ETV Bharat / entertainment

कंगना राणौतचा 'इमर्जन्सी' '99' रुपयांमध्ये पाहण्याची संधी.... - EMERGENCY TICKET

कंगना राणौत अभिनीत 'इमर्जन्सी' हा चित्रपट दिनानिमित्त 99 रुपयांमध्ये चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.

Kangana Ranaut
कंगना राणौत (कंगना राणौत (Kangana Ranaut (Film Poster))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Jan 16, 2025, 1:50 PM IST

Updated : Jan 16, 2025, 2:58 PM IST

मुंबई - कंगना राणौत स्टारर 'इमर्जन्सी' शुक्रवारी म्हणजेच 17 जानेवारी रोजी चित्रपटगृहांमध्ये दाखल होणार आहे. बॉलिवूड 'क्वीन' या विशेष दिवशी तिचा आगामी चित्रपट मल्टिप्लेक्समध्ये 99 रुपयांमध्ये दाखवणार आहे. कंगना राणौतचा बहुप्रतीक्षित राजकीय ड्रामा 'इमर्जन्सी' या चित्रपटाच्या तिकिटांची किंमत फक्त 99 रुपये झाल्यानंतर आता तिचे चाहते खूप खुश आहेत. झी स्टुडिओज आणि मणिकर्णिका फिल्म्स निर्मित, 'इमर्जन्सी' चित्रपट 1975 मध्ये भारतावर लादल्या गेलेल्या आणीबाणीवर आधारित आहे. या चित्रपटात कंगना देशाच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

कंगना राणौतचा चित्रपट कुठे प्रदर्शित होणार नाही : 'इमर्जन्सी' चित्रपटात कंगना राणौत व्यतिरिक्त अनुपम खेर, मिलिंद सोमण, महिमा चौधरी, श्रेयस तळपदे, विशाक नायर आणि दिवंगत सतीश कौशिक यांच्याही विशेष भूमिका आहेत. 'इमर्जन्सी'मध्ये अभिनय करण्यासोबतच कंगनानं या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शनही केलंय. 'इमर्जन्सी' चित्रपटामध्ये अनुपम खेर जयप्रकाश नारायण, मिलिंद सोमण फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ, महिमा चौधरी पुपुल जयकर, श्रेयस तळपदे अटलबिहारी वाजपेयी, विशाल नायर संजय गांधी आणि दिवंगत सतीश कौशिक जगजीवन राम यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. 'इमर्जन्सी' चित्रपटावर बांग्लादेशमध्ये बंदी घातली गेली आहे. भारत आणि बांग्लादेशमध्ये सध्या तणावपूर्ण वातावरण असल्यामुळे तिथे हा चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार नाही.

'या' चित्रपटाबरोबर होईल 'इमर्जन्सी'ची स्पर्धा : 'इमर्जन्सी' बॉक्स ऑफिसवर 2024मध्येच प्रदर्शित होणार होता. मात्र या चित्रपटावर अनेकांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाला वेळ लागला. 'इमर्जन्सी' चित्रपटाची स्पर्धा बॉक्स ऑफिसवर अमन देवगण आणि राशा थडानी स्टारर 'आझाद' चित्रपटाशी होणार आहे. राशा आणि अमनचा हा पहिलाच चित्रपट आहे. दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून कंगनाचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले आहे. त्यामुळे कंगनाला या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. आता 'इमर्जन्सी' चित्रपट बॉक्स ऑफिसवर कसा कामगिरी करेल, हे पाहणं रंजक असणार आहे.

हेही वाचा :

  1. बांग्लादेशात कंगना राणौतच्या 'इमर्जन्सी' चित्रपटावर बंदी, जाणून घ्या कारण...
  2. कंगना राणौतनं करण जोहरला दिली चित्रपटाची ऑफर, म्हणाली 'मी त्यांना एक चांगली भूमिका देईन...'
  3. बॉलिवूड क्वीन कंगना राणौतनं प्रियांका गांधींना 'इमर्जन्सी' चित्रपट पाहण्यासाठी दिलं आमंत्रण...

Last Updated : Jan 16, 2025, 2:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.