हैदराबाद Realme 14 Pro 5G Launch : चिनी स्मार्टफोन कंपनी Realme नं भारतीय बाजारात दोन दमदार फोन लॉंच केले आहेत. या सोबतच कंपनीनं वायरलेस Buds 5 ANC देखील लाँच केले आहे. हे Buds 50dB पर्यंत हायब्रिड अॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन, ENC कॉल नॉइज कॅन्सलेशनसह 38 तासांची बॅटरी लाईफ देतं, असा कंपनीचा दावा आहे. इअरबड्सना पाणी आणि धुळीपासून वाचवण्यासाठी IP55 रॅंक मिळालीय. या बर्डची किंमत 1 हजार 799 आहे. 23 जानेवारीपासून फ्लिपकार्ट, Realme आणि ऑफलाइन स्टोअर्सवर याची विक्री सुरू होणार आहे.
Experience the all-new #realme14ProSeries5G, available in stunning Pearl White, Suede Grey, and Jaipur Pink!
— realme (@realmeIndia) January 16, 2025
Choose from 8GB+128GB at INR 22,999*, or 8GB+256GB at INR 24,999*
Grab yours now! pic.twitter.com/nWnRecX8Z6
Realme 14 Pro+ सिरीज
नवीन Realme 14 Pro सिरीज 5G हा जगातील पहिला थंड-संवेदनशील रंग-बदलणारा स्मार्टफोन असल्याचा दावा कंपनीनं केलाय. हा फोन नॉर्डिक डिझाइन स्टुडिओ व्हॅल्यूअर डिझायनर्ससह विकसित केला आहे. Realme 14 Pro+ आणि Realme 14 Pro फोन तापमान 16°C पेक्षा कमी होतं, तेव्हा फोनचं बॅक कव्हर पर्ल व्हाइट वरून व्हायब्रंट ब्लूमध्ये बदलतं. तापमान जितकं कमी होईल तितकंच या फोनचा रंग बदलतो. तापमान पुन्हा वाढल्यास रंग बदलण्याचे वैशिष्ट्य उलट करता काम करतं, असा कंपनीचा दावा आहे. Realme 14 Pro मालिका 5G जागतिक स्तरावर उपलब्ध पर्ल व्हाइट आणि सुएड ग्रे या दोन प्रकारांच्या शेड्समध्ये येते.
Realme 14 Pro+ 5G
Realme 14 Pro+ 5G मध्ये 6.6.83-इंचाचा MOLED क्वाड कर्व्ह डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120 Hz आणि 1,500 nits पीक ब्राइटनेस आहे. हा फोन गोरिल्ला ग्लास 7i संरक्षणासह येतो. Realme 14 Pro+ 5G मध्ये 80 W चार्जरसह 6,000 mAh बॅटरी आहे. Realme नं 12 GB पर्यंत RAM आणि 256 GB स्टोरेजसह Snapdragon 7s Gen 3 प्रोसेसर यात वापरला आहे. हा Android 15 वर आधारित Realme UI 6.0 वर चालतो.
किती आहे किंमत?
Realme 14 Pro+ 5G मध्ये 50 MP चा मुख्य Sony IMX896 सेन्सर, 50 MP चा Sony IMX882 टेलिफोटो लेन्स आणि 8 MP चा अल्ट्रावाइड लेन्स आहे. यात 32 MP चा सेल्फी कॅमेरा असून फोनमध्ये ट्रिपल फ्लॅश देखील आहे. Realme 14 Pro+ 5G ची किंमत 8 GB/128 GB साठी 29,999 पासून सुरू होईल. 8 जीबी/256 जीबी व्हेरिएंट 31,999 रुपयांना आणि 12 जीबी/256 जीबी मॉडेल 34,999 रुपयांना उपलब्ध आहे.
Realme 14 Pro 5G
Realme 14 Pro+ 5G मध्ये 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि 4,500निट्स पीक ब्राइटनेससह 6.74 -इंचाचा डिस्प्ले आहे. तसंच यात 6000 एमएएच बॅटरीसह 45 वॅट चार्जर आहे. रियलमी 14 प्रो मध्ये 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजसह मीडियाटेक डायमेन्सिटी 7300 एनर्जी चिपसेट वापरला आहे.
किंमत
Realme 14 Pro 5G फोन Realme 14 Pro+ 5G सारख्याच यूआयवर चालतो. यात 50 एमपी मेन कॅमेरा, 13 एमपी अल्ट्रावाइड लेन्स आणि 2एमपी मॅक्रो सेन्सर आहे. 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देखील आहे. Realme 14 Pro 5G ची किंमत 8 GB/128 GB व्हेरिएंटसाठी ₹24,999 पासून सुरू होईल. 8 GB/256 GB मॉडेलची किंमत ₹26,999 असेल.
हे वाचलंत का :