बुलडाणा Uddhav Thackray visits Buldhana : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे देखील मैदानात उतरले आहेत. ते आजपासून दोन दिवस बुलडाणा लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यात ते कार्यकर्त्यांशी संवाद साधत सभाही घेणार आहेत. यानंतर ते हिंगोली लोकसभा मतदार संघाचाही दौरा करणार होते, मात्र त्यांचा हा दौरा रद्द करण्यात आलाय.
उद्धव ठाकरे आजपासून बुलडाणा दौऱ्यावर; लोकसभा निवडणुकीचं फुंकणार रणशिंग
Uddhav Thackray visits Buldhana : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आजपासून दोन दिवस बुलडाण्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यात ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत सभाही घेणार आहेत.
Published : Feb 22, 2024, 11:11 AM IST
कसा असेल दौरा : शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे आजपासून दोन दिवस बुलडाण्यात आसणार आहेत. त्यांच्या जिल्ह्यात सहा सभा होणार आहेत. आज उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगर इथं विमानानं येणार आहेत. त्यानंतर तिथून ते चिखली इथं राजा टॉवर परिसरात सभा घेणार आहेत. यानंतर दुपारी तीन वाजता ते मोताळ्यातील मलकापूर रोडवरील बुलडाणा अर्बन जवळ जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. तर सायंकाळी जळगाव जामोद शहरात श्रीपाद कृष्ण कोलाटकर महाविद्यालयात ते सभा घेऊन शेगाव इथं मुक्कामी जाणार आहेत. तसंच शुक्रवारी 23 फेब्रुवारी रोजी सकाळी श्री गजानन महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेऊन खामगाव इथं कार्यकर्ता मेळाव्याला ते संबोधित करणार आहेत. नंतर दुपारी मेहकर शहरात स्वतंत्र मैदानावर त्यांची जाहीर सभा होणार आहे. या दौऱ्यात त्यांच्यासोबत खासदार संजय राऊत, विनायक राऊत, अरविंद सावंत, शिवसेना सचिव वरुण सरदेसाई उपस्थित राहणार आहेत.
उद्धव ठाकरे स्वतः मैदानात :आगामी लोकसभा निवडणुका काही दिवसांवर आल्यानं सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. ठाकरे गटाकडूनही लोकसभेची तयारी सुरु आहे. मात्र, शिवसेनेत झालेल्या बंडखोरीमुळं उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही निवडणूक सोपी नसणार आहे. त्यामुळं आता स्वतः उद्धव ठाकरेच मैदानात उतरल्याचं पाहायला मिळतंय. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे हे वेगवेगळ्या लोकसभा मतदार संघाचा दौरा करत पक्षाचा आढावा घेत आहेत. तसंच वेगवेगळ्या ठिकाणी सभाही घेत आहेत.
हेही वाचा :