नैरोबी (युगांडा) Uganda Athlete Death : युगांडाची महिला धावपटू रेबेका चेप्टेगीला तिच्या साथीदारानं तिला जिवंत जाळलं. परिणामी युगांडाच्या मॅरेथॉन धावपटूचं वयाच्या अवघ्या 33 व्या वर्षी निधन झालं. तिनं प्रत्यक्षात कोणतंही पदक जिंकलं नाही, परंतु गेल्या महिन्यात पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मॅरेथॉन स्पर्धेमध्ये भाग घेतला होता.
शरीराचा 80 टक्के भाग जळाला : रेबेकाच्या मृत्यूच्या वृत्ताला हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी दुजोरा दिला. साथीदारानं केलेल्या हल्ल्यामुळं ऑलिम्पियनचं शरीर 80 टक्के भाजल्याचं सांगण्यात आलं. रेबेकानं अलीकडेच पॅरिसमधील ऑलिम्पिकमध्ये महिला मॅरेथॉनमध्ये भाग घेतला होता. त्यात ती 44व्या स्थानावर राहिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जमिनीच्या वादातून हा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
जमिनीच्या वादातून साथीदाराला जिवंत जाळलं : या घटनेत दोघंही जखमी झाले असले तरी रेबेकाचा मृत्यू झाला. त्याचवेळी तिचा साथीदार आयसीयूमध्ये मृत्यूशी झुंज देत आहे. हॉस्पिटल प्रशासनानं सांगितलं की, एंडिमाचं शरीर 30 टक्के भाजलं असलं तरी ते बरं होत आहे. ॲथलीटच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, रेबेकानं ट्रेनिंग सेंटरजवळील ट्रान्स एनझोया भागात जमीन खरेदी केली आणि तिथं घर बांधलं. त्या जमिनीबाबत त्याचा साथीदारासोबत वाद सुरु होता, त्याचा परीणाम भीषण निघाला.
ऑलिम्पिक समितीनं केला निषेध : रिबेकाच्या पालकांनी दोषीला कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, देशाची ऑलिम्पिक समितीच्या युगांडा ॲथलेटिक्स फेडरेशनचे अध्यक्ष डोनाल्ड रुकर यांनी या घटनेला 'भ्याड हल्ला' म्हणत निषेध केला आहे. दरम्यान या घटनेमुळं क्रीडा विश्वात एकच खळबळ उडाली असून या घटनेचा निषेध केला जात आहे.
हेही वाचा :
- 10 धावंत संघ ऑलआउट, अवघ्या 5 चेंडूत खेळ खल्लास; कुठं झाला आंतरराष्ट्रीय T20 सामना? - ICC Mens T20 World
- जिद्दीला सलाम...! दोन्ही हात नसतानाही पॅरालिम्पिकमध्ये पोहून जगाला केलं चकित, दिग्गजांना मागं टाकून जिंकलं 'गोल्ड मेडल' - Paris Paralympics 2024
- IND vs BAN Test : बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी कधी होणार भारतीय संघाची घोषणा? विराटबाबत मोठी अपडेट - Team India Squad