महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Live सामन्यात मैदानावर आला कुत्रा, चेंडू घेत पळाला अन्... पाहा व्हिडिओ

क्रिकेटच्या मैदानात अनेकवेळा अशी दृश्ये पाहण्यात आली आहेत, जेव्हा एखादा कुत्रा किंवा मांजर मैदानात शिरतो आणि मग मैदानातील कर्मचारी त्याला पकडण्यासाठी धावत राहतात.

Dog Enters in Ground During Live Match
Live सामन्यात मैदानावर आला कुत्रा (Screenshot on social media (X))

By ETV Bharat Sports Team

Published : Nov 11, 2024, 10:13 AM IST

Dog Enters in Ground During Live Match : क्रिकेट सामना सुरू असताना अनेकदा मैदानावर प्रेक्षक आल्याचं आपण पाहिलं आहे. मात्र आयर्लंडमध्ये एका T20 सामन्यादरम्यान एक वेगळाच प्रेक्षक मैदानात आला, अन् काहीसं गोंधळाच वातावरण निर्माण झालं. हा प्रेक्षक दुसरा तिसरा कोणी नसून एक कुत्रा होता. यामुळं काही काळ खेळही थांबवावा लागला.

कोणता सामना होता : वास्तविक आयर्लंडमध्ये महिलांची घरगुती T20 स्पर्धा 'ऑल आयर्लंड T20 कप' खेळवली जाते. यातच 11 सप्टेंबर 2021 रोजी या स्पर्धेचा उपांत्य सामना झाला. बर्डी क्रिकेट क्लब आणि सिव्हिल सर्व्हिस नॉर्थचे संघ अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करत होते. यात प्रथम फलंदाजी करताना बर्डी क्लबनं 20 षटकांत 8 गडी गमावून 105 धावा केल्या. दलझेलनं संघाकडून सर्वाधिक 47 धावा केल्या.

सामन्यादरम्यान काय झालं : यानंतर या लक्ष्याचा पाठलाग करताना सिव्हिल सर्व्हिस नॉर्थ संघाच्या डावात एक मजेदार घटना घडली. डावाच्या 9व्या षटकात सिव्हिल सर्व्हिस बॅट्समननं स्क्वेअरच्या दिशेनं चेंडू कट केला आणि चेंडू थर्ड मॅनकडे जात होता. क्षेत्ररक्षकानं चेंडू पकडला आणि कीपरच्या दिशेनं फेकला, ज्यानं धावबाद करण्याच्या प्रयत्नात चेंडू स्टंपच्या दिशेनं फेकला. चेंडू स्टंपला लागला नाही, पण यादरम्यान एक छोटा कुत्रा मैदानात घुसला, त्याच्या गळ्यात पट्टाही बांधला होता. या कुत्र्यानं संधी बघताच तो चेंडू तोंडात दाबला आणि मैदानावर पळायला सुरुवात केली. मैदानात उपस्थित क्षेत्ररक्षक चेंडू परत मिळविण्यासाठी कुत्र्याच्या मागे धावले, जे त्यांना चकमा देत राहिलं. काही वेळानंतर कुत्र्याला थांबवून चेंडू परत घेण्यात आला. दरम्यान, एक लहान मुलगाही मैदानावर आला, त्यानं कुत्र्याला परत सोबत नेलं.

बर्डी क्लबनं हा जिंकला सामना : सामन्यादरम्यान घडलेल्या या घटनेनं सर्वांचंच मनोरंजन झालं. आयर्लंड क्रिकेट बोर्डानं आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर त्याचा व्हिडिओही पोस्ट केला होता. सामन्याच्या निकालाचा विचार केला तर ब्रीडी क्रिकेट क्लबनं हा सामना सहज जिंकला. सिव्हिल सर्व्हिस नॉर्थ संघाला 12 षटकांत 9 गडी गमावून केवळ 63 धावा करता आल्या आणि डकवर्थ लुईस नियमानुसार बर्डी क्लबनं हा सामना 11 धावांनी जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला.

हेही वाचा :

  1. 'साहेबां'चा नादच खुळा... करेबियन संघाला 24 तासांत दोनदा केलं पराभूत
  2. 6 मिनिटं, 10 चेंडू, 50 धावा... इंग्लंडच्या फलंदाजाचा ऐतिहासिक कारनामा

ABOUT THE AUTHOR

...view details