महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

'साहेबां'चा नादच खुळा... करेबियन संघाला 24 तासांत दोनदा केलं पराभूत

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यातही वेस्ट इंडिजला पराभवाला सामोरं जावं लागलं. इंग्लंडनं वेस्ट इंडिजवर 7 विकेट्सनं विजय मिळवत मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे.

ENG Beat WI By 7 Wickets
इंग्लंड क्रिकेट संघ (AP Photo)

By ETV Bharat Sports Team

Published : Nov 11, 2024, 9:28 AM IST

बार्बाडोस ENG Beat WI By 7 Wickets : इंग्लंड क्रिकेट संघानं दुसऱ्या T20 सामन्यात वेस्ट इंडिजचा 7 गडी राखून पराभव केला. पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिल्या सामन्यानंतर दुसऱ्या सामन्यातही इंग्लंडनं आश्चर्यकारक कामगिरी केली. कर्णधार जोस बटलरच्या शानदार फलंदाजीमुळं इंग्लंडनं वेस्ट इंडिजचा एकतर्फा पराभव केला. पाठलाग करताना बटलरनं 45 चेंडूंत 8 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीनं 83 धावा केल्या. यासह इंग्लंडनं पाच सामन्यांच्या T20 मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे.

वेस्ट इंडिजचे फलंदाज पुन्हा अपयशी : बार्बाडोसमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील दुसऱ्या T20 सामन्यात इंग्लंडनं नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या वेस्ट इंडिजनं 20 षटकांत 158/8 धावा केल्या. यादरम्यान कर्णधार रोव्हमन पॉवेलनं संघासाठी सर्वात मोठी खेळी खेळली आणि 41 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं 43 धावा केल्या. याशिवाय वेस्ट इंडिजचे इतर सर्व फलंदाज जवळपास फ्लॉप दिसले. इंग्लंडकडून मुसली, लिव्हिंगस्टोन आणि शाकिबनं 2-2 बळी घेतले. याशिवाय आदिल रशीद आणि जोफ्रा आर्चरनं प्रत्येकी 1 बळी घेतला.

इंग्लंडनं एकतर्फा जिंकला सामना : पाठलाग करताना, जोस बटलरनं इंग्लंडसाठी शानदार खेळी खेळली, ज्यामुळं संघानं अवघ्या 14.5 षटकांत 161/3 धावा करुन विजय मिळवला. बटलरनं 45 चेंडूंत 8 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीनं 83 धावा केल्या. धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंडला पहिला धक्का फिल सॉल्टच्या रुपानं बसला, तो पहिल्याच चेंडूवर गोल्डन डकचा बळी ठरला. त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी जोस बटलर आणि विल जॅकनं 129 धावांची (72 चेंडू) भागीदारी केली, जी 13व्या षटकात जॅकच्या विकेटसह संपली. विल जॅकनं 29 चेंडूंत 5 चौकार आणि 1 षटकारासह 38 धावा केल्या. यानंतर चांगली खेळी खेळणारा जोस बटलरही 13व्या षटकात पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर जेकब बेथेल आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांनी 31 धावांची (13 चेंडू) नाबाद भागीदारी करुन संघाला विजय मिळवून दिला.

मालिकेत 2-0 अशी आघाडी : या विजयासह जॉस बटलरच्या नेतृत्वाखाली इंग्लंडनं 5 सामन्यांच्या T20 मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. पहिला T20 सामना इंग्लंडनं 8 गडी राखून जिंकला होता. त्या सामन्यात फिल सॉल्टनं शतक झळकावून आपल्या संघाला सहज विजय मिळवून दिला. त्यानं 54 चेंडूत 103 धावांची नाबाद खेळी खेळली. विशेष म्हणजे इंग्लंडनं यासह सलग दोन दिवसांत म्हणजे 24 तासांच दोनवेळा करेबियन संघाला पराभूत केलं आहे.

हेही वाचा :

  1. 6,6,6,6,6,6,6...एका डावात 12 षटकार ठोकत केला विश्वविक्रम; महिला T20 क्रिकेटच्या इतिहासात 'असं' घडलंच नव्हतं
  2. विश्वविजेत्या 'कांगारुं'ची घरच्या मैदानावर सर्वात मोठी नाचक्की; 8187 दिवसांनंतर वनडे क्रिकेटमध्ये 'असं' घडलं

ABOUT THE AUTHOR

...view details