महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

धनगर समाजाला आरक्षण मिळत नसल्यानं, यशवंत सेना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात... - Lok Sabha Election 2024 - LOK SABHA ELECTION 2024

Lok Sabha Election 2024 : धनगर समाजाच्या आरक्षणाच्या (Dhangar Reservation) मागणीसाठी नेहमी आक्रमक भूमिका घेत आंदोलन करणारी यशवंत सेना (Yashwant Sena) देखील लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे.

Dhangar Reservation
धनगर समाजाला आरक्षण

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 6, 2024, 10:05 PM IST

प्रतिक्रिया देताना बाळासाहेब दोडतले

बीड Lok Sabha Election 2024 :राज्यभरात आरक्षण मिळावे, या मागणीसाठी धनगर समाजाने विविध आंदोलनं केली होती. अनेक वेळा आंदोलनं, मोर्चे काढून देखील धनगर समाजाला आरक्षण (Dhangar Reservation) मिळत नसल्यानं, आता यशवंत सेनेनं लोकसभेच्या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. यशवंत सेनेचे बाळासाहेब दोडकले यांनी पत्रकार परिषद घेऊन लोकसभेच्या सहा उमेदवारांची यादी जाहीर केलीय.

15 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात: पहिल्या टप्प्यात एकूण सहा उमेदवार जाहीर झाले असून यामध्ये सोलापूर, माढा, रावेर, अहमदनगर, धुळे, आणि कोल्हापूर या मतदारसंघाचा समावेश आहे. तर या लोकसभेच्या निवडणुकीत एकूण 15 उमेदवार यशवंत सेनेच्या वतीनं निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात येणार आहेत.



निवडणुकीच्या रिंगणात उतरून सरकारला उत्तर देणार: यशवंत सेनेच्या वतीने संजय अण्णा क्षीरसागर यांना सोलापूरची उमेदवारी देण्यात आलीय. तर अण्णासाहेब रुपनर यांना माढा इथून उमेदवारी देण्यात आलीय. समाधान बाजीराव पाटील यांना रावेर येथील उमेदवारी देण्यात आलीय. तर अहिल्यानगर येथून गंगाधर कोळेकर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. धुळे येथून हिरालाल कन्नूर हे यशवंत सेनेचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. तर कोल्हापूरमधून जयसिंग आप्पा सुतार यांना उमेदवारी देण्यात आलीय. सध्याचे सरकार हे धनगर विरोधी सरकार असल्याची टीका बाळासाहेब दोडतले यांनी केलीय. तर निवडणुकीच्या रिंगणात उतरून सरकारला उत्तर देण्याचा निर्णय यशवंत सेनेने घेतला आहे.


ST प्रवर्गाच्या आरक्षणाचा फायदा :याआधीधनगर समाजाला आरक्षण मिळेलयासाठी नुसताच शब्द देण्यात आला होता. त्यानंतर २०१४ तसंच २०१९ च्या निवडणुका होऊन गेल्या. तरीही धनगर समाजाला ST प्रवर्गाच्या आरक्षणाचा फायदा मिळाला नाही. त्यामुळं येत्या निवडणुकीच्या आधी आमच्या हाती ST प्रमाणपत्र द्या. नाहीतर तुमच्या खुर्च्या रिकाम्या झाल्याशिवाय राहणार नाहीत, अशा संतप्त प्रतिक्रिया जालना येथील आयोजित धनगर समाजाच्या मोर्चात आलेल्या मोर्चेकऱ्यांनी दिली होती.

हेही वाचा -

  1. 'बडे लोग, बडी बाते' मतदारांना हेलिकॉप्टरने आणू म्हणणाऱ्यांची ईडी, सीबीआय चौकशी झाली पाहिजे - सुप्रिया सुळे - Supriya Sule on Hasan Mushrif
  2. सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत तणाव वाढला; काँग्रेसचा दावा असताना उबाठा गटाने उमेदवार दिल्यानं नाराजी, विश्वजित कदम विशाल पाटील संतप्त - Lok Sabha Election 2024
  3. शिवसेना ठाकरे गटाला बसणार मोठा धक्का; ...म्हणून मी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करतोय, माजी मंत्री बबन घोलप यांचा निर्णय - LOK SABHA ELECTION 2024

ABOUT THE AUTHOR

...view details