क्वालालंपूर IND Beat WI : मलेशियात सुरु असलेल्या 19 वर्षांखालील महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषकात गतविजेत्या भारतानं दमदार सुरुवात केली आहे. त्यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध 20 षटकांचं लक्ष्य फक्त 26 चेंडूत गाठलं. यासह त्यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध 9 विकेट्सनं विजय मिळवत स्पर्धेत विजयी सुरुवात केली आहे. निक्की प्रसादच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं वेस्ट इंडिजविरुद्धच्या संपूर्ण सामन्यात आपलं वर्चस्व कायम ठेवलं.
India open their account at the #U19WorldCup with a commanding display against the West Indies 🙌
— ICC (@ICC) January 19, 2025
More ➡️ https://t.co/bxaq2B7UiW#INDvWI pic.twitter.com/evQ9ee8ptu
भारतानं 4.2 षटकांत गाठलं लक्ष्य : या सामन्यात वेस्ट इंडिजनं प्रथम फलंदाजी केली. पण, भारतीय गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्यामुळं त्यांचा संघ पूर्ण 20 षटकंही खेळू शकला नाही. संपूर्ण वेस्ट इंडिज संघ 13.2 षटकांत 44 धावांवर ऑलआउट झाला, जी स्पर्धेच्या इतिहासातील त्यांची सर्वात कमी धावसंख्या ठरली. भारतासमोर विजयासाठी 45 धावांचं लक्ष्य होतं, जे त्यांनी अवघ्या 4.2 षटकांत फक्त 1 गडी गमावून पूर्ण केलं.
India begin their #U19WorldCup 2025 campaign with a statement win 💪
— ICC (@ICC) January 19, 2025
Catch the Highlights here 🎥 ⬇https://t.co/Knq1zaKxFR
भारताचा वेस्ट इंडिजवर 9 विकेट्सनं विजय : 45 धावांच्या सोप्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतानं 4 धावांवर आपला एकमेव विकेट गमावला. पण त्यानंतर भारतीय फलंदाजांनी वेस्ट इंडिजला विकेट घेण्याची दुसरी संधी दिली नाही. दुसऱ्या विकेटसाठी कमलिनी आणि चालके यांनी 43 धावांची नाबाद भागीदारी केली. या दोन्ही फलंदाजांनी सामना संपल्यानंतरच विश्रांती घेतली. अशाप्रकारे भारतानं वेस्ट इंडिजचा 9 विकेट्सनं पराभव केला.
Innings Break!
— BCCI Women (@BCCIWomen) January 19, 2025
A terrific bowling performance 🙌
Over to our batters 💪
Updates ▶️ https://t.co/EHIxnF1mFp#TeamIndia | #INDvWI | #U19WorldCup pic.twitter.com/rBT8CyGGJe
सामन्यानंतर लगेच पावसाला सुरुवात : क्वालालंपूरमधील खराब हवामानामुळं भारतानं सुरुवातीपासूनच लक्ष्याचा पाठलाग करताना फलंदाजी आक्रमक ठेवली, ज्याचा उल्लेख सामन्यानंतर भारतीय कर्णधार निकी प्रसाद हिनं केला. ती म्हणाली की संघ व्यवस्थापनाकडून स्पष्ट सूचना होत्या की आपल्याला सामना लवकरात लवकर संपवावा लागेल, आणि आम्ही तेच केलं. विशेष म्हणजे भारतानं सामना जिंकताच मैदानावर पाऊस सुरु झाला. भारताच्या विजयात जोशिथाला सामनावीर म्हणून निवडण्यात आले, तिनं 2 षटकांत 5 धावा देत 2 बळी घेतले.
🚨 Toss and Playing XI 🚨 #TeamIndia win the toss and elect to field
— BCCI Women (@BCCIWomen) January 19, 2025
Today’s Playing XI 👊
Updates ▶️ https://t.co/EHIxnF1mFp#INDvWI | #U19WorldCup pic.twitter.com/4xlHulCdyD
हेही वाचा :