मेलबर्न Boxing Day 3 Test Matches : भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 चे आतापर्यंत 3 सामने खेळले गेले आहेत. ही मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. अशा परिस्थितीत दोन्ही संघांमधील चौथा कसोटी सामना अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. मालिकेतील चौथा सामना 26 डिसेंबरपासून मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळला जाईल, जो बॉक्सिंग डे कसोटी सामना आहे. वास्तविक, ख्रिसमसच्या दुसऱ्या दिवशी सुरु होणाऱ्या कसोटी सामन्याला बॉक्सिंग डे टेस्ट म्हणतात. यावेळी पाकिस्तानचा संघ बॉक्सिंग डे कसोटीही खेळणार असून, त्यांचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. त्याच वेळी, एक संघ देखील आहे जो प्रथमच बॉक्सिंग डे कसोटी खेळणार आहे.
Time to switch up the formats once again!🔄
— Proteas Men (@ProteasMenCSA) December 23, 2024
The Proteas turn their attention to the red-ball format, with the aim of continuing their superb vein of form and securing a spot in the WTC Final next year!🏏🏆🌍
To purchase your tickets, go to https://t.co/qMKjaITfWt! 🎟️#WozaNawe… pic.twitter.com/ZJbxuxPKBp
दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात बॉक्सिंग डे कसोटी : पाकिस्तान क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये T20 आणि वनडे मालिका खेळवण्यात आली. आता 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 26 डिसेंबरपासून खेळवला जाणार आहे. हा सामना सेंच्युरियनमध्ये होणार आहे, जो बॉक्सिंग डे कसोटी आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याच्या पार्श्वभूमीवर या मालिकेकडं सर्वांचं लक्ष लागून राहणार आहे. वास्तविक, दक्षिण आफ्रिकेचा संघ अंतिम फेरीत पोहोचण्याच्या अगदी जवळ आहे. त्यांना फक्त 1 विजयाची गरज आहे. त्याच वेळी, या मालिकेतील दुसरा सामना 3 जानेवारी 2025 पासून केपटाऊनमध्ये खेळवला जाईल.
कोणता संघ प्रथमच खेळणार बॉक्सिंग डे कसोटी : ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेशिवाय यावेळी झिम्बाब्वेमध्येही बॉक्सिंग डे कसोटी सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात झिम्बाब्वेचा सामना अफगाणिस्तान संघाशी होणार आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात ही पहिलीच वेळ असेल जेव्हा अफगाणिस्तान संघ बॉक्सिंग डे कसोटी सामना खेळेल. हा कसोटी बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लब इथं 26 ते 30 डिसेंबर दरम्यान खेळवली जाईल. म्हणजेच क्रिकेट चाहत्यांना एकाच वेळी तीन कसोटी सामने बघायला मिळणार आहेत. मात्र, भारतीय वेळेनुसार या सामन्यांच्या वेळा बदलतील.
𝐖𝐈𝐍𝐍𝐄𝐑𝐒 🏆#NewCoverPhoto | #AfghanAtalan | #ZIMvAFG | #GloriousNationVictoriousTeam pic.twitter.com/61PRFSL7eY
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) December 21, 2024
28 वर्षांनंतर होणार बॉक्सिंग डे कसोटी : तसंच हा सामना झिम्बाब्वेसाठीही खूप खास असणार आहे. झिम्बाब्वेमध्ये 28 वर्षांनंतर बॉक्सिंग डे कसोटी पुनरागमन होणार आहे. झिम्बाब्वेनं शेवटचा बॉक्सिंग डे कसोटी सामना 1996 मध्ये हरारे स्पोर्ट्स क्लब इथं इंग्लंडविरुद्ध खेळला होता. पावसामुळं तो सामना अनिर्णित राहिला. तेव्हापासून झिम्बाब्वेनं घरच्या मैदानावर एकही बॉक्सिंग डे कसोटी खेळलेली नाही. तथापि, झिम्बाब्वेनं 2000 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध आणि 2017 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर बॉक्सिंग डे कसोटी खेळली आहे.
हेही वाचा :