महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

विधानसभा निवडणूक 2024 : नाशिक शिक्षक मतदारसंघात विखे विरुद्ध कोल्हे संघर्ष होणार? - Nashik Teachers Constituency - NASHIK TEACHERS CONSTITUENCY

Vivek Kolhe VS Rajendra Vikhe : राज्यातील विधान परिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झालाय. दोन शिक्षक मतदारसंघ आणि दोन पदवीधर मतदारसंघात 26 जून रोजी मतदान होणार आहे.

Vivek Kolhe VS Rajendra Vikhe
राजेंद्र विखे पाटील आणि विवेक कोल्हे (Source ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 3, 2024, 1:10 PM IST

शिर्डी Vivek Kolhe VS Rajendra Vikhe :नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघात मोठ्या राजकीय घडामोडी बघायला मिळताय. काही दिवसांपूर्वीच भाजपा नेते विवेक कोल्हे यांनी शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी अपक्ष अर्ज दाखल केला होता. त्यानंतर आता भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू राजेंद्र विखे पाटीलही शिक्षक मतदासंघ निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. त्यामुळं ही लढत अत्यंत चुरशीची होणार आहे.

राजेंद्र विखे पाटील यांची प्रतिक्रिया (Source reporter)

राजकारणातील मातब्बर घराणं म्हणून विखे घराणं ओळखलं जातं. स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील हे खासदार होते. तर, त्यांचे पुत्र राधाकृष्ण विखे पाटील हे सध्याच्या युती सरकारमध्ये मंत्री आहेत. राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांनी 2019 मध्ये लोकसभा निवडणूक लढवली आणि ते पहिल्यांदा खासदार झाले. याही निवडणुकीत त्यांनी भाजपाकडून निवडणूक लढवली असून मंगळवारी याचा निकाल स्पष्ट होईल. तर आजपर्यंत राजकारणापासून दूर राहिलेले राजेंद्र विखे पाटील आता शिक्षक मतदार संघाची निवडणूक लढवणार आहेत. नाशिक पदवीधर निवडणुकीवेळी देखील राजेंद्र विखे पाटील उमेदवारी अर्ज भरणार असं बोललं जात होतं. मात्र, त्या निवडणुकीपासून ते लांबच राहिले.



विखे विरुद्ध कोल्हे सामना :गेल्या काही दिवसांपासून भाजपात असलेल्या विवेक कोल्हे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात राजकीय संघर्ष सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी विवेक कोल्हे यांनी नाशिक शिक्षक मतदार संघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर आता राजेंद्र विखे यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्यामुळं विधानपरिषद निवडणुकीतही आता विखे विरुद्ध कोल्हे असा संघर्ष बघायला मिळणार आहे.

हेही वाचा -

  1. लोकसभेत भाजपा-मनसे युती; विधान परिषद निवडणुकीत मात्र मनसेचं भाजपालाच आव्हान, कोकण पदवीधर मतदारसंघात रंगणार सामना - BJP vs MNS dispute
  2. शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून उमेदवारांची घोषणा; 'या' दोन नेत्यांना उमेदवारी - Vidhan Parishad Election 2024
  3. विधान परिषदेच्या चार जागांसाठी निवडणुका घोषित, लोकसभा निवडणुकीचा काय होणार परिणाम ? - legislative council election 2024

ABOUT THE AUTHOR

...view details