महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

स्वातंत्र्यदिनी सुरु होणार 2 मोठ्या क्रिकेट स्पर्धा; भारतीय संघाचे 'हे' दिग्गज खेळणार, राहुल द्रविडचा मुलगाही उतरणार मैदानात - Maharaja Trophy - MAHARAJA TROPHY

Maharaja Trophy : 15 ऑगस्ट 2024 पासून क्रिकेटच्या दोन मोठ्या स्पर्धा सुरु होत आहेत. या दोन्ही स्पर्धांमध्ये भारताचे अनेक प्रसिद्ध खेळाडू खेळताना दिसणार आहेत. राहुल द्रविडचा मुलगाही इतर भारतीय क्रिकेटपटूंसोबत या दोन स्पर्धांपैकी एकाचा भाग असेल. (Maharaja Trophy Marathi News)

Karnataka Premier League
क्रिकेट (ETV Bharat File Photo)

By ETV Bharat Sports Team

Published : Aug 15, 2024, 3:48 PM IST

Updated : Aug 15, 2024, 7:09 PM IST

हैदराबाद Maharaja Trophy : आज भारताचा स्वातंत्र्य दिन आहे. हा खास दिवस देशभर साजरा केला जातो. हा दिवस क्रिकेटसाठीही खास बनला आहे, कारण या दिवसापासून क्रिकेटच्या दोन मोठ्या स्पर्धा सुरु होत आहेत. 15 ऑगस्ट 2024 पासून दोन भारतीय देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा सुरु होत आहेत. यातील एक म्हणजे बुची बाबू स्पर्धा आणि दुसरी महाराजा ट्रॉफी (Maharaja Trophy Schedule). या दोन्ही स्पर्धांमध्ये अनेक भारतीय क्रिकेटपटू खेळताना दिसणार आहेत. त्यांच्यापैकी काही खेळाडू भारतीय संघासाठी खेळले आहेत, तर अनेक असे खेळाडू आहेत जे अजूनही भारतीय संघात पूर्णपणे सक्रिय आहेत. (Maharaja Trophy Marathi News)

राहुल द्रविडचा मुलगा खेळणार :कर्नाटकात होणारी महाराजा टी-20 लीग 15 ऑगस्ट म्हणजेच आजपासून सुरु होणार असून पुढील 17 दिवस चालणार आहे. कर्नाटकच्या या देशांतर्गत टी-20 लीगचा अंतिम सामना 1 सप्टेंबर रोजी होणार आहे. महाराजा ट्रॉफीमध्ये दररोज दोन सामने होणार असून त्यात 6 संघ आहेत. विशेष म्हणजे राहुल द्रविडचा मोठा मुलगा समित द्रविड महाराजा ट्रॉफीमध्येच आपली क्षमता दाखवताना दिसणार आहे. तो या लीगमध्ये म्हैसूर वॉरियर्स संघाचा भाग असेल. (BB vs GM)

भारतीय संघाचे दिग्गज बुची बाबू टूर्नामेंटमध्ये खेळणार : बुची बाबू टूर्नामेंटमध्ये भारतीय संघाचे स्टार खेळाडू जे कोणत्या ना कोणत्या फॉरमॅटमध्ये सक्रिय आहेत ते खेळताना दिसतील. यात सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यरसारख्या नावांचा समावेश आहे. याशिवाय कसोटी संघाचा भाग असलेला सरफराज खानही यात खेळताना दिसणार आहे. हे तिन्ही खेळाडू या स्पर्धेत मुंबई संघाचा भाग असतील. इशान किशन या स्पर्धेत झारखंडचा कर्णधार असणार आहे. (KPL T20 News)

महाराजा ट्रॉफीमध्येही दिसणार दिग्गज :महाराजा ट्रॉफीमध्ये त्या खेळाडूंचा धमाका पाहायला मिळणार आहे, जे यापूर्वी टीम इंडियासाठी खेळले होते आणि दमदार कामगिरी केली होती. अशा खेळाडूंमध्ये हुबळी टायगर्स संघाकडून खेळणारा मनीष पांडे, गुलबर्ग मिस्टिक्सकडून खेळणारा देवदत्त पडिक्कल, म्हैसूर वॉरियर्सकडून खेळणारा करुण नायर आणि बेंगळुरू ब्लास्टर्सकडून मयंक अग्रवाल या खेळाडूंचा समावेश आहे. (Mayank Agarwal)

हेही वाचा :

  1. पदार्पणाच्याच सामन्यातच 'या' भारतीय गोलंदाजानं घेतल्या 5 विकेट; संघाला मिळवून दिला एकहाती विजय - Northamptonshire
  2. CSK आणि RCB च्या या दोन मोठ्या खेळाडूंनी नाकारला राष्ट्रीय संघाचा केंद्रीय करार; क्रिकेटविश्वात खळबळ - Central Contracts
Last Updated : Aug 15, 2024, 7:09 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details