मुंबई- अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या चाकू हल्ल्यानंतर मुंबईसह बॉलीवुडमध्ये खळबळ उडाली आहे. विरोधी पक्षांचे नेते मुंबईतील सामान्यांसह सेलिब्रिटींच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत आहेत. दुसरीकडं भाजपा नेते राम कदम यांनी कोणालाही सोडले जाणार नाही, अशी ग्वाही दिली.
अभिनेता सैफ अली खानवरील चाकू हल्ल्याची सखोल चौकशी करण्याची ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशननं (AICWA) मागणी केली आहे. संघटनेचे अध्यक्ष सुरेश श्यामलाल गुप्ता म्हणाले, "बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान यांच्या घरी दरोड्याच्या प्रयत्नानंतर त्यांच्यावर धक्कादायक पद्धतीनं हल्ला झाला. त्यामुळे इंडस्ट्रीमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर ही घटना घडली आहे. त्यामुळे मुंबईत उच्चपदस्थ व्यक्तींना लक्ष्य करून होणाऱ्या वाढणाऱ्या गुन्ह्यांबाबत चिंता निर्माण झाली आहे".
#WATCH | Over attack by an intruder on actor Saif Ali Khan at his Bandra home, BJP leader Ram Kadam says, " according to police, a man entered the actor's house with the intention of robbery, and in a scuffle with the man the actor suffered injuries. the police will investigate… pic.twitter.com/VmrVScf4Ki
— ANI (@ANI) January 16, 2025
देवेंद्र फडणवीस यांनी दखल घ्यावी- सैफ अलीवरील हल्ल्याबाबत शिवसेनेचे (यूबीटी) नेते आनंद दुबे म्हणाले, " या देशात सेलिब्रिटी आणि व्हीआयपी सुरक्षित नसतील, तर सामान्य लोकांचे काय होणार आहे? यापूर्वी सलमान खानच्या निवासस्थानाबाहेर गोळीबार झाला होता. त्यानंतर बाबा सिद्दीकींची हत्या झाली. आता सैफ अली खानवर चाकूनं वार करण्यात आलेत. ही दुर्दैवी घटना आहे. मुंबईत कायदा-सुव्यवस्था आहे की नाही? गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल घ्यावी."
कायद्याचा कमी झाला धाक- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्त्या क्लाईड क्रॅस्टो यांनी या हल्ल्यावरून चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, "अभिनेता सैफ अली खानवरील हल्ला हा चिंतेचा विषय आहे. जर त्याच्यासारख्या सेलेब्रिटी आणि कडक सुरक्षा असलेल्या लोकांवर त्यांच्याच घरात हल्ला होऊ शकतो, तर सामान्य नागरिकांनादेखील काळजी करावी लागेल. गेल्या २-३ वर्षांत महाराष्ट्रात कायद्याचा आणि पोलिसांचा धाक कमी झालेला दिसतो. कारण गुन्हे करणाऱ्यांवर उदारता दाखविली जात आहे. या हल्ल्याकडं राज्याच्या गृह विभागानं खूप गांभीर्यानं पाहण्याची गरज आहे. गृह विभागानं मुंबई आणि राज्यातील लोकांच्या सुरक्षिततेची हमी दिली पाहिजे."
#WATCH | Prayagraj | Over attack by an intruder on actor Saif Ali Khan at his Bandra home, Shiv Sena (UBT) leader Anand Dubey says, " when celebrities and vips are not safe in this country, then what will happen to the normal people. earlier, there was firing outside salman khan's… pic.twitter.com/AxffMk9B66
— ANI (@ANI) January 16, 2025
कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडली- मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना शिवसेनेचे (यूबीटी) खासदार, नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेवरून महायुती सरकारवर निशाणा साधला. खासदार राऊत म्हमाले, "सैफ अली खान हा पद्मश्रीनं सन्मानित करण्यात आलेला कलाकार आहे. तो आणि त्याचे कुटुंब पंतप्रधान मोदींना भेटले होते. त्याच्यावर चाकू हल्ला होताना पंतप्रधान मोदी मुंबईत होते. हा हल्ला पंंतप्रधानांसाठी धक्का आहे. या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडली आहे. मुंबई आणि बीडमध्ये काय घडत आहे? राज्यातील सामान्य जनता सुरक्षित नाही. अशा घटना दररोज घडत आहेत."
#WATCH | Mumbai | NCP-SCP Spokesperson Clyde Crasto says, " the attack on actor saif ali khan is a cause for concern. if people like him with high profile and different levels of security can be attacked in their own homes, then the common citizens have to worry. the fear of law… pic.twitter.com/MiJRsZkyXw
— ANI (@ANI) January 16, 2025
- भाजपा नेते राम कदम म्हणाले, "पोलिसांच्या मते, एक माणूस लुटण्याच्या उद्देशानं अभिनेत्याच्या घरात घुसला. त्या माणसाशी झालेल्या झटापटीत अभिनेता सैफ अली खान जखमी झाला. पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत. या प्रकरणात कोणालाही सोडले जाणार नाही. अशी घटना पुन्हा घडू नये, याची खात्री करण्याची पोलिसांची जबाबदारी आहे."
हल्लेखोर आधीपासूनच होता घरात- "आताच कोणत्याही निष्कर्षावर पोहोचता येणार नाही. यात अजूनही कोणता कट, कोणती योजना किंवा कुठल्या गँगचा सहभाग असल्याचं समोर आलेलं नाही. आजच्या घटनेला आधीच्या दोन घटनांशी जोडणं योग्य होणार नाही. जखमी झालेली एक महिला आधीपासूनच घरात होती. हल्लेखोर आधीपासूनच घरात असल्याचं दिसत आहे. या प्रकरणी तपास सुरू आहे. मुंबई पोलिसांच्या वेगवेगळ्या पथकांतर्फे तपास करण्यात येत आहे. तपास झाल्यानंतरच याबाबत सविस्तर बोलता येईल," अशी माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली.
- राष्ट्रवादी काँग्रेसच्या (एसपी) खासदार सुप्रिया सुळे यांनी ही घटना धक्कादायक असल्याचं म्हटलं. त्यांनी सैफची मेहुणी, अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्याशी फोनवरून संवाद साधत अभिनेता सैफ आणि त्याची पत्नी, अभिनेत्री करीना कपूर यांच्या तब्येतीची विचारपूस केली.
मुंबईला जाणूनबुजून कमजोर करण्याचा प्रयत्न- शिवसेनेच्या (यूबीटी) खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीदेखील राज्य सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी एक्स मीडियातील पोस्टमध्ये म्हटले, "जर सेलिब्रिटी सुरक्षित नसतील तर मुंबईत कोण सुरक्षित आहे? या हल्ल्यानं पुन्हा एकदा मुंबई पोलीस आणि गृहमंत्र्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. मुंबईला जाणूनबुजून कमजोर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. बाबा सिद्दीकी धक्कादायक हत्येनंतर त्यांचं कुटुंब अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. सलमान खानला बुलेटप्रूफ घरात राहण्यास भाग पाडलं आहे. वांद्रे भागात सेलिब्रिटींची संख्या सर्वाधिक असताना तिथे पुरेशी सुरक्षा असायला हवी."
- राष्ट्रवादी काँग्रेसचे (एसपी) अध्यक्ष शरद पवार म्हणाले, "अभिनेता सैफ अली खानवरील हल्ला हा मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था किती बिघडली आहे, दाखवून देणारं लक्षण आहे. बाबा सिद्दीकींची हत्या झालेल्या भागात आज आणखी एका व्यक्तीवर हल्ला झाला. हे सर्व चिंताजनक आहे. राज्य सरकारने, विशेषतः मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकरणाकडे गांभीर्यानं पाहिलं पाहिजे.
पोलीस तपासात काय आलं समोर?
- सैफ अली खानवर हल्ल्यामागे नेमकं कारण काय आहे, याचा मुंबई पोलिसांकडून तपास सुरू आहे. मुंबई गुन्हे शाखेचे अधिकारी दया नायक आणि पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी अभिनेता सैफ अली खानच्या वांद्रे येथील 'सतगुरु शरण' अपार्टमेंटमधून जाऊन तपास केला. पोलिसांकडून घरातील नोकरांची चौकशीदेखील सुरू आहे.
- "सैफ अली खानवरील हल्ल्यातील संशयितांचे डिटेल्स पोलिसांच्या हाती आले आहेत. एक आरोपी जिन्यावरून दिसला आहे. त्याचा शोध सुरू आहे. आरोपी चोरीच्या प्रयत्नात सैफच्या घरी शिरला असल्याचे प्राथमिक तपासात माहिती समोर आले आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त गेडाम यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
हेही वाचा-