जोहान्सबर्ग JSK vs PC 10th Match Live Streaming : दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या SA20 स्पर्धेतील दहावा सामना आज म्हणजेच 16 जानेवारी रोजी जोबर्ग सुपर किंग्ज आणि प्रिटोरिया कॅपिटल्स यांच्यात खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना जोहान्सबर्गमधील वँडरर्स स्टेडियमवर खेळला जाईल.
𝙇𝙤𝙤𝙠𝙞𝙣𝙜 𝙖𝙝𝙚𝙖𝙙 𝙩𝙤 𝙩𝙤𝙢𝙤𝙧𝙧𝙤𝙬
— Betway SA20 (@SA20_League) January 15, 2025
Watch the first innings of #JSKvPC tomorrow 𝗙𝗢𝗥 𝗙𝗥𝗘𝗘 with DStv Stream CH243 !
Stream it here https://t.co/ysv8D0Nuj3
Queries? please contact (011) 289 2222.
T&Cs apply#BetwaySA20 @Betway_za @JSKSA20 @PretoriaCapsSA pic.twitter.com/iBHoXQ0jcO
दोन्ही संघाची आतापर्यंत कामगिरी कशी : जोबर्ग सुपर किंग्जनं आतापर्यंत या स्पर्धेत दोन सामने खेळले आहेत. ज्यात दोघांनीही विजय मिळवला आहे. पॉइंट्स टेबलमध्ये, जोबर्ग सुपर किंग्जचा संघ 8 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर दुसरीकडे, प्रिटोरिया कॅपिटल्सनं स्पर्धेत तीन सामने खेळले आहेत. ज्यात 1 विजय, 1 पराभव आणि एक सामना अनिर्णीत राहिला आहे. प्रिटोरिया कॅपिटल्स संघ पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानावर आहे. परिणामी दोन्ही संघांमध्ये एक रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो.
𝑾𝒉𝒂𝒕 𝒂 𝒅𝒂𝒚 𝒘𝒆𝒍𝒍 𝒔𝒑𝒆𝒏𝒕 𝒍𝒐𝒐𝒌𝒔 𝒍𝒊𝒌𝒆 🩵#RoarSaamMore #BetwaySA20 #PCvSEC pic.twitter.com/lal5eu6PaM
— Pretoria Capitals (@PretoriaCapsSA) January 15, 2025
दोन्ही संघांचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : 2023 मध्ये या स्पर्धेला सुरुवात झाल्यापासून जोबर्ग सुपर किंग्ज आणि प्रिटोरिया कॅपिटल्स यांच्यात आतापर्यंत 4 सामने झाले आहेत. यात काही प्रमाणात जोबर्ग सुपर किंग्ज संघाचं वर्चस्व असल्याचं दिसून येतं. जोबर्ग सुपर किंग्जनं चारपैकी 2 सामने जिंकले आहेत तर एक सामना प्रिटोरिया कॅपिटल्सनं जिंकला आहे. तसंच दोन्ही संघातील एका सामन्याचा निकाल लागू शकला नाही.
Unfinished business? Not for this duo! 🩵#RoarSaamMore #BetwaySA20 #PCvSEC pic.twitter.com/3jez8Rb1br
— Pretoria Capitals (@PretoriaCapsSA) January 15, 2025
आयपीएलच्या धर्तीवर सुरु झाली लीग : आयपीएलच्या धर्तीवर दक्षिण आफ्रिकेत जानेवारी 2023 पासून टी 20 लीग सुरु झाली. आयपीएलच्याच मालकांनी या लीगचे सर्व संघ विकत घेतले आहेत. राजस्थान रॉयल्सनं पर्ल संघ विकत घेतला. यासह एमआय केप टाऊन, जॉबर्ग सुपर किंग्स, डर्बन सुपर जायंट्स, प्रिटोरिया कॅपिटल्स आणि सनरायझर्स इस्टर्न केप या संघांचा या लीगमध्ये समावेश आहे.
जोबर्ग सुपर किंग्ज विरुद्ध प्रिटोरिया कॅपिटल्स यांच्यातील दहावा सामना कधी आणि कुठं खेळवला जाईल?
जोबर्ग सुपर किंग्ज विरुद्ध प्रिटोरिया कॅपिटल्स यांच्यातील स्पर्धेतील दहावा सामना आज जोहान्सबर्ग येथील वँडरर्स स्टेडियम इथं खेळवला जाईल. उभय संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 9 वाजता सुरु होईल. याची नाणेफेक अर्धातास आधी होईल.
All round roars from last night! Ft. David Wiese 🦁💥#DSGvJSK#WhistlesForJoburg#ToJoburgWeBelong#SA20 pic.twitter.com/jlxPpV8WmZ
— Joburg Super Kings (@JSKSA20) January 15, 2025
जोबर्ग सुपर किंग्ज विरुद्ध प्रिटोरिया कॅपिटल्स यांच्यातील सामना कुठं आणि कसा पाहायचा?
जोबर्ग सुपर किंग्ज विरुद्ध प्रिटोरिया कॅपिटल्स यांच्यातील सामन्याचं भारतातील स्टार स्पोर्ट्स 2 आणि स्टार स्पोर्ट्स 2 एचडी टीव्ही चॅनेलवर थेट प्रक्षेपण केले जाईल. याशिवाय या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग डिस्ने + हॉटस्टार ॲप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल.
All round roars from last night! Ft. David Wiese 🦁💥#DSGvJSK#WhistlesForJoburg#ToJoburgWeBelong#SA20 pic.twitter.com/jlxPpV8WmZ
— Joburg Super Kings (@JSKSA20) January 15, 2025
सामन्यासाठी दोन्ही संघ :
जोबर्ग सुपर किंग्ज : फाफ डू प्लेसिस (कर्णधार), जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), डेव्हॉन कॉनवे, लुस डू प्लॉय, विहान लुब्बे, डोनोव्हन फरेरा, डेव्हिड विसे, गेराल्ड कोएत्झी, तबरेज शम्सी, मथिशा पाथिराना, इम्रान ताहिर, इव्हान जोन्स, लुथो सिपामला, मोईन अली, डग ब्रेसवेल, ब्यूरन हेन्ड्रिक्स, हार्डस विल्जोएन, सिबोनेलो मखान्या, महेश थेक्साना, जेपी किंग,
प्रिटोरिया कॅपिटल्स : काइल व्हेरेन (यष्टीरक्षक), रिली रोसो (कर्णधार), विल जॅक्स, रहमानउल्लाह गुरबाज, लियाम लिव्हिंगस्टोन, मार्क्स अकरमन, जेम्स नीशम, मिगुएल प्रिटोरियस, सेनुरन मुथुसामी, इथन बॉश, डॅरिन डुपाव्हिलॉन, अँरिच नॉर्टजे, काइल सिमंड्स, टियान व्हॅन वुरेन, विल स्मीड, स्टीव्ह स्टोक, कीगन लियोन कॅचेट, वेन पार्नेल
हेही वाचा :