महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / spiritual

'मेष ते मीन' सर्व राशींसाठी दिवाळीचा आठवडा नेमका कसा जाणार? वाचा साप्ताहिक राशीभविष्य

मेष ते मीन राशींसाठी नेमका कसा असणार आहे दिवाळीचा आठवडा, जाणून घेण्यासाठी वाचा साप्ताहिक राशीभविष्य.

Weekly Horoscope
साप्ताहिक राशीभविष्य (File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 26, 2024, 11:01 PM IST

मेष (Aries) : हा आठवडा आपल्यासाठी सकारात्मक आणि यशस्वी असण्याची संभावना आहे. आपण जर नवीन नोकरीच्या शोधात असाल तर आपणास त्यात यश मिळू शकतं. व्यापारात सुद्धा आपणास अपेक्षित लाभ मिळेल. प्राप्तीचे नवीन मार्ग मिळून आपल्या आर्थिक स्थितीत सुद्धा सुधारणा होऊ शकते. ह्या आठवड्यात आपणास कुटुंबियांच्या सहवासात वेळ घालविण्याची संधी मिळेल. आपल्या मुलांना सुद्धा आपले विचार पटू शकतील. आपले प्रेमसंबंध प्रगल्भ होऊन आपणास सौख्य प्राप्ती होऊ शकते. आपण आणि आपल्या प्रेमिके दरम्यान जवळीक वाढू शकते. ह्या व्यतिरिक्त प्रेमिकेकडून आपणास एखादी मोठी भेटवस्तू सुद्धा मिळू शकते.

वृषभ (Taurus) : हा आठवडा आपणास मोठ्या जोशात घालवावा लागेल. कोणतेही कार्य घाईघाईत करू नये. दुखापत होण्याची शक्यता असल्यानं वाहन चालवताना काळजी घ्यावी. आपल्या लहान - सहान समस्या आणि व्यक्तिगत जीवनातील जवाबदाऱ्या असून सुद्धा आपल्या मित्रांचा सहवास आपणास आनंदित करेल. कार्यक्षेत्री लोकांच्या गोष्टींकडं लक्ष देण्याऐवजी आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावं. युवकांचा बहुतांश वेळ मस्ती करण्यात व्यतीत होईल. परीक्षा आणि स्पर्धेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मेहनत करूनच यश प्राप्त होईल. ह्या आठवड्यात आपणास आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. ऋतुजन्य विकार होण्याची संभावना आहे. प्रणयी जीवनात सावध राहावे. आपल्या प्रेमिकेची मानहानी होणार नाही याची काळजी घ्यावी.

मिथुन (Gemini) : या आठवड्यात आपणास समस्या आणि आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. हि आव्हाने आपले धाडस वाढविण्यासाठी असतील. कार्यक्षेत्री अतिरिक्त जवाबदारी येऊ शकते. एखाद्या मोठ्या योजनेत आर्थिक गुंतवणूक करताना तज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्यावा लागेल. नोकरी करणाऱ्या महिलांना घर व कार्यालय यांच्यात समन्वय साधण्यात अडचणी येऊ शकतात. व्यापाराच्यादृष्टीनं आठवड्याच्या सुरूवातीस काही समस्या निर्माण झाल्या तरी उत्तरार्धात गोष्टी आपल्या मनाप्रमाणं विकसित होतील. प्रणयी जीवनात मोठा निर्णय घेण्यापूर्वी आपल्या कुटुंबियांच्या भावनांचा विचार करावा, अन्यथा नंतर पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. प्रणयी जीवनात सावधपणे पाऊल उचलावे. आपल्या प्रेमिकेच्या भावना व अपेक्षा समजून घेण्याचा प्रयत्न करावा.

कर्क (Cancer) : या आठवड्यात आपणास आपल्या ध्येयास प्राधान्य द्यावे लागेल. आपणास काम पूर्ण करण्यासाठी स्वतःला समर्पित करावे लागेल, त्यास अनावश्यक विलंब किंवा अस्थायी स्थगिती देऊ नये. कार्यक्षेत्री आपण नेता बनण्याचा प्रयत्न करू नये. वरिष्ठ व कनिष्ठ यांच्या सहकार्याने काम केल्यास यश प्राप्ती होऊ शकते याची जाणीव ठेवावी. आठवड्याच्या उत्तरार्धात कार्यक्षेत्र, व्यापार व इतर क्षेत्रात चढ - उतार संभवतात. आपण जर खूप परिश्रम करत असाल व त्याचा परतावा कमी मिळत असेल तर आपण काहीसे निराश होण्याची संभावना आहे. परीक्षा व स्पर्धेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभ्यासात विशेष लक्ष लागणार नाही. प्रणयी जीवनात सहकार्याची भावना कमी असू शकते. वैवाहिक जोडीदाराशी सुद्धा समन्वय काहीसा कमी असू शकतो. आठवड्याच्या अखेरीस आपणास एखादा जवळचा किंवा दूरवरचा प्रवास करावा लागू शकतो. हा प्रवास आपल्यासाठी मनोरंजनात्मक व आरामदायी होऊ शकतो. प्रवासाचा आनंद घेऊन आपल्या प्रकृतीकडे लक्ष देण्यास त्याचा उपयोग करावा.

सिंह (Leo): हा आठवडा आपणास सुख, शांती व लाभ देणारा आहे. आपल्या प्रलंबित कामांना मित्र किंवा प्रतिष्ठित व्यक्तीच्या मदतीनं पूर्ण करण्यात आपण यशस्वी व्हाल. आपला व्यवसाय, विस्तार योजनेसह प्रगती करेल. आठवड्याच्या उत्तरार्धात सुख-सोयींशी संबंधित वस्तूंची खरेदी करताना आपणास खिश्याकडं लक्ष द्यावं लागेल. कार्यक्षेत्री आपल्या मान-सन्मानात वाढ होईल. वरिष्ठ आपल्या कामाची प्रशंसा करतील. आई-वडिलांचे सहकार्य आणि सौख्य प्राप्त होईल. कुटुंबात एखादे मंगल कार्य होण्याची संभावना आहे. हा आठवडा आरोग्याच्यादृष्टीनं सामान्यतः चांगला आहे. प्रणयी जीवनातील गैरसमज दूर होऊन नात्यात माधुर्य निर्माण होईल. आपण आपल्या प्रेमिकेच्या सहवासात सुखद क्षण घालवाल. वैवाहिक जोडीदाराशी उत्तम समन्वय साधू शकाल. आठवड्याच्या अखेरपर्यंत संततीकडून एखादी चांगली बातमी मिळू शकते.

कन्या (Virgo) : हा आठवडा आपल्यासाठी मिश्र फलदायी आहे. आठवड्याच्या सुरूवातीस कार्यक्षेत्री कामाचा भार जास्त असेल. त्याची पूर्तता करण्यासाठी आपणास आपले परिश्रम वाढवावे लागतील. आपणास आपल्या व्यवहारात व व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल घडवून आणावा लागेल. आपण जर असे करण्यात यशस्वी झालात तर आपली अवघडात अवघड कामे सुद्धा वेळेवर पूर्ण होऊ शकतील. आपणास कुटुंबाशी संबंधित एखादा मोठा निर्णय घेताना कुटुंबियांच्या भावना व अपेक्षा समजून घ्याव्या लागतील. प्रणयी संबंधात आपल्या प्रेमिकेच्या व्यक्तिगत जीवनात जरुरी पेक्षा जास्त हस्तक्षेप करणे टाळावे, अन्यथा संबंधात काहीशी कटुता येऊ शकते. दांपत्य जीवन सुखद होण्यासाठी आपणास जोडीदाराच्या गरजा समजून घ्याव्या लागतील. तसेच आपल्या व्यस्त कार्यक्रमातून त्यांच्यासाठी थोडा वेळ काढावा लागेल.

तूळ (Libra): आठवड्याच्या सुरूवातीस आपणास एखाद्या कामात मिळेलेले यश आपल्या आनंदास कारणीभूत ठरेल. आपणास कारकीर्द किंवा व्यवसायानिमित्त दूरवरचे प्रवास करण्याची संधी मिळेल. मित्रांचे विशेष सकारात्मक सहकार्य सुद्धा मिळेल. ह्या आठवड्यात आपल्या पसंतीच्या ठिकाणी बदली किंवा पदोन्नतीची इच्छा पूर्ण होऊ शकते. आठवड्याच्या उत्तरार्धात कोणत्याही योजनेत आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी विशेष काळजी घेऊन त्यात असलेली जोखीम नीट समजून घ्यावी. असे असले तरी सट्टा किंवा लॉटरी पासून दूर राहणे हितावह होईल. हा आठवडा प्रकृतीच्या दृष्टीने सामान्यच आहे. कुटुंबियांच्या सहवासात हसत-खेळत वेळ घालविण्याची संधी मिळेल. वैवाहिक जोडीदारासह अचानकपणे फिरावयास जाण्याचा बेत सुद्धा ठरू शकतो. प्रणयी जीवनात सावध राहावे. आपल्या प्रेमिकेच्या भावनांचा सन्मान करावा.

वृश्चिक (Scorpio) : हा आठवडा कामाच्यादृष्टीने आपल्यासाठी काहीसा आव्हानात्मक असू शकतो. आपणास जास्त धावपळ करावी लागू शकते. आठवड्याच्या उत्तरार्धा पर्यंत सर्व समस्या दूर होऊन आपणास अपेक्षित यश मिळेल. हा आठवडा कंत्राटावर काम करणाऱ्या व्यक्तींसाठी सुद्धा शुभ फलदायी आहे. कार्यक्षेत्री इतरांवर आपले विचार लादू नका. सहकाऱ्यांशी मिळून मिसळून कामे करावीत. अन्यथा आपणास समस्यांना सामोरे जावे लागून त्यात आपली प्रतिष्ठा सुद्धा मालिन होऊ शकते. ह्या आठवड्यात आपणास आपल्या प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी लागेल. बाहेरील पदार्थ खाणे टाळावे. आपली दिनचर्या योग्य ठेवून आहारावर विशेष प्रमाणात नियंत्रण ठेवावे. प्रणयी जीवनात कोणताही निर्णय घाईघाईत घेऊ नये. आपणास एकमेकांची गरज समजून भावनांचा आदर करण्यावर लक्ष द्यावे लागेल, अन्यथा समस्या निर्माण होऊ शकतात. दांपत्य जीवनातील गोडवा टिकून राहील.

धनु (Sagittarius) : या आठवड्यात आपणास आपल्या वेळेचे व आर्थिक गोष्टींचे योग्य नियोजन करावे लागेल. आपणास संभवित समस्या टाळण्यासाठी सतर्क राहावे लागेल. आपण जेव्हा घराच्या दुरुस्तीसाठी किंवा सुख - सोयींशी संबंधित वस्तूंची खरेदी कराल तेव्हा आपणास आपल्या खिश्याकडे लक्ष द्यावे लागेल, जेणे करून नंतर आपणास उधारी करावयास लागू नये. ह्या आठवड्यात आपण आपले मित्र व नातेवाईक ह्यांच्या सोबत राहावे. आपण जर घर किंवा जमिनीशी संबंधित वाद कोर्टाच्या बाहेर मिटवलात तर ते अति उत्तम होईल. पोटाचे विकार होण्याची संभावना असल्याने आपणास आहारावर नियंत्रण ठेवावे लागेल. आपल्या दिनचर्येतून थोडा वेळ योगासन व ध्यान - धारणेसाठी काढावा. ह्या आठवड्यात आपणास आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. वैवाहिक जोडीदाराशी प्रेम व सामंजस्य टिकवून ठेवावे. प्रणयी जीवनात एखाद्या तिसऱ्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे आपले मन व्यथित होऊ शकते. अशा वेळी वादा ऐवजी संवादाचा आधार घ्यावा.

मकर (Capricorn) : या आठवड्यात आपणास सावध राहून वाटचाल करावी लागेल. आपणास मोठे नुकसान होण्याची संभावना असल्याने आळस व बेपर्वाई टाळावी लागेल. आपल्या व्यवसायात तीव्र स्पर्धेस सामोरे जावे लागू शकते, तेव्हा आपल्या फायद्यासाठी इतरांचे नुकसान करू नये. आपणास आपल्या आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतील. जमीन, घर, वाहन इत्यादींची खरेदी करताना स्वकीयांचा सल्ला घेऊन संबंधित विषयावर विचारपूर्वक निर्णय घ्यावा. प्रेमीजनांना एखादी महिला मित्र मदत करू शकेल, मग त्याचा संबंध प्रणयी जीवनाशी असो किंवा कुटुंबाशी असो. आपणास सर्वाना बरोबर घेऊन वाटचाल करावी लागेल. आपल्या वाणीवर संयम ठेवावा. कटू शब्द टाळावेत. दांपत्य जीवनातील गोडवा टिकून राहील. कठीण प्रसंगी आपला जोडीदार आपल्या पाठीशी राहील. कुटुंबातील एखाद्या वयस्कर व्यक्तीच्या प्रकृतीची काळजी आपणास वाटू शकते, तेव्हा त्यांची काळजी घ्यावी.

कुंभ (Aquarius) :हा आठवडा आपल्यासाठी सामान्यच आहे. आपणास आपली कमकुवत बाजू शत्रू समोर उघड करणे टाळावे लागेल, अन्यथा ते त्याचा गैरफायदा घेऊ शकतात. ह्या आठवड्यात आपणास आपल्या मित्रांचे पूर्ण सहकार्य मिळेल. कुटुंबाशी संबंधित कोणताही मोठा निर्णय घेताना कुटुंबीय आपल्या पाठीशी राहतील. आठवड्याच्या पूर्वार्धा पेक्षा उत्तरार्ध थोडा चांगला असेल. आपला बहुतांश वेळ धार्मिक - सामाजिक कार्यात व्यतीत होऊन आपल्या मान - प्रतिष्ठेत वाढ होईल. आठवड्याच्या उत्तरार्धात व्यवसाया निमित्त दूरवरचा प्रवास संभवतो. हा प्रवास सुखद व लाभदायी होईल. प्रवासा दरम्यान एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीची ओळख संभवते, ज्याचा उपयोग भविष्यात एखादी लाभदायी योजना आखण्यात होऊ शकतो. प्रेम संबंध दृढ करण्यासाठी परस्पर समन्वय साधावा लागेल. वैवाहिक जीवन सुखद होईल. आपण आपल्या जोडीदाराच्या सहवासात सुखद क्षण घालवू शकाल.

मीन (Pisces) : या आठवड्यात एक पाऊल मागे जाऊन दोन पाऊले पुढे जाण्याची संधी संभवत असल्याने आपण कोणत्याही प्रकारचा संकोच बाळगू नये. ह्या आठवड्यात आपण जर आपली ऊर्जा व वेळ योग्य दिशेत नेलेत तर आपल्या कार्यात निश्चितच यशस्वी होऊ शकाल. आठवड्याच्या उत्तरार्धात एखाद्या प्रिय व्यक्तीच्या आगमनाने आपल्या घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. व्यवसायात आपण अपेक्षित लाभ मिळवू शकाल. परीक्षा व स्पर्धेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एखादी चांगली बातमी मिळू शकते. महिलांचा बहुतांश वेळ पूजा - पाठ किंवा धार्मिक प्रवृत्तीत व्यतीत होईल. प्रेम संबंध प्रगल्ल्भ होतील. आपणास प्रेमिकेच्या सहवासात सुखद क्षण घालविण्याची संधी मिळेल. आपल्या वैवाहिक जोडीदाराशी आपण उत्तम समन्वय साधू शकाल. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा सामान्यच आहे.

हेही वाचा -

  1. ठाण्यातील पर्यावरणभिमुख कंदील लागणार अमिताभ बच्चन, सलमान खानच्या दाराबाहेर
  2. यंदा कधी आहे दिवाळी; वसुबारसपासून ते भाऊबीजपर्यंत जाणून घ्या योग्य तिथी, शुभ मुहूर्त, तारीख
  3. लक्ष्मीपूजन केव्हा करावं? 31 ऑक्टोबर की 1 नोव्हेंबर? जाणून घ्या योग्य तारीख

ABOUT THE AUTHOR

...view details