ब्रिस्बेन England Lions Match : इंग्लंड लायन्सचा क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. जिथं ते ब्रिस्बेनच्या मैदानावर क्रिकेट ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार दिवसांचा कसोटी सामना खेळत आहे. या सामन्यात, इंग्लंडचा माजी खेळाडू आणि दिग्गज अष्टपैलू अँड्र्यू फ्लिंटॉफचा मुलगा रॉकी फ्लिंटॉफ देखील इंग्लंड लायन्स संघाकडून खेळत आहे, ज्यात त्यानं या सामन्यात त्याच्या वडिलांचा 27 वर्षे जुना मोठा विक्रम मोडला. या सामन्यात इंग्लंड लायन्स संघाच्या पहिल्या डावात रॉकी फ्लिंटॉफनं 108 धावांची शानदार खेळी केली, ज्यामुळं तो हा पराक्रम करु शकला.
इंग्लंड लायन्सकडून शतक करणारा सर्वात तरुण खेळाडू : रॉकी फ्लिंटॉफची 108 धावांची खेळी अशा वेळी आली जेव्हा इंग्लंड लायन्स संघ खूप कठीण परिस्थितीतून जात होता, परंतु रॉकीच्या शानदार शतकाच्या जोरावर, त्याच्या संघानं पहिल्या डावात 316 धावांपर्यंत धावसंख्या नेण्यात यश मिळवलं. रॉकीनं 16 वर्षे आणि 291 दिवसांच्या वयात हे शतक झळकावलं, ज्यामुळं तो इंग्लंड लायन्स किंवा इंग्लंड अ संघाकडून शतक झळकावणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. यापूर्वी, हा विक्रम त्याचे वडील अँड्र्यू फ्लिंटॉफच्या नावावर होता, ज्यानं 1998 मध्ये 20 वर्षे 208 दिवसांच्या वयात नैरोबीच्या मैदानावर केनियाविरुद्ध इंग्लंड लायन्सकडून शतक झळकावलं होतं.
At 16 years 291 days old, Rocky Flintoff is the youngest player to score a maiden 💯 for England Lions 🦁
— England Cricket (@englandcricket) January 23, 2025
Passing his father, Andrew Flintoff (20 yrs 28 days) 👏 pic.twitter.com/vMMFGTXElj
रॉकीनं लँकेशायरकडून केलं काउंटीमध्ये पदार्पण : अँड्र्यू फ्लिंटॉफचा मुलगा रॉकीनं 2024 मध्ये प्रथम श्रेणी आणि लिस्ट-ए दोन्हीमध्ये पदार्पण केलं. रॉकी काउंटी क्रिकेटमध्ये लँकेशायरकडून खेळतो, ज्यात त्यानं आतापर्यंत 4 प्रथम श्रेणी आणि 7 लिस्ट-ए सामने खेळले आहेत. इंग्लंड लायन्स संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या अॅशेस ट्रॉफीला लक्षात घेऊन होत आहे, जेणेकरुन संघात काही नवीन खेळाडूंचा समावेश करता येईल. या सामन्यात, क्रिकेट ऑस्ट्रेलिया संघाचा पहिला डाव फक्त 214 धावांवर मर्यादित राहिला, ज्यामध्ये पॅट ब्राउननं 5 बळी घेतले.
हेही वाचा :