मुंबई- टीव्ही अभिनेता अमन जैस्वालचा शुक्रवारी मुंबईतील जोगेश्वरी भागात झालेल्या अपघातात मृत्यू झाला. केवळ वयाच्या २३ व्या वर्षी अभिनेत्याचा अपघाती मृत्यू झाल्यानं मनोरंजन क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे.
टीव्ही मालिका 'धरतीपुत्र नंदिनी'मध्ये अभिनेता अमन जैस्वालनं मुख्य भूमिका साकारली होती. मोटारसायकलवरून ऑडिशनसाठी जात असताना ट्रकनं त्याच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून अमनला बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालयात दाखल केलं. मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. अमन जैस्वाल हा उत्तर प्रदेशातील बलिया येथील रहिवासी होता. त्यानं करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. यानंतर त्यानं टीव्ही इंडस्ट्रीजमधून नवीन करियरला सुरुवात केली. त्यानं विविध मालिकांमध्ये सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारली होती. २०२३ मध्ये ‘धरतीपुत्र नंदिनी’ या टीव्ही मालिकेतील प्रमुख भूमिकेमुळे त्यानं खास प्रेक्षकवर्ग निर्माण केला.
- अभिनेता अमनच्या अकाली निधनानं त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. पोलिसांनी अपघातामधील ट्रक जप्त केला आहे. चालकाविरुद्ध बेदरकारपणे वाहन चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
Mumbai, Maharashtra | TV actor Aman Jaiswal dies in a road accident in the Jogeshwari West area. The incident happened at Hill Park Road at 3:15 pm. The accused, the driver of a truck dashed the victim (deceased) who was on a motorcycle. The victim was taken to the trauma ward of…
— ANI (@ANI) January 17, 2025
पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात- राज्यात शुक्रवारी पुणे जिल्ह्यातदेखील भीषण अपघात झाला. पुणे-नाशिक महामार्गावर टेम्पोनं मिनी व्हॅनला पाठीमागून धडक दिली. त्यामुळे मिनी व्हॅन रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एसटी बसवर जाऊन आदळल्यानं हा अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी टेम्पो चालक आणि बस चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अपघातानंतर फरार झालेल्या टेम्पो चालकाला पकडण्यातकरिता पोलिसांचा शोध सुरू आहे.
दोघांविरोधात गुन्हा दाखल- टेम्पोचा अज्ञात चालक आणि बसचालक भाऊसाहेब जायभाये यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. असे नारायणगाव पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यानं सांगितले. एसटी बस चालकानं धोकादायक पद्धतीनं वाहन उभे केल्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचं पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
हेही वाचा-