मुलतान PAK Beat WI by 127 Runs : पाकिस्तान क्रिकेट संघानं इंग्लंडविरुद्धच्या घरच्या कसोटी सामन्यात सुरु केलेली विजयी मालिका वेस्ट इंडिजविरुद्धही सुरु ठेवली आहे. त्यांनी मुलतान कसोटी 127 धावांनी जिंकली आहे. या सामन्यातही इंग्लंड मालिकेप्रमाणे पाकिस्तानी फिरकीपटूंची जादू पुन्हा एकदा दिसून आली. वेस्ट इंडिजच्या सर्व 20 विकेट्स फक्त फिरकीपटूंनी घेतल्या. दरम्यान, पाकिस्तानी फिरकी जोडी साजिद खान आणि नोमान अली यांनी पुन्हा एकदा धुमाकूळ घातला. या सामन्यात त्यांनी मिळून एकूण 15 विकेट्स घेतल्या. दुसऱ्या डावात पाकिस्तान संघानं 251 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं, ज्याचा पाठलाग करताना संपूर्ण वेस्ट इंडिज संघ 123 धावांवर ऑलआउट झाला.
The Abrar and Noman show outfoxes West Indies in the second innings 👏
— Pakistan Cricket (@TheRealPCB) January 19, 2025
Pakistan's third Test win on the trot at home ✅#PAKvWI | #RedBallRumble pic.twitter.com/b5Ya6eIn8x
कमी धावसंख्येच्या सामन्यात पाकिस्तानचा विजय : वेस्ट इंडिजचा संघ दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी पाकिस्तानमध्ये आला आहे. त्यांचा पहिला सामना मुलतानमध्ये खेळला गेला, जो कमी धावसंख्येचा होता. दोन्ही संघांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. संपूर्ण सामन्यात फिरकी गोलंदाजांचं वर्चस्व दिसून आलं. 17 जानेवारी रोजी सुरु झालेल्या या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार शान मसूदनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सौद साकिबच्या 84 धावा आणि मोहम्मद रिझवानच्या 71 धावांच्या जोरावर पाकिस्ताननं कशा तरी 230 धावा केल्या.
Sajid Khan's magical arm spun Pakistan to a comfortable win against the West Indies 👌#PAKvWI 📝: https://t.co/z2tbKnlfpf pic.twitter.com/ycuuHnCdey
— ICC (@ICC) January 19, 2025
पहिल्या डावात पाकिस्तानची आघाडी : यानंतर प्रत्युत्तरात, वेस्ट इंडिजचा संघ अवघ्या 137 धावांवर गारद झाला आणि पाकिस्तानला 93 धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात पाकिस्ताननं 157 धावा केल्या आणि एकूण 251 धावांचं लक्ष्य ठेवलं. यादरम्यान कर्णधार शान मसूदनं 70 चेंडूत 52 धावांची शानदार खेळी केली. याचा पाठलाग करताना कॅरिबियन संघ 123 धावांवर सर्वबाद झाला आणि पाकिस्ताननं 127 धावांनी सामना जिंकला.
4️⃣ wickets in the first innings, 5️⃣ in the second 💪
— Pakistan Cricket (@TheRealPCB) January 19, 2025
Sajid Khan's magical bowling delivers Pakistan victory ✨#PAKvWI | #RedBallRumble pic.twitter.com/IWg2aNuqVf
सामन्यात फिरकीपटूंचं वर्चस्व : संपूर्ण सामन्यात फिरकी गोलंदाजांचं वर्चस्व दिसून आलं. वेस्ट इंडिजच्या फिरकीपटूंनी 20 पैकी 14 बळी घेतले, तर त्यांच्या वेगवान गोलंदाजांना फक्त 3 बळी घेता आले. दुसरीकडे, पाकिस्तानकडून सर्व 20 विकेट्स त्यांच्या फिरकी गोलंदाजांनी घेतल्या. इंग्लंड मालिकेचा हिरो साजिद खाननं पहिल्या डावात 4 आणि दुसऱ्या डावात 5 बळी घेत एकूण 9 बळी घेतले. त्याचा सहकारी फिरकी गोलंदाज नोमान अलीनं पहिल्या डावात 5 आणि दुसऱ्या डावात 1 बळी घेतला. उर्वरित 5 विकेट अबरार अहमदला गेल्या. एवढंच नाही तर पाकिस्तानी संघानं सुमारे 58 षटकं टाकली पण फक्त 1 षटक वेगवान गोलंदाजानं टाकला. साजिद खानला त्याच्या शानदार कामगिरीसाठी सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं.
A defeat to start the tour in Multan. 🏏#PAKvWI | #MenInMaroon pic.twitter.com/RIHJnz6ydg
— Windies Cricket (@windiescricket) January 19, 2025
घरच्या कसोटी सामन्यांमध्ये फिरकीपटूंचा कहर : पाकिस्तानच्या फिरकीपटूंनी कसोटी सामन्यात सर्व 20 बळी घेण्याची कामगिरी करण्याची ही पहिलीच वेळ नाही. घरच्या मैदानावर खेळलेल्या गेल्या 2 कसोटी सामन्यांमध्ये पाकिस्तानच्या फिरकीपटूंनी असाच पराक्रम केला होता. म्हणजेच, घरच्या मैदानावर खेळलेल्या गेल्या 3 कसोटी सामन्यांमध्ये सर्व 60 विकेट्स पाकिस्तानी फिरकीपटूंनी घेतल्या आहेत. पाकिस्तानच्या या वेगवान गोलंदाजाला गेल्या 3 घरच्या कसोटी सामन्यांमध्ये एकही विकेट घेता आली नाही. यावरुन पाकिस्तानी फिरकी गोलंदाजांचं वर्चस्व किती आहे याचा अंदाज येतो. म्हणजेच, वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा पाकिस्तान संघ आता त्याच्या फिरकी गोलंदाजांमुळं ओळखला जात आहे.
हेही वाचा :