात अंतिम फेरीत धडक - Paris Olympics 2024
- उपांत्य फेरीत भारत-जर्मनी यांच्यात कांटे की टक्कर, कोणता संघ मजबूत? जाणून घ्या हेड-टू-हेड आकडेवारी - Paris Olympics 2024
- "ऑलिम्पिकमध्ये मेहनत करत नसाल तर..", दिग्गज बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण बॅडमिंटनपटूंच्या खराब कामगिरीवर संतापले - Paris Olympics 2024