मुंबई Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी ऐन रंगात आली आहे. तसंच याच पार्श्वभूमीवर घेण्यात येत असलेल्या प्रचारसभेत सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांवर तर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर आरोप-प्रत्यारोप केले जाताय. असं असतानाच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीवेळी उद्धव ठाकरेंबाबत एक नवा गौप्यस्फोट केलाय. त्यामुळं राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? : एका मुलाखतीत बोलत असताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "1999 पासूनच उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पडू लागली होती. त्यांना तेव्हापासून आपण मुख्यमंत्री व्हावं असं वाटत होतं. म्हणून त्यांनी अपक्ष आमदारांच्या मागण्यांकडं दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली. दरम्यानच्या काळात नारायण राणे पुन्हा मुख्यमंत्री होतील असं ठाकरेंना वाटलं. त्यामुळं त्यांनी नारायण राणेंना रोखण्याचं काम केलं. जनहितापेक्षा त्यांना पद महत्त्वाचं वाटत होतं", असा मोठा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीसांनी केलाय.