नवी दिल्ली How To Buy IND vs BAN T20I Match Tickets : भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसरा सामना 09 ऑक्टोबर (बुधवार) रोजी दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. भारत विरुद्ध बांगलादेश 2024 मधील दुसऱ्या T20 सामन्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही तिकिटे कशी खरेदी करावी? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. तर याचं उत्तर या बातमीत मिळेल.
दिल्लीत होणार दुसरा सामना : भारतीय संघ विरुद्ध बांगलादेश संघ यांच्यातील सामन्याची उत्सुकता मालिकेतील पहिल्या सामन्यानंतर गगनाला भिडली आहे. ज्यात भारतीय संघानं कमी धावसंख्येच्या सामन्यात पाहुण्या संघाचा पराभव केला होता. आता हा काफिला दिल्लीच्या दिशेनं निघाला आहे, जिथं भारतीय क्रिकेट संघ 9 ऑक्टोबर रोजी अरुण जेटली स्टेडियमवर बांगलादेश क्रिकेट संघाशी भिडणार आहे. या सामन्यात विजय मिळाल्यास सूर्यकुमार यादव आणि त्यांच्या संघाला 2-0 अशी अभेद्य आघाडी घेता येईल.
बांगलादेशसाठी सामना अटीतटीचा : दुसरीकडे, जर बांगलादेशला पुनरागमन करायचं असेल आणि भारताविरुद्ध T20 मालिकेत आव्हान कायम राखायचं असेल तर त्यांना खूप मेहनत करावी लागेल. नझमुल हुसेन शांतोनं आपल्या सहकाऱ्यांवर भाष्य केलं आणि सांगितले की ते 180 धावा देखील करु शकले नाहीत. मेहदी हसन मिराजनं शानदार फलंदाजी करत संघाच्या एकूण 127 धावा करताना 35 धावा केल्या. पुढं त्यानं आपल्या एकमेव षटकात एक विकेटही घेतली. त्यांना सध्याच्या T20 विश्वचषक चॅम्पियनसमोर आव्हान उभं करायचं असेल तर इतर खेळाडूंना पुढं येऊन चांगली कामगिरी करावी लागेल.