मुंबई - साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील एके काळचा अतिशय लोकप्रिय दिग्दर्शक आणि आपल्या सडेतोड भूमिकेमुळे नेहमी चर्चेत राहणारा दिग्दर्शक राम गोपाल वर्मानं काही स्फोटकं पोस्ट लिहिल्या आहेत. त्यानं अलीकडे रिलीज झालेल्या राम चरणच्या 'गेम चेंजर' चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या आकड्यावर संशय व्यक्त केला आहे. हे आकडे प्रेक्षकांची दिशाभूल करणारे असल्याचा दावाही त्यानं आपल्या पोस्टमधून केला आहे.
राम गोपाल वर्मानं त्याच्या एक्स हँडलवर लिहिलेल्या तीन पोस्ट सध्या खूप चर्चेत आहेत. सर्वात पहिल्यांदा त्यानं आपल्या पोस्टमध्ये साऊथचे दोन प्रतिभावान दिग्दर्शक एसएस राजामौली आणि सुकुमार यांचं कोतुक केलंय. या लोकांनी साऊथ फिल्म इंडस्ट्रीला एका उंचीवर पोहोचवल्याचं म्हटलंय. परंतु अलीकडे रिलीज झालेल्या 'गेम चेंजर'च्या बॉक्स ऑफिस आकड्यावर संशय व्यक्त केलाय.
If @ssrajamouli and @SukumarWritings sky rocketed telugu cinema in real time collections into a fantastically stratospheric heights thereby sending legitimate shock waves into Bollywood, the people behind G C succeeded in proving that the south is much more FANTASTIC in being a…
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) January 13, 2025
राम गोपाल वर्मानं आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय, "एसएस राजामौली आणि सुकुमार यांनी तेलुगू चित्रपटसृष्टीतील रिअल टाइम कलेक्शनला एका विलक्षण स्ट्रॅटोस्फेरिक उंचीवर नेलं आणि त्यामुळं बॉलिवूडमध्ये धक्कादायक लाटा निर्माण झाल्या. तर गेम चेंजरच्या मागे असलेले लोक हे सिद्ध करण्यात यशस्वी झाले की दक्षिणेकडील चित्रपट फसवणूक करण्यात खूपच तरबेज आहेत."
'गेम चेंजर'च्या या आकड्यांच्या धूळफेकीमुळे सबंध साऊथ फिल्म इंडस्ट्रीनं यापूर्वी रचलेले विक्रम संशयाच्या भोवऱ्यात असल्याचा भास होतो, असं म्हणताना रामून पुढं लिहिलंय, "बाहुबली, आरआरआर, केजीएफ, कंतारा इत्यादींमुळे दक्षिणेकडील असाधारण कामगिरीला कमी लेखण्याच्या या अत्यंत अपमानजनक अपमानामागं कोण आहे हे मला खरोखर माहित नाही आणि गेम चेंजरच्या दाव्यांमुळे त्यांच्या सर्व कामगिरी आता संशयाच्या भोवऱ्यात सापडतील.."
If G C costed some 450 cr then RRR in its extraordinary never before seen visual appeal should have costed 4500 cr and if G C film’s first day collections are 186 cr on day 1 , then PUSHPA 2 collections should have been 1,860 cr ..The point is that the fundamental requirement of…
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) January 13, 2025
'गेम चेंजर'ची आकडेवारी मोठी दाखवण्याच्या या प्रयत्नांच्या मागे कोण आहे याबद्दल शंका व्यक्त करताना राम गोपाल वर्मानं निर्माता दिल राजूंवर विश्वास असल्याचं म्हटलंय. ते यामागे नसतील असंही त्यानं म्हटलंय, "या न पटणाऱ्या भोळ्या असत्याच्या मागं कोण आहे हे मला माहित नाही, परंतु ते निश्चितपणे निर्माता दिल राजू असू शकत नाही कारण तो एक खरोखरच वास्तववादी आहे आणि तो अशा प्रकारच्या फसवणुकीसाठी अक्षम आहे."
'गेम चेंजर' चित्रपटानं रिलीजच्या पहिल्या दिवशा 186 कोटी कमाई केल्याची सध्या चर्चा आहे. तशा बातम्याही झळकल्या आहेत. या चित्रपटाच्या निर्मितीला 450 कोटी खर्च केल्याचा दावाही काही ठिकाणी प्रसिद्ध झालाय. याबद्दलही राम गोपाल वर्मानं उपोराधानं म्हटलंय की, "जर गेम चेंजरला सुमारे 450 कोटी रुपये खर्च आले असतील तर आरआरआर मधील दृष्ये पाहिल्यास त्यांनी 4500 कोटी रुपये खर्च करायला हवे होते आणि जर गेम चेंजर चित्रपटाच्या पहिल्या दिवसाचं कलेक्शन जर १८६ कोटी रुपये होते, तर पुष्पा २ चं कलेक्शन १,८६० कोटी रुपये असायला हवं होतं.. मुद्दा असा आहे की सत्याची मूलभूत आवश्यकता अशी आहे की ते विश्वासार्ह वाटलं पाहिजे आणि गेम चेंजरच्या संदर्भात खोटं बोलणं अधिक विश्वासार्ह वाटलं पाहिजे."
I loved PUSHPA 2 but now after seeing G C I want to fall on the feet of @alluarjun and @SukumarWritings 🙏🙏🙏
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) January 13, 2025
अखेर राम गोपाल वर्मानं 'पुष्पा'चे दिग्दर्शक सुकुमार आणि 'आरआरआर', 'बाहुबली'चे दिग्दर्शक एसएस राजामौली ग्रेट असल्याचं म्हटलंय. यापूर्वीही त्यानं 'पुष्पा' चित्रपटाचं आणि त्यातील अल्लू अर्जुनच्या कामाचं कौतुक केलं होतं. सध्या 'गेम चेंजर'ची हवा निर्माण झाली असताना या दोन्हींची तुलना करताना राम गोपाल वर्मानं पुन्हा उपरोधिक टोला मारताना म्हटलं की, "मला पुष्पा 2 आवडला पण गेम चेंजर पाहून वाटतं की मला अल्लू अर्जुन आणि सुकुमारच्या पाया पडायला पाहिजे."