महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

'बडे लोग, बडी बाते' मतदारांना हेलिकॉप्टरने आणू म्हणणाऱ्यांची ईडी, सीबीआय चौकशी झाली पाहिजे - सुप्रिया सुळे - Supriya Sule on Hasan Mushrif - SUPRIYA SULE ON HASAN MUSHRIF

Supriya Sule Criticized Hasan Mushrif : मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी मतदारांना हेलिकॉप्टरनं आणू, असं वक्तव्य केलं होतं. हे म्हणजे "बडे लोग, बडी बाते" असं म्हणत शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मुश्रीफांचा समाचार घेतलाय.

Supriya Sule reaction on Hasan Mushrif helicopter statement
हसन मुश्रीफ आणि सुप्रिया सुळे

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 6, 2024, 7:59 PM IST

शरद पवार गटाचे खासदार सुप्रिया सुळे

पुणे Supriya Sule Criticized Hasan Mushrif : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे या प्रचारासाठी मैदानात उतरल्या आहेत. त्या अनेक ठिकाणी जाऊन नागरिकांच्या भेटी घेत असल्याचं पाहायला मिळतंय. आज (6 एप्रिल) बारामती लोकसभा मतदार संघातील पिंपरी चिंचवडमधील ताथवडे भागात त्या प्रचारासाठी आल्या होत्या. यावेळी नागरिकांशी विविध मुद्द्यांवर चर्चा केल्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळ? : कोल्हापूरचे पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मतदारांना हेलिकॉप्टरनं आणू, असं वक्तव्य केलं होतं. यावरुन टीका करत त्या म्हणाल्या की, "हसन मुश्रीफ यांच्याकडं इतके पैसे आले कुठून की ते मतदार हेलिकॉप्टरमध्ये आणू असं म्हणताय. याविषयी ईडी, सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करेन." तसंच आमचे विरोधक श्रीमंत आहेत, त्यामुळं 'बडे लोग, बडी बाते', असं सुळे म्हणाल्या.

देवेंद्र फडणवीसांच्या टीकेलाही दिलं उत्तर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'ही लढाई पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी आहे' असं म्हटलं होतं. यावरुन 'ते माझं मत नाही, तर ते मत त्यांचं आहे. विकास कामांवरुन लढाई लढावी असं माझं मत आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. तर भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांना संपवायचंय असं वक्तव्य केलं होतं. यासंदर्भात विचारण्यात आलं असताना सुळे म्हणाल्या की, "ही लढाई कुणाची आहे हे जाहीर दिसतंय. कारस्थान करायचं, सुडाचं राजकारण करायचं ही भाजपाची नीती आहे."

काय म्हणाले होते हसन मुश्रीफ : शुक्रवारी (5 एप्रिल) कागलमध्ये महायुतीचा मेळावा पार पडला. यावेळी बोलत असताना हसन मुश्रीफ म्हणाले होते की, "कागलमधील महायुतीच्या तिन्ही गटांनी एकत्र येऊन मताधिक्य मिळवलं, तर साक्षात परमेश्वर जरी आला तरी संजय मंडलिक यांचा पराभव होऊ शकत नाही. तसंच गरज पडली तर मतदारांना हेलिकॉप्टरनं आणू", असं हसन मुश्रीफ म्हणाले होते.

हेही वाचा -

  1. "बारामतीची लढाई ही शरद पवार, अजित पवारांची नाही, तर..."; बारामतीबाबत काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? - Devendra Fadnvis
  2. "मी रविंद्र धंगेकरांचं दिल्लीला जायचं तिकीट बुक करून ठेवलंय"- सुप्रिया सुळे - SUPRIYA SULE pune news
  3. Vanchit Support Supriya Sule : वंचितचा सुप्रिया सुळेंना पाठिंबा; सुळेंनी मानले आभार - Lok Sabha Elections

ABOUT THE AUTHOR

...view details