रावळपिंडी (पाकिस्तान) PAK vs ENG 3rd Test Live Streaming : पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि निर्णायक कसोटी सामना आज 24 ऑक्टोबरपासून खेळवला जाणार आहे. उभय संघांमधला हा सामना रावळपिंडीच्या रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. सध्या ही मालिका 1-1 नं बरोबरीत असून हा सामना जिंकत दोन्ही संघांचा मालिका जिंकण्याचा प्रयत्न असेल.
पाकिस्ताननं 1338 दिवसांची मिळवला होता विजय : मुलतान इथं खेळली गेलेली पहिली कसोटी इंग्लंडनं जिंकली. मात्र यानंतर झालेल्या दुसऱ्या कसोटीत पाकिस्ताननं इंग्लंडचा पराभव केला. यासह 3 कसोटी सामन्यांची मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. मुलतानमध्ये खेळली गेलेला दुसरा कसोटी सामना 152 धावांनी जिंकून पाकिस्ताननं 1338 दिवस घरच्या भूमीवर कसोटी सामना न जिंकण्याची प्रतीक्षाही संपवली होती. त्यांनी फेब्रुवारी 2021 मध्ये घरच्या भूमीवर शेवटचा कसोटी सामना जिंकला होता.
फिरकीत अडकला इंग्लंड :दुसऱ्या कसोटी सामन्यातइंग्लंडकडं 297 धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी पूर्ण वेळ होता, परंतु वेळ असूनही ते लक्ष्य गाठू शकले नाहीत कारण पाकिस्तानी फिरकीपटूंनी विणलेला भ्रम त्यांच्या समजण्यापलीकडं राहिला. नोमान अली आणि साजिद खान यांनी मिळून दोन्ही डावात इंग्लिश फलंदाजांचा पराभव केला. पहिल्या डावात साजिद खाननं 7 आणि नोमान अलीनं 3 बळी घेतले, तर दुसऱ्या डावात नोमान अलीनं 8 तर साजिदनं 2 बळी घेतले. म्हणजेच 20 पैकी नोमान अलीनं 11 तर साजिद खाननं 9 विकेट घेत, इतिहास रचला होता.
दोन्ही संघांचा हेड-टू-हेड रेकॉर्ड कसा : कसोटीत पाकिस्तान आणि इंग्लंडचे संघ आतापर्यंत 91 वेळा आमनेसामने आले आहेत. ज्यात इंग्लंडचा वरचष्मा दिसत आहे. इंग्लंडनं यातील 30 सामने जिंकले आहेत. तर पाकिस्ताननं केवळ 22 सामने जिंकले आहेत. याशिवाय 39 कसोटी सामने अनिर्णित राहिले आहेत. तसंच उभय संघांमधील शेवटच्या पाच कसोटी सामन्यांबद्दल बोलायचं झालं तर यात इंग्लंडचे वर्चस्व दिसून येतं. इंग्लंडनं 5 पैकी 3 सामने जिंकले आहेत. एक सामना ड्रॉ झाला आहे. तर एका सामन्यात पराभव स्विकारावा लागला आहे.
इंग्लंडनं 48 तासाआधीच केली प्लेइंग इलेव्हनची घोषणा :इंग्लंडनं पाकिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यासाठी 22 ऑक्टोबरलाच आपली प्लेइंग 11 जाहीर केली. इंग्लंड संघानं दोन मोठे बदल केले आहेत. तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी गस ऍटकिन्सन संघात परतला आहे. त्याच वेळी, फेब्रुवारी 2024 मध्ये भारताविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळलेल्या रेहान अहमदलाही प्लेइंग 11 मध्ये स्थान देण्यात आलं आहे. रेहाननं आतापर्यंत इंग्लंडसाठी फक्त 4 कसोटी सामने खेळले असून 18 विकेट्स त्याच्या नावावर आहेत. मुलतानच्या मैदानावर फिरकीपटूंना झालेली मदत लक्षात घेऊन इंग्लिश संघानं हे पाऊल उचललं आहे.
पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेचं पूर्ण वेळापत्रक :
- पहिला कसोटी सामना : 7-11 ऑक्टोबर, (इंग्लंड 1 डाव आणि 41 धावांनी विजयी)
- दुसरा कसोटी सामना : 15-19 ऑक्टोबर, (पाकिस्तान 152 धावांनी विजयी)
- तिसरा कसोटी सामना : 24-28 ऑक्टोबर, रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम
पाकिस्तान विरुद्ध इंलंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना कधी खेळला जाईल?
श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना आजपासून (24 ऑक्टोबर 2024) खेळवला जाणार आहे.
पाकिस्तान विरुद्ध इंलंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना कुठं खेळवला जाईल?