हैदराबाद Navratri 2024 :हिंदू धर्मात नवरात्रीला (Shardiya Navratri) खूप महत्त्व आहे. शारदीय नवरात्रीचा उत्सव (Navratri Festival) जवळ आला आहे. हा उत्सव दुर्गा देवीला समर्पित आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवी शक्तीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. (Navratri Utsav 2024) यावेळी गुरुवार, 3 ऑक्टोबर 2024 पासून शारदीय नवरात्री उत्साहाला सुरुवात होत आहे. शारदीय नवरात्रौत्सवाची सांगता 12 ऑक्टोबरला होणार आहे.
घटस्थापनेचे साहित्य : नवरात्री घटस्थापनेसाठी लाल रंगाचे कापडे परिधान करा. त्याचप्रमाणं मातीचे लहान मडके, विविध प्रकरची धान्ये, लहान टोपली, माती, कापूर, रांगोळी, वेलची, लवंग, सुपारी, अक्षतासाठी तांदुळ, आंब्यांची डहाळी (आंब्याची पाने), पैशांची नाणी, लाल ओढणी किंवा चुनरी, पान, सुपारी, शेंदूर, नारळ, फळे, फुले, श्रृंगार पेटी, फुलांचे हार, इत्यादी साहीत्य लागते.
अशी करा घटस्थापना (Ghatasthapana) : कलशाची स्थापना करण्यासाठी मातीच्या भांड्यात प्रथम माती टाकावी, त्यात सात प्रकारचे धान्य टाकावे आणि वरून थोडी माती टाकावी. कलशात गंगाजल भरून त्याला मौली धागा बांधावा. या पाण्यात सुपारी, अक्षत आणि नाणे टाकल्यानंतर कलशाच्या काठावर पाच विड्याची किंवा आंबाची पाने ठेवावीत, त्यानंतर नारळावर लाल कपडा बांधून कलशावर ठेवावा आणि कलश गुंडाळावा. हा कलश माता दुर्गेच्या पूजेसाठी स्थापित करावा, पूजेनंतर तो नऊ दिवस त्यांच्यासमोर ठेवावा आणि दिवा लावा.