हैदराबाद : सॅमसंगनं 22 जानेवारी रोजी गॅलेक्सी अनपॅक्ड 2025 कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात, सॅमसंगनं त्यांचे तीन नवीन फ्लॅगशिप फोन लाँच केले आहेत, ज्यात सॅमसंग Galaxy S25, Galaxy S25 प्लस आणि Galaxy S25 Ultra यांचा समावेश आहे. या तिघांव्यतिरिक्त, गेल्या काही महिन्यांपासून Samsung Galaxy S25 Slim चर्चा सुरू होती.
नवीन फोनचा टीझर
सॅमसंगनं गॅलेक्सी अनपॅक्ड 2025 कार्यक्रमात Galaxy S25 Edge चा टीझर रिलीज केला आहे. या टीझरद्वारे कंपनीनं माहिती दिली की त्यांची गॅलेक्सी एज मालिका 9 वर्षांनी बाजारात परतणार आहे. कंपनीनं पुष्टी केली आहे, की Galaxy S25 Edge या वर्षीच लाँच होईल. याचा अर्थ असा की कंपनी हा फोन 2025 च्या दुसऱ्या तिमाहीत होणाऱ्या MWC 2025 कार्यक्रमात किंवा जुलैमध्ये होणाऱ्या वार्षिक कार्यक्रमात लाँच करू शकते.
काय असेल फोनमध्ये?
या आगामी फोनचा टीझर दाखवताना, सॅमसंगनं पुष्टी केली की Galaxy S25 Edgeच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप असेल. कंपनी या फोनमधील ड्युअल कॅमेरा सेटअपमध्ये बसण्यासाठी एक अंडाकृती आकाराचा कॅमेरा मॉड्यूल प्रदान करेल. GSMAreana च्या रिपोर्टनुसार, या फोनमध्ये फ्लॅट AMOLED डिस्प्ले असू शकतो, जो सेंटर्ड पंच-होल कटआउटसह येईल.
Galaxy S25 Edge 9 वर्षांनी परत
9 वर्षांनंतर बाजारात परतणाऱ्या Galaxy S25 Edge लाइनअपच्या या आगामी फोनच्या उजव्या बाजूला पॉवर बटण आणि व्हॉल्यूम रॉकर्स असतील. याशिवाय, सॅमसंगनं या आगामी फोनबद्दल कोणतेही स्पेसिफिकेशन उघड केलेले नाही, मीडिया रिपोर्ट्सनुसार, या फोनमध्ये Samsung Galaxy S25+ सारखी 6.7-इंच स्क्रीन असू शकते. याशिवाय, या फोनची जाडी देखील 6.4 मिमी असण्याची अपेक्षा आहे. जर असे झाले तर तो खूप पातळ स्मार्टफोन असेल. याशिवाय, कंपनी या फोनमध्ये प्रोसेसरसाठी क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 एलिट चिपसेट देऊ शकते, जो 12 जीबी रॅम सपोर्टसह येऊ शकतो. या फोनची किंमत Samsung Galaxy S25 आणि Samsung Galaxy S25+ च्या किमतींदरम्यान देखील असू शकते.
हे वाचलंत का :