मेलबर्न Nitish Kumar Reddy Records : भारतीय क्रिकेट संघाचा युवा खेळाडू नितीश कुमार रेड्डी यानं ऐतिहासिक कामगिरी केली आहे. आंध्र प्रदेशच्या या खेळाडूनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉक्सिंग-डे कसोटी सामन्यात कठीण काळात शानदार खेळी खेळली आणि शतक झळकावलं. नितीशनं पर्थ कसोटी सामन्यातून कसोटी पदार्पण केलं. तो ॲडलेड आणि ब्रिस्बेनमध्येही खेळला आणि तीन वेळा अर्धशतकाच्या जवळ आला. पण मेलबर्न क्रिकेट मैदानावर नितीशनं आपलं अर्धशतकही पूर्ण केलं आणि त्याचं शतकात रुपांतर करण्यात यश आलं.
What a moment this for the youngster!
— BCCI (@BCCI) December 28, 2024
A maiden Test 100 at the MCG, it does not get any better than this 👏👏#TeamIndia #AUSvIND pic.twitter.com/KqsScNn5G7
निवडक खेळाडूंच्या यादीत स्थान : या शतकी खेळीसह नितीश निवडक फलंदाजांच्या यादीत सामील झाला आहे ज्यांनी आपलं पहिलं कसोटी अर्धशतक शतकात रुपांतरित केलं आहे. या यादीत अनेक दिग्गजांची नावं आहेत. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनं आपल्या पहिल्याच कसोटीत ही कामगिरी केली होती. या यादीत शिखर धवनचाही समावेश आहे. भारताचा आणखी एक माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन, सुरेश रैना, प्रवीण आमरे या खेळाडूंचाही या यादीत समावेश आहे.
Allu Arjun 🤝 Prabhas.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 28, 2024
- Nitish Kumar Reddy doing Pushpa and Bahubali trademarks. 😄👌 pic.twitter.com/obKsmJDp8Q
NITISH KUMAR REDDY BECOMES THE FIRST INDIAN NO.8 TO SCORE A TEST CENTURY IN AUSTRALIA. pic.twitter.com/iF1Oel0EaK
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 28, 2024
तिसरा युवा फलंदाज : यासह नितीश ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत शतक झळकावणारा भारताचा तिसरा सर्वात तरुण फलंदाज ठरला आहे. वयाच्या 21 वर्षे 216 दिवसात त्यानं हे काम केलं. या प्रकरणात पहिल्या क्रमांकावर नाव आहे सचिन तेंडुलकरचं, ज्यानं 1992 मध्ये वयाच्या 18 वर्षे 256 दिवसांत हे काम केलं होतं. त्याच्यानंतर पंत आहे ज्यानं 2019 मध्ये सिडनी इथं वयाच्या 21 वर्षे 92 दिवसांत शतक केलं होतं.
- Sacrificed his job.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 28, 2024
- Retired 25 years early.
- Gave his full attention to Nitish Kumar Reddy.
- Took him to training and gave all the facilities he could despite financial conditions.
THIS IS HOW A PROUD FATHER LOOKS LIKE WHEN HIS DREAMS TURNS INTO A REALITY...!!! 🙇♂️🇮🇳 pic.twitter.com/uc5hnjAtC3
सुंदरसोबत विक्रमी भागीदारी : नितीशनं वॉशिंग्टन सुंदरच्या साथीनं एमसीजीमध्ये भारताला कठीण परिस्थितीतून बाहेर काढलं. ऑस्ट्रेलियाच्या 474 धावांच्या प्रचंड धावसंख्येला प्रत्युत्तर देताना भारतानं केवळ 221 धावांतच सात विकेट गमावल्या. येथून भारतीय संघ लवकरच पॅव्हेलियनमध्ये परतेल, असं वाटत होतं. मात्र तसं झालं नाही. नितीश आणि सुंदरनं खेळपट्टीवर आपले पाय रोवले आणि भारतीय संघाला संकटातून बाहेर काढलं. या दोघांनी शतकी भागीदारी करुन संघाला मजबूत स्थितीत आणलं आणि यजमान संघासमोर अडचणी निर्माण केल्या. भारताच्या आठव्या क्रमांकाच्या आणि नवव्या क्रमांकाच्या फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्या भूमीवर 50 हून अधिक धावा करण्याची ही दुसरी वेळ आहे. या दोघांच्या आधी अनिल कुंबळे आणि हरभजन सिंगनं 2008 मध्ये ॲडलेडमध्ये अशी कामगिरी केली होती.
Nitish Kumar Reddy stepped up under pressure with a remarkable hundred to lead India's fightback 👏 #WTC25 | Follow #AUSvIND ➡ https://t.co/b3Ixowua6Q pic.twitter.com/5fdGfjJexA
— ICC (@ICC) December 28, 2024
हेही वाचा :