ETV Bharat / spiritual

मकर संक्रांत 2025: यंदा संक्रांत कशावर आली आहे? कोणत्या रंगाची साडी नेसावी? घ्या जाणून - MAKAR SANKRANTI 2025 COLOR

जानेवारी महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करेल त्या दिवसाला 'मकर संक्रांत' (Makar Sankranti) म्हणतात. यंदा संक्रांतीला कोणत्या रंगाची साडी नेसावी (Makar Sankranti Color) जाणून घ्या.

Makar Sankranti 2025
मकर संक्रात 2025 (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 4, 2025, 5:32 PM IST

Updated : Jan 14, 2025, 3:52 PM IST

हैदराबाद : संपूर्ण महाराष्ट्रात 'मकर संक्रांत' (Makar Sankranti 2025) हा सण उत्साहात साजरा केला जातो. वर्ष 2025 मध्ये मकर संक्रात 14 जानेवारी, मंगळवारी साजरी केली जाणार आहे. यावेळी सकाळी 8 वाजून 55 मिनिटांनी सूर्य धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे. यामुळं 14 जानेवारीला मकर संक्रांत साजरी केली जाणार आहे. या दिवशी गंगा स्नान करणं आणि दान करणं याला विशेष महत्त्व आहे. तर मकर संक्रांतीला कोणत्या शुभ मुहूर्तावर स्नान आणि दान केल्यानं पुण्य मिळेल? तसंच यंदा संक्रांतीला कोणत्या रंगाची साडी नेसावी (Makar Sankranti Color) आणि कोणती साडी नेसू नये जाणून घ्या ईटीव्ही भारतच्या बातमीमधून.

का आहे मकर संक्रांत महत्त्वाची? (Importance) : हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, मकर संक्रांतीला सूर्याची पूजा केली जाते. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश झाल्यानं दिवस मोठा व्हायला सुरुवात होते आणि थंडी हळूहळू कमी होते. मकर संक्रांत हे नवीन पिकाच्या आगमनाचं प्रतीक आहे. या दिवसापासून सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणाकडं सरकतो. मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा, यमुना आणि इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यानं पुण्य प्राप्त होते असा समज आहे.

मकर संक्रांत शुभ मुहूर्त (Shubh Muhurat) : मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेत स्नान करून दान केल्यानं चांगलं फळ मिळतं असं मानलं जातं. पंचांगनुसार यंदा मकर संक्रांत 14 जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी गंगा स्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी 9.03 पासून सुरू होईल आणि संध्याकाळी 5.46 पर्यंत असेल.

कोणत्या रंगाची साडी नेसावी (Color Saree) : देशभरात मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. या दिवशी काळ्या रंगाला आधिक महत्त्व आहे. शास्त्रानुसार मकर संक्रांतीला काळा रंग शुभ मानला जातो. मकर संक्रांतीला देवी ज्या रंगाच्या साडीमध्ये विराजमान होते, त्या रंगाची साडी संक्रांतीमध्ये नेसायची नसते. देवीने परिधान केलेल्या रंगाची साडी ही मकर संक्रांतीमध्ये इतरांनी नेसणं अशुभ मानलं जातं. यंदा महिला यंदा काळ्या रंगाच्या साडीसह हिरवी, लाल, गुलाबी, केशरी रंगांची साडी नेसू शकतात.

कोणत्या रंगाची साडी नेसू नये (Dont Miss Wearing this Color) : 2025 मध्ये मकर संक्रांतीला यंदा देवी पिवळ्या रंगाची साडी परिधान करुन येणार आहे. त्यामुळं यंदा पिवळ्या रंगांची साडी नेसायची नाही. त्याशिवाय मकर संक्रांतीला हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या घालाव्यात. मकर संक्रांतीला लाखेच्या बांगड्याला (लाखेचा चुडा) आधिक महत्त्व आहे. त्यामुळं यंदा नक्की हातात लाखेच्या बांगड्या किंवा लाखेचा चुडा घाला.

(टीप: सदरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे, 'ईटीव्ही भारत' यातील माहितीच्या सत्यतेचा दावा करत नाही.)

हेही वाचा -

  1. 2025 मध्ये कोणत्या राशीची संपणार साडेसाती? तर 'या' राशींना लागणार लॉटरी, वाचा वार्षिक राशीभविष्य
  2. यंदा मकर संक्रांत कधी?; जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि काळ्या रंगाचं महत्त्व

Last Updated : Jan 14, 2025, 3:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.