वेस्ट इंडिज West Indies Squad : पाकिस्तानविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी वेस्ट इंडिजनं आपला क्रिकेट संघ जाहीर केला आहे. युवा आणि अनुभवी खेळाडूंना संघात संधी मिळाली आहे. क्रेग ब्रॅथवेटला संघाचा कर्णधार बनवण्यात आलं आहे. तसंच संघाचा स्टार फिरकीपटू गुडाकेश मोटी संघात परतला आहे. बांगलादेशविरुद्ध मायदेशात झालेल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये तो खेळला नाही कारण तो त्यावेळी ग्लोबल सुपर लीगमध्ये भाग घेत होता. विशेष म्हणजे वेस्ट इंडिजनं यापूर्वी 18 वर्षांआधी पाकिस्तानचा दौरा केला होता.
🚨Tour News🚨
— Windies Cricket (@windiescricket) December 23, 2024
The Men in Maroon bowl off 2025 in Pakistan with a two match Test series.
More details⬇️ https://t.co/UYnM3MCweg
आमिर जंगूला संघात संधी : यष्टीरक्षक फलंदाज आमिर जंगूचा प्रथमच कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. त्यानं गेल्या काही काळापासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी दाखवली असून आपल्या खेळानं सर्वांना प्रभावित करण्यात तो यशस्वी ठरला आहे. चार दिवसीय देशांतर्गत टूर्नामेंटमध्ये त्यानं पाच सामन्यांमध्ये 63.50 च्या सरासरीनं दोन शतकं आणि एक अर्धशतकांसह 500 धावा केल्या आणि त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला. आमिर जंगूनं नुकतेच बांगलादेशविरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि पहिल्याच सामन्यात शानदार शतक झळकावून संघाला विजय मिळवून दिला. तो कसोटीत पदार्पण करेल अशी शक्यता आहे.
History for the West Indies as they embark on their fist Test tour of Pakistan in 18 years 💪#PAKvWI | #WTC25https://t.co/jXBuUUaKsV
— ICC (@ICC) December 24, 2024
शमर जोसेफ मालिकेतून बाहेर : दुसरीकडे, स्टार वेगवान गोलंदाज शामर जोसेफला कसोटी मालिकेतून बाहेर ठेवण्यात आलं आहे. तो जखमी झाला आहे. याच कारणामुळं तो बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेलाही मुकला आहे. अल्झारी जोसेफचीही कसोटी संघात निवड झालेली नाही. वेस्ट इंडिज संघाला या दोघांची उणीव भासेल.
आमिर जंगूचं केलं कौतुक : वेस्ट इंडिजचे मुख्य प्रशिक्षक आंद्रे कोली यांनी सांगितलं की, गुडाकेश मोटी फिरकी विभाग मजबूत करण्यासाठी परतला आहे. तर आमिर जंगूनं देशांतर्गत क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये स्वत:ला सिद्ध केलं आहे. याच कारणामुळं त्याची निवड करण्यात आली आहे. जानेवारी 2025 मध्ये पाकिस्तान विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी, आम्ही काय चांगलं केलं आहे यावर लक्ष केंद्रित करणं आणि 2024 पासून शिकलेल्या गोष्टींचे परिणामांमध्ये रुपांतर करणं यावर लक्ष केंद्रित केलं आहे.
Schedule of West Indies tour of Pakistan confirmed 🚨
— Pakistan Cricket (@TheRealPCB) December 24, 2024
More details ➡️ https://t.co/QUITx8AQDH#PAKvWI pic.twitter.com/2E746Oi2CD
पाकिस्तान कसोटीसाठी वेस्ट इंडिजचा संघ :
क्रेग ब्रॅथवेट (कर्णधार), जोशुआ दा सिल्वा (उप-कर्णधार), ॲलेक अथानाझे, केसी कार्टी, जस्टिन ग्रीव्हज, क्वाम हॉज, टेविन इमलाच, आमिर जंगू, मिकेल लुईस, गुडाकेश मोती, अँडरसन फिलिप, केमार रोच, केविन सिंक्लेअर, जेडेन सीलेस, जोमेल वॉरीकन.
हेही वाचा :