महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

केकेआर विरुद्ध आरआरच्या सामन्यात पावसानं काढली विकेट, दोन्ही संघाला मिळाले एकेक गुण - RR vs KKR - RR VS KKR

IPL 2024 RR vs KKR : आयपीएलमध्ये आज शेवटच्या साखळी सामन्यात कोलकाता नाइट रायडर्स (KKR) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यात गुवाहाटी येथे खेळला जाणारा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला.

IPL 2024 RR vs KKR
IPL 2024 RR vs KKR (desk)

By ETV Bharat Marathi Team

Published : May 19, 2024, 11:03 PM IST

Updated : May 20, 2024, 8:23 AM IST

गुवाहाटी IPL 2024 RR vs KKR : इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये आज यंदाच्या हंगामातील शेवटचा साखळी सामना राजस्थान रॉयल्स (RR) आणि कोलकाता नाइट रायडर्स (KKR) यांच्यात होणार होता. यात केकेआरनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा सामना सात-सात षटकांचा खेळवण्यात येणार होता. राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यावर पावसानं पाणी फिरविलं. एकही चेंडू न टाकता हा सामना रद्द करण्यात आल्यानं चाहत्यांची निराशा झाली. कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामना 21 मे रोजी अहमदाबाद येथे होणार आहे. , 22 मे रोजी एलिमिनेटरमध्ये राजस्थान रॉयल्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होणार आहे. यानंतर क्वालिफायर-2 चेन्नईत 24 मे रोजी होणार आहे.

केकेआरनं प्रथमच पटकावलं अव्वल स्थान : या हंगामात केकेआर आणि राजस्थान या दोन संघांमधील हा दुसरा सामना आहे. यापूर्वी 16 एप्रिल रोजी कोलकात्याच्या मैदानावर सामना झाला होता. ज्यात राजस्थाननं शेवटच्या चेंडूवर 2 गडी राखून विजय मिळवला होता. केकेआर संघानं यापूर्वीच 19 गुणांसह प्लेऑफमध्ये अव्वल स्थान पटकावलंय. आयपीएलच्या इतिहासात केकेआरचा संघ प्रथमच गुणतालिकेत अव्वल स्थानावर असताना प्लेऑफमध्ये प्रवेश करत आहे.

राजस्थानसाठी महत्त्वाचा सामना : राजस्थानसाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. गुणतालिकेत दुसरं स्थान कायम ठेवण्यासाठी त्यांना हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागणार होता. राजस्थाननं मागील सलग 4 सामने गमावले आहेत. अशा स्थितीत राजस्थानचा हा संघ आता प्लेऑफपूर्वी विजयी मार्गावर परतण्यास इच्छुक होता.

दोन्ही संघांत अटीतटीच्या लढती : आयपीएलमध्ये केकेआर आणि राजस्थान संघ जेव्हा-जेव्हा आमनेसामने आले आहेत, तेव्हा चाहत्यांना एक रोमांचक लढत पाहायला मिळाली. दोन्ही संघांमध्ये तुल्यबळ स्पर्धा पाहायला मिळाली. केकेआर आणि राजस्थान यांच्यात आतापर्यंत 29 सामने झाले आहेत. यात दोन्ही संघांनी 14-14 सामने जिंकले आहेत. तर 1 सामना अनिर्णित राहिलाय.

कोलकाता विरुद्ध राजस्थान हेड टू हेड :

  • एकूण सामने : 29
  • केकेआरनं जिंकले : 14
  • राजस्थाननं जिंकले : 14
  • अनिर्णीत : 1

हेही वाचा :

  1. "एक्सक्लुसीव्ह कंटेंट मिळवून टीआरपीसाठी धडपड यामुळं..."; रोहित शर्मानं आयपीएल ब्रॉडकास्टरला फटकारलं - Rohit Sharma
  2. हेनरिकच्या 'क्लास' खेळीनं पंजाबच्या गोलंदाजांचा षटकार-चौकारांनी 'अभिषेक'; सामना जिंकत हैदराबाद गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी - SRH vs PBKS
Last Updated : May 20, 2024, 8:23 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details