पॅरिस 3 August India Olympics Schedul : पॅरिस ऑलिम्पिक 2024 चा सातवा दिवस भारतासाठी संमिश्र होता. पण भारतीय नेमबाज मनू भाकरनं महिलांच्या 25 मीटर पिस्तुल स्पर्धेत चमकदार कामगिरी करत अंतिम फेरीत प्रवेश केला. यासोबतच भारतीय हॉकी संघानंही दमदार खेळ दाखवत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. आज आठव्या दिवशी मनू भाकर आपल्या पदकांची हॅटट्रिक करण्याचा प्रयत्न करेल.
भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनची ऐतिहासिक कामगिरी :पॅरिस ऑलिम्पिकमध्ये लक्ष्य सेन बॅडमिंटन पुरुष एकेरीच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. तब्बल 128 वर्षाच्या इतिहासात ऑलिम्पिक सेमीफायनल गाठणारा पहिला भारतीय खेळाडू आहे.
गोल्फ : भारतासाठी गोल्फ सामन्यांच्या तिसऱ्या फेरीत शुभंकर शर्मा आणि गगनजीत भुल्लर पुरुषांच्या वैयक्तिक स्टोक प्ले फेरी 3 मध्ये खेळतील. जागतिक क्रमवारीत 173 व्या क्रमांकावर असलेल्या शुभंकरनं 17 स्पर्धा खेळल्या आहेत. त्यापैकी 14 स्पर्धांमध्ये तो यशस्वी ठरला आहे, तर जागतिक क्रमवारीत 295 व्या क्रमांकावर असलेल्या गगनजीतनं गेल्या दोन वर्षांत केवळ स्पर्धांमध्ये दोन भाग घेतला आहे.
- पुरुषांची वैयक्तिक स्टोक प्ले फेरी 3 - (शुभंकर शर्मा आणि गगनजीत भुल्लर) - दुपारी 12:30 वा.
नेमबाजी : भारताच्या आठव्या दिवसाची सुरुवात नेमबाजी इव्हेंटनं होईल. भारतासाठी नेमबाजीत मनू भाकर 25 मीटर पिस्तुल महिलांच्या अंतिम फेरीत पदक जिंकण्याच्या आशेनं प्रवेश करेल. यासोबतच पुरुषांच्या अंतिम सामन्यात स्कीट खेळण्यात येणार आहे. जर भारताचा अनंत या अंतिम फेरीसाठी पात्र ठरला तर तो भारतासाठी पदकाचा दावा करु शकतो. भारतासाठी महिलांच्या स्कीट पात्रतेच्या पहिल्या दिवशी रायजा ढिल्लन आणि माहेश्वरी चौहान दिसणार आहेत. स्कीट पुरुषांच्या पात्रतेच्या दुसऱ्या दिवशी भारताचा अनंत जीतसिंग नारुका खेळताना दिसणार आहे.
- स्कीट महिला पात्रता दिवस 1 (रायजा ढिल्लन आणि माहेश्वरी चौहान) - दुपारी 12:30 वाजता
- स्कीट पुरुष पात्रता दिवस 2 (अनंत जीत सिंग नारुका) - दुपारी 1 वाजता
- 25 मीटर पिस्तूल महिला अंतिम (मुन भाकर)- दुपारी 1 वाजता
- स्कीट पुरुषांची अंतिम फेरी - संध्याकाळी 7 वाजता