महाराष्ट्र

maharashtra

By ETV Bharat Sports Team

Published : Aug 6, 2024, 7:18 PM IST

ETV Bharat / sports

"मुलगा इतिहासाची पुनरावृत्ती करेल...", अंतिम फेरीत धडक मारल्यानंतर नीरजच्या वडील आणि आजोबांची प्रतिक्रिया - Paris Olympics 2024

NEERAJ CHOPRA IN FINAL: टोकियो ऑलिम्पिकचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिकमध्येही वर्चस्व गाजवलं आहे. नीरजने भालाफेक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. फायनलमध्ये पोहोचल्याने त्याच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. ईटीव्ही भारतने नीरजचे वडील आणि आजोबांशी संवाद साधला.

Paris Olympics 2024
नीरजच्या वडील आणि आजोबांची प्रतिक्रिया (Source - ETV Bharat)

पानिपतParis Olympics 2024: भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा त्याच्या पहिल्याच प्रयत्नात भालाफेकच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे. नीरजने 89.34 मीटर फेक केली आहे. नीरजच्या या उत्कृष्ट कामगिरीने पुन्हा एकदा संपूर्ण देशाला त्याच्याकडून सुवर्णा पदकाची अपेक्षा आहे. नीरज चोप्राचे कुटुंबीयही त्याच्या उत्कृष्ट कामगिरीनं खूप खूश आहेत. नीरज पॅरिसमध्ये सुवर्णपदक जिंकेल, अशी आशा त्यांच्या वडिलांनी आणि आजोबांनी व्यक्त केली आहे.

नीरजच्या वडील आणि आजोबांची प्रतिक्रिया (Source - ETV Bharat Reporter)

मुलगा निराश करणार नाही : नीरज चोप्रा पानिपत जिल्ह्यातील खांद्रा गावचा रहिवासी आहे. नीरज अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर त्याचे वडील सुभाष चोप्रा म्हणाले की, "आम्हाला पूर्ण आशा आहे की, यावेळी ही आपला मुलगा देशाला सुवर्णपदक मिळवून देईल. नीरजशी 3 दिवसांपूर्वी आपलं बोलणं झाल्याचं त्यांनी सांगितलं. तेव्हा नीरज म्हणाला की, "शरीर चांगलं काम करत आहे. आशा आहे की यावेळीही मी टोकियो ऑलिम्पिकच्या इतिहासाची पुनरावृत्ती करू शकेन." नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये 87.58 मीटर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकलं होतं.

नीरज चोप्राच्या आजोबांनी सांगितलं की, "नातवाच्या कामगिरीनं संपूर्ण कुटुंब आनंदी आहे. तो सुवर्णपदक जिंकेल, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. कोणतंही पदक आलं तरी आम्ही ते आनंदाने स्वीकारू."

नीरजचा अंतिम सामना 8 ऑगस्टला :पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने आतापर्यंतची सर्वोत्तम थ्रो केला आहे. टोकियो ऑलिम्पिकचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने पात्रता फेरीत 89.34 मीटर फेक करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. नीरजच्या या उत्कृष्ट कामगिरीनं त्याच्या घरी पुन्हा एकदा आनंदाची लाट पसरली. हरियाणासह संपूर्ण देशाला पुन्हा एकदा नीरजकडून सुवर्णपदकाची अपेक्षा आहे. नीरजचा अंतिम सामना 8 ऑगस्टला होणार आहे.

नीरज चोप्रा हा पानिपतच्या खांद्रा गावचा रहिवासी आहे. त्याची यशोगाथा खूपच प्रेरणादायी आहे. तो लहानपणी खूप लठ्ठ होता. वजन कमी करण्यासाठी आणि फिट राहण्यासाठी तो स्टेडियममध्ये गेला होता. जिथे त्याला पहिल्यांदा भालाफेकची माहिती मिळाली. भालाफेकीचे प्राथमिक प्रशिक्षण त्यांनं पानिपतमध्येच घेतलं. जेव्हा तो चांगला खेळू लागला तेव्हा तो पंचकुलाला गेला आणि नंतर परदेशातही प्रशिक्षण घेतलं. 2020च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून तो संपूर्ण देशाचा हिरो बनला.

हेही वाचा

  1. विनेश फोगाटची उपांत्य फेरीत धडक, भारताच्या पदकाच्या आशा वाढल्या!! - Paris Olympics 2024
  2. गोल्डन बॉय नीरज चोप्राचा 'बाहुबली थ्रो', पहिल्याच प्रयत्नात अंतिम फेरीत धडक - Paris Olympics 2024

ABOUT THE AUTHOR

...view details