दुबई ICC Womens T20 World Cup Live Streaming : आजपासून ICC महिला T20 विश्वचषक 2024 क्रिकेट स्पर्धेचा नववा हंगाम सुरु होत आहे. महिला T20 विश्वचषक 2024 हे मूलतः बांगलादेशमध्ये होणार होतं. परंतु या देशातील राजकीय गोंधळामुळं ते संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये हलवण्यात आले. 10 संघांची महिला क्रिकेट स्पर्धा आता शारजा आणि दुबई इथं आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेची सुरुवात आज 03 ऑक्टोबर रोजी शारजाह इथं 'यजमान' बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यानं होईल. तर कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान 06 ऑक्टोबर रोजी दुबईत भिडणार आहेत. ऑस्ट्रेलिया महिला T20 विश्वचषक 2024 मध्ये गतविजेते म्हणून प्रवेश करतील आणि 05 ऑक्टोबर रोजी त्यांचा पहिला सामना श्रीलंकेविरुद्ध खेळतील.
10 संघांचा सहभाग : महिला T20 विश्वचषक 2024 च्या स्वरुपानुसार, एकूण 10 संघांना प्रत्येकी पाच संघांच्या दोन गटांमध्ये विभागण्यात आलं आहे. प्रत्येक संघाचा एकाच गटातील इतर चार संघांशी एकदा सामना होईल आणि त्यानंतर प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत जातील. अ गटात ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंका यांचा समावेश आहे, तर ब गटात बांगलादेश, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि स्कॉटलंड यांचा समावेश आहे.
महिला T20 विश्वचषकात भारतीय संघ :
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, रिचा घोष (यष्टिरक्षक), यास्तिका भाटिया (यष्टिरक्षक), पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकूर, दयालन हेमलता, आशा शोभना, राधा यादव, श्रेयंका पाटील, सजना सजीवन.
राखीव खेळाडू : उमा छेत्री (यष्टीरक्षक), तनुजा कंवर, सायमा ठाकोर
T20 विश्वचषकातील सर्व संघांच्या कर्णधार :
भारतीय महिला संघाचं नेतृत्व हरमनप्रीत कौर करणार आहे, तर ऑस्ट्रेलियाची कर्णधार ॲलिसा हिली आहे. वेस्ट इंडिजची कर्णधार हॅली मॅथ्यूज, तर दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्ड आहेत. इंग्लंडची कर्णधार हेदर नाइट, पाकिस्तानची कर्णधार फातिमा सना, श्रीलंकेचं नेतृत्व चमारी अथापट्टू आणि बांगलादेशचं नेतृत्व निगार सुलताना जोती करणार आहे. स्कॉटलंडची कर्णधार कॅथरीन ब्राइस, तर न्यूझीलंडची नेतृत्व सोफी डिव्हाईन करणार आहे.
ICC महिला T20 विश्वचषक 2024 चे सामने कधी होणार आहेत?
ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा महाकुंभ 03 ऑक्टोबर (गुरुवार) ते 20 ऑक्टोबर दरम्यान खेळवला जाईल. यातील सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 3:30 आणि 7:30 अशा दोन शिफ्टमध्ये खेळवले जातील.
ICC महिला T20 विश्वचषक 2024 सामन्यांचं थेट प्रक्षेपण कुठं पहावं?
स्टार स्पोर्ट्स नेटवर्क हे भारतातील ICC महिला T20 विश्वचषक 2024 सामन्याचे अधिकृत प्रसारण भागीदार आहे. स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आपल्या टीव्ही चॅनेलवर भारतात स्पर्धेतील सर्व संघांचे सामने प्रसारित करेल.
ICC महिला T20 विश्वचषक 2024 सामन्यांचं लाईव्ह स्ट्रिमींग कुठं पहावं?
स्टार स्पोर्ट्स नेटवर्क हे भारतातील ICC महिला T20 विश्वचषक 2024 सामन्याचे अधिकृत प्रसारण भागीदार आहे. तर हॉटस्टार हे भारतातील ICC महिला T20 विश्वचषक 2024 चं अधिकृत लाइव्ह स्ट्रीमिंग भागीदार आहे. चाहते हॉटस्टार ॲप आणि वेबसाइटवर महिला T20 विश्वचषक सामन्यांचं लाईव्ह स्ट्रिमींग पाहू शकतात.
महिला टी-20 विश्वचषकाचं वेळापत्रक :
- 3 ऑक्टोबर : बांगलादेश विरुद्ध स्कॉटलंड, शारजाह
- 3 ऑक्टोबर : पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका, शारजाह
- 4 ऑक्टोबर : दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज, दुबई
- 4 ऑक्टोबर : भारत विरुद्ध न्यूझीलंड, दुबई
- 5 ऑक्टोबर : बांगलादेश विरुद्ध इंग्लंड, शारजाह
- 5 ऑक्टोबर : ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका, शारजाह
- 6 ऑक्टोबर : भारत विरुद्ध पाकिस्तान, दुबई
- 6 ऑक्टोबर : वेस्ट इंडिज विरुद्ध स्कॉटलंड, दुबई
- 7 ऑक्टोबर : इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, शारजाह
- 8 ऑक्टोबर : ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड, शारजाह
- 9 ऑक्टोबर : दक्षिण आफ्रिका विरुद्ध स्कॉटलंड, दुबई
- 9 ऑक्टोबर : भारत विरुद्ध श्रीलंका, दुबई
- 10 ऑक्टोबर : बांगलादेश विरुद्ध वेस्ट इंडिज, शारजाह
- 11 ऑक्टोबर : ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान, दुबई
- 12 ऑक्टोबर : न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका, शारजाह
- 12 ऑक्टोबर : बांगलादेश विरुद्ध दक्षिण आफ्रिका, दुबई
- 13 ऑक्टोबर : इंग्लंड विरुद्ध स्कॉटलंड, शारजाह
- 13 ऑक्टोबर : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, शारजाह
- 14 ऑक्टोबर : पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, दुबई
- 15 ऑक्टोबर : इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज, दुबई
- 17 ऑक्टोबर : पहिली उपांत्य फेरी, दुबई
- 18 ऑक्टोबर : दुसरी उपांत्य फेरी, शारजाह
- 20 ऑक्टोबर : अंतिम सामना, दुबई
हेही वाचा :
- भारताचा विजय रथ सुरुच... पावसाच्या व्यत्ययानंतरही बांगलादेशचा सफाया, रचला इतिहास - IND Beat BAN
- बांगलादेशला हरवताच भारतीय संघाचं WTC फायनलमध्ये स्थान निश्चित; श्रीलंका की ऑस्ट्रेलिया कोणाशी होणार सामना? - WTC Point Table After IND beat BAN