ETV Bharat / sports

सरकारनं सुनील गावस्कर यांच्याकडील भूखंड काढून अजिंक्य रहाणेला दिला, काय आहेत कारणं? - Ajinkya Rahane

Govt Allots Bandra Plot to Ajinkya Rahane : विधानसभा निवडणुकीला आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्य सरकारनं सोमवारी (23 सप्टेंबर) पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेतलेत. या बैठकीत क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेला मुंबईतील मोक्याच्या जागेचा एक भूखंड देण्यात आला आहे.

maharashtra government allots Bandra Plot Unutilised by Sunil Gavaskar to Cricketer Ajinkya Rahane
सुनील गावस्कर आणि अजिंक्य रहाणे (IANS)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 24, 2024, 9:30 AM IST

मुंबई Govt Allots Bandra Plot to Ajinkya Rahane : महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची बैठक सोमवारी (23 सप्टेंबर) पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यात क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे याला सूसज्ज क्रीडा सुविधा उभारण्यासाठी वांद्रे परिसरात भूखंड देण्यासंदर्भातील घोषणा करण्यात आली. दरम्यान, यामागची नेमकी कारण काय आहेत? यासंदर्भात जाणून घेऊया.

2 हजार चौरस मीटरचा भूखंड : मुंबईतील वांद्रे रिक्लेमेशन येथील 2000 चौरस मीटरचा भूखंड अजिंक्य रहाणेला देण्यात आलाय. हा भूखंड 30 वर्षांसाठी भाडेतत्वावर देण्यात आला आहे. याआधी माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांना इनडोअर क्रिकेट प्रशिक्षण केंद्रासाठी 1988 साली तत्कालीन सरकारनं हा भूखंड दिला होता. मात्र, या भूखंडावर कोणतंही काम न झाल्यानं शासनानं हा भूखंड परत घेतला. म्हाडा प्राधिकरणानं ठराव करून हा भूखंड क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेला देण्याची शिफारस सरकारकडं केली होती. तर या जागेच्या वापरामुळं नवीन क्रिकेटपटू घडावेत आणि क्रिकेट या खेळासाठी या जागेचा वापर व्हावा. यासाठी हा भूखंड आता राज्य सरकारनं क्रिकेटपट्ट अजिंक्य रहाणेला दिला आहे.

अजिंक्यने मानले सरकारचे आभार : राज्य सरकारच्या या मोठ्या निर्णयानंतर क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेकडे आता कोट्यवधींची मालमत्ता येणार आहे. तीस वर्षांसाठी त्याला या भूखंडाचा वापर करता येईन. राज्य सरकारच्या या निर्णयानंतर अजिंक्य रहाणेनं सोशल मीडियावर पोस्ट करत राज्य सरकारचं आभार मानलंय. "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बीसीसीआयचे खजिनदार आशिष शेलार यांचं मी आभार मानतो. भविष्यकाळात चॅम्पियन क्रिकेटपटू घडवण्यासाठी मला जो भूखंड दिलाय, त्या जागेतून चांगले क्रिकेटपटू घडतील", असं अजिंक्य रहाणेनं पोस्टमध्ये म्हटलंय.

हेही वाचा -

  1. पंचांनी आऊट दिल्यानंतर 20 मिनिटांनी अजिंक्य रहाणे पुन्हा आला फलंदाजीला; आसाम-मुंबई रणजी सामन्यात नेमकं काय घडलं?
  2. 'लिटिल मास्टर' सुनील गावस्कर यांच्या जीवनावर आधारित 'सनी जी' पुस्तकाचं प्रकाशन - Sunil Gavaskar Book Inaugration
  3. 'बहाणे बनवण्यात सुवर्णपदक...', ऑलिम्पिकमधील भारतीय खेळाडूंच्या खराब कामगिरीवर गावस्कर संतापले - Paris Olympics 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.