मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याला शनिवारी रात्री उशिरा ठाण्यातून अटक करण्यात आली आहे. हा हल्लेखोर बांग्लादेशी होता. चोरीच्या उद्देशानं तो सैफच्या घरात घुसला होता. पोलिसांनी पत्रकार परिषदेत त्याचं नाव मोहम्मद शरीफुल शहजाद असं सांगितलं आहे. हा हल्लेखोर एका हाऊसकीपिंग फर्ममध्ये काम करत होता. त्याचं वय 30 वर्षे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या आरोपीनं चौकशीदरम्यान सांगितलं की, तो अभिनेत्याच्या घरात घुसला होता हे त्याला देखील माहित नव्हते. त्याला फक्त तिथे चोरी करायची होती. मात्र जेव्हा सैफ त्याच्यासमोर आला, त्यावेळी त्यानं स्वसंरक्षणार्थ हल्ला त्याच्यावर केला होता. आता सैफला भेटण्यासाठी अनेकजण लीलावती रुग्णालयात पोहोचत आहेत.
तैमूर आणि जेह यांनी घेतली वडील सैफ अली खानची भेट : दरम्यान शर्मिला टागोर चौथ्या दिवशी आपल्या मुलाला पाहण्यासाठी लीलावती रुग्णालयात पोहोचल्या आहेत. या घटनेनंतर आज 19 जानेवारी रोजी तैमूर आणि जेह त्यांच्या वडिलांना भेटण्यासाठी आई करीना कपूरबरोबर रुग्णालयात गेले होते. आता करीना, तैमूर आणि जेह यांचे देखील काही रुग्णालयाबाहेरील व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. व्हिडिओमध्ये तैमूर आणि जेह कारमध्ये बसताना दिसत आहेत. याशिवाय, सैफची बहीण सोहा अली खान पती कुणाल खेमूबरोबर रुग्णालयच्या दिशेनं जाताना दिसत आहे.
कशी घडली घटना ? : 16 जानेवारी रोजी सैफवर त्याच्या वांद्रे येथील घरात चाकूनं हल्ला करण्यात आला होता. सैफवर शस्त्रक्रिया करणाऱ्या न्यूरोसर्जननं सांगितलं की, अभिनेता सैफ अली खान तैमूर आणि एका केअरटेकरसह ऑटोरिक्षानं रुग्णालयात पोहोचले होते. डॉक्टर नीरज उत्मानी यांनी मीडिया ब्रीफिंगमध्ये सांगितलं की, "जेव्हा सैफ अली खान रुग्णालयात आला तेव्हा मी त्याला भेटणारा पहिला व्यक्ती होतो. तो रक्तानं माखलेला होता, पण तो त्याच्या लहान मुलगा तैमूरबरोबर सिंहासारखा चालत होता. खरंच सैफ अली खान खरा हिरो आहे. दरम्यान करीना कपूर पती सैफबरोबर रुग्णालयात गेली नाही. सोशल मीडियावरील एका व्हिडिओमध्ये, ती इमारतीच्या प्रवेशद्वारावर असल्याची दिसली होती.
हेही वाचा :