माउंट मौनगानुई NZ Beat SL 1st T20I : माउंट मौनगानुईच्या बे ओव्हल इथं खेळल्या गेलेल्या श्रीलंका आणि न्यूझीलंड क्रिकेट संघातील पहिल्या T20 सामन्यात पाहुण्या श्रीलंकन संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. श्रीलंकेसमोर विजयासाठी 173 धावांचं लक्ष्य होते, मात्र अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात संघाला 8 गडी गमावून केवळ 164 धावा करता आल्या आणि न्यूझीलंडनं हा सामना 8 धावांनी जिंकला. धावांचा पाठलाग करताना एकवेळ श्रीलंकेच्या बिनबाद 121 धावा केल्या होत्या. मात्र यानंतर 43 धावांत 8 विकेट गेल्यानं त्यांना हातातला सामना गमवावा लागला. पथुम निसांकानं श्रीलंकेसाठी 60 चेंडूत 90 धावांची स्फोटक खेळी खेळली, पण त्याची खेळी काही कामी आली नाही. या खेळीत त्यानं 7 चौकार आणि 3 षटकार मारले.
A thriller at Bay Oval! Key overs from Jacob Duffy (3-21) through the middle and composure at the death from Matt Henry (2-28) and Zak Foulkes (2-41) to snatch victory in T20I 1. Catch up on all scores | https://t.co/nLnN0S54sv 📲 #NZvSL #CricketNation pic.twitter.com/EQz8WTQJAe
— BLACKCAPS (@BLACKCAPS) December 28, 2024
कीवींची अडखळत सुरुवात : तत्पूर्वी, या सामन्यात श्रीलंकेच्या कर्णधारानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या न्यूझीलंडची सुरुवात चांगली झाली नाही आणि 20 धावांवर पहिला धक्का बसला. संघ वारंवार अंतरानं विकेट गमावत होता. एकेकाळी यजमान संघ 65 धावांच्या धावसंख्येवर 5 विकेट गमावून संघर्ष करत होता, परंतु डॅरेल मिशेलच्या 62 धावांच्या स्फोटक खेळीच्या जोरावर आणि मायकेल ब्रेसवेलच्या 59 धावांच्या जोरावर त्यांनी 172 धावांची आव्हानात्मक धावसंख्या उभी केली.
A New Zealand T20I record sixth-wicket partnership between Michael Bracewell (59) and Daryl Mitchell (62) driving the batting innings at Bay Oval! Follow play LIVE in NZ with TVNZ 1, TVNZ+, Sport Nation and The ACC. LIVE scoring | https://t.co/rG8z0rpkrn 📲 #NZvSL #CricketNation pic.twitter.com/17RYwHAR2w
— BLACKCAPS (@BLACKCAPS) December 28, 2024
श्रीलंकेची स्फोटक सुरुवात : यानंतर 173 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची स्फोटक सुरुवात झाली. पथुम निसांका आणि कुसल मेंडिस यांनी पहिल्या विकेटसाठी 13.3 षटकांत 121 धावांची भागीदारी केली. निसांकानं 60 चेंडूत 90 तर मेंडिसनं 36 चेंडूत 46 धावा केल्या. पहिला धक्का लागताच श्रीलंकेला त्याच धावसंख्येवर आणखी 2 धक्के बसले आणि त्यांची धावसंख्या 3 बाद 121 अशी झाली.
New Zealand edged past Sri Lanka in a close finish to go 1-0 up in the T20I series 🏏
— ICC (@ICC) December 28, 2024
📝 #NZvSL: https://t.co/QCDbf4b0vh pic.twitter.com/rtBbAw0v00
शेवटच्या षटकात कीवींचा विजय : शेवटच्या षटकात न्यूझीलंडला विजयासाठी 14 धावांची गरज होती, जी T20 क्रिकेटचा विचार करता अशक्य म्हणता येणार नाही, परंतु जेक फॉक्सनं या षटकात केवळ 5 धावा दिल्या आणि 2 बळी घेतले. परिणामी न्यूझीलंडचा विजय निश्चित झाला. या विजयासह न्यूझीलंडनं 3 सामन्यांच्या T20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. याच मैदानावर सोमवारी मालिकेतील दुसरा सामना होणार आहे.
हेही वाचा :