- मेष (ARIES) :मकर राशीचा चंद्र आज आपल्या दशमात असेल. आज घर, कुटुंब आणि संतती यांच्यासंबंधी आपणाला आनंदाची भावना राहील. आज आप्तेष्ट व मित्र आपणाला घेरून टाकतील. व्यापार- व्यवसायासाठी प्रवास होऊन त्यात लाभ होईल. व्यवसायात लाभ, मान, प्रतिष्ठा मिळेल. नोकरीत बढती मिळेल. आग, पाणी व दुर्घटना यांपासून सावध राहा. कामाच्या व्यापामुळं थकवा जाणवेल.
- वृषभ (TAURUS) :मकर राशीचा चंद्र आज आपल्या भाग्यात असेल. आज विदेशात राहणारे नातलग किंवा मित्राकडून सुखद बातमी मिळाल्यानं मनाला प्रसन्नता लाभेल. परदेशी जाण्याची इच्छा असणार्या लोकांना आजचा दिवस अनुकूल आहे. दूरचा प्रवास करण्याची संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी कामाचा व्याप वाढेल. व्यापार-व्यवसायात लाभ होईल. स्वास्थ्य साधारण राहील.
- मिथुन (GEMINI) : मकर राशीचा चंद्र आज आपल्या अष्टमात असेल. आज कोणत्याही प्रकारच्या संकटापासून बचाव होण्यासाठी रागावर नियंत्रण ठवावं लागेल. आजचा दिवस शस्त्रकियेसाठी अनुकूल नाही. खर्च वाढल्यानं आर्थिक चणचण भासेल. कुटुंबीय व सहकारी यांच्याशी मतभेद झाल्यानं मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. प्रकृती चांगली राहणार नाही. दिलासा मिळण्यासाठी काही प्रयत्न करावे लागतील.
- कर्क (CANCER) : मकर राशीचा चंद्र आज आपल्या सातवा असेल. आज आपण मौज-मजा आणि मनोरंजन ह्यात रमून जाल. मित्र आणि कुटुंबीयांसह करमणूक केंन्द्र किंवा पर्यटनस्थळी जाण्याची संधी मिळेल. स्वादिष्ट भोजन लाभेल. नवी वस्त्रे आणि अलंकार ह्यांची खरेदी होईल. वाहनसुख मिळेल. सार्वजनिक क्षेत्रात मान मिळेल. व्यावसायिक भागीदारीत लाभ होईल. भिन्नलिंगी व्यक्तींचे आकर्षण राहील. प्रेमिकांना प्रणयात सफलता प्राप्त होईल.
- सिंह (LEO) : मकर राशीचा चंद्र आज आपल्या सहावा असेल. आज घरात हर्ष आणि आनंदाचं वातावरण राहील. कुटुंबियांसह आनंदात वेळ घालवाल. शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील. यश, कीर्ती व आनंद लाभेल. नोकरीत सहकारी चांगले सहकार्य करतील. व्याधीमुक्त व्हाल. आईच्या घराण्याकडून चांगल्या बातम्या मिळतील आणि लाभ सुद्धा होईल. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल.
- कन्या (VIRGO) :मकर राशीचा चंद्र आज आपल्या पाचवा असेल. आजचा दिवस चिंता आणि उद्विग्नपूर्ण असून या ना त्या कारणानं काळजी वाढवेल. विशेषतः संतती आणि आरोग्याविषयक जास्त चिंता वाटेल. पोटाच्या तक्रारी राहतील. विद्यार्थ्यांना ज्ञानात अडचणी येतील. अचानक धनखर्च होईल. शेअर-सट्टा यापासून दूर राहावे. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल.
- तूळ (LIBRA) :मकर राशीचा चंद्र आज आपल्या चवथा असेल. आज आपणास अतिशय संवेदनशीलता व विचारांचे अवडंबर ह्यामुळं मानसिक अस्वास्थ्य राहील. आईच्या बाबतीत काळजी लागून राहील. प्रवासासाठी आजचा दिवस अनुकूल नसल्यानं प्रवास टाळा. छातीदुखीचा त्रास जाणवेल. जमीनविषयक व्यवहार अतिशय जपून करा. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागणार नाही.
- वृश्चिक (SCORPIO) : मकर राशीचा चंद्र आज आपल्या तिसरा असेल. आजचा दिवस आपण खुशीत घालवाल. नवीन कामाची सुरुवात कराल. घरात भावंडांशी सलोख्याचे संबंध राहतील. मित्रांशी सुसंवाद साधाल. जवळपासचे प्रवास होतील. सर्व कामे पूर्ण होतील. जीवनात काही लाभदायक बदल होतील. शत्रू व प्रतिस्पर्धी ह्यांच्यावर मात करू शकाल. आपली लोकप्रियता वाढेल.
- धनू (SAGITTARIUS) :मकर राशीचा चंद्र आज आपल्या दुसरा असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. कुटुंबियांशी गैरसमज निर्माण झाल्यामुळं मतभेद वाढतील. आज मानसिक व्यवहारात खंबीरता नसल्यामुळं कोणताही निर्णय घाईगडबडीने घेऊ नका. महत्वाचा निर्णय घेऊच नका. नाहक खर्च टाळा.
- मकर (CAPRICORN) :मकर राशीचा चंद्र आज आपल्या प्रथम असेल. आज नियोजीत काम व्यवस्थित पार पडेल. कार्यालय किंवा कामाच्या ठिकाणी आपलं वर्चस्व वाढेल. गृहजीवनात वातावरण आनंदी राहील. प्रकृती उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य लाभेल. मित्र, स्नेही ह्यांच्या सहवासानं एकदम खुश व्हाल. उत्तम भोजनाचा आस्वाद घ्याल. वस्त्र, आभूषणे मिळतील. वैवाहिक जीवनात सुख व समाधान लाभेल.
- कुंभ (AQUARIUS): मकर राशीचा चंद्र आज आपल्या बारावा असेल. आज कोणाला जामीन राहणे, पैसे देणे-घेणे करू नका. खर्च वाढेल. आरोग्याकडं लक्ष द्यावं लागेल. कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता आहे. कोणाशी गैरसमजाने भांडण होऊ शकेल. रागावर नियंत्रण ठेवा. कोणाचे भले करण्याच्या नादात आपण संकटात पडणार नाही याची काळजी घ्या.
- मीन (PISCES) :मकर राशीचा चंद्र आज आपल्या लाभात असेल. आजचा दिवस लाभदायक आहे. नोकरी - व्यवसायात उत्पन्न वाढेल. वडीलधारी व मित्रांकडून लाभ होईल. नवे मित्र मिळतील. त्यांची मैत्री भविष्यकाळात लाभदायक ठरेल. मंगलकार्यात हजेरी लावाल. मित्रांसह सहलीचे बेत आखाल. पत्नी व संततीकडून चांगल्या बातम्या मिळतील. अचानक धनलाभ होईल.
हेही वाचा -