महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

माझ्यावर झालेल्या संस्कारामुळं... ; सुप्रिया सुळे-सुनेत्रा पवारांच्या गळाभेटीबाबत सुळे यांची प्रतिक्रिया - सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे

Supriya Sule On Sunetra Pawar Meet : महाशिवरात्रीनिमित्त जळोची काळेश्वर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या नणंद-भावजय म्हणजे सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांची पुन्हा एकदा गळाभेट झालीय. याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिलीय.

Supriya Sule On Sunetra Pawar Meet
खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 9, 2024, 4:57 PM IST

प्रतिक्रिया देताना खासदार सुप्रिया सुळे

पुणे Supriya Sule On Sunetra Pawar Meet :राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार गट (Sharad pawar Group) आणि अजित पवार गट (Ajit Pawar Group) असे दोन स्वतंत्र गट निर्माण झाल्यानंतर, बारामती लोकसभा मतदार संघामधून खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या संभाव्य उमेदवार असल्याचं मानलं जातय. या पार्श्वभूमीवर दोन्ही गटाकडून लोकसभेच्या प्रचाराला सुरुवात झालीय.

भेटीमुळं राजकीय चर्चा रंगली : एकमेकांविरुद्ध लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत असलेल्या सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांची शुक्रवारी महाशिवरात्रीनिमित्त, बारामती तालुक्यातील जळोची काळेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेल्या असता भेट झाली. दोघी समोरा-समोरा आल्या आणि त्यांनी हसत गळाभेट घेतली. यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या.


सुनेत्रा पवार या माझ्या वहिनी : याबाबत खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सुनेत्रा पवार या माझ्या मोठ्या भावाची बायको आहे. माझ्या वहिनी आहेत. त्या माझ्यावर झालेल्या संस्कारामुळं माझ्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या माणसाला जेव्हा आपण भेटतो. तेव्हा त्यांचा मान सन्मान हा केलाच पाहिजे. माझ्यावर माझ्या आईने जे संस्कार केले आहेत त्या रीतीनेच मी वागणार अशी प्रतिक्रिया व्यक्त केलीय.



निवडणुका ताकदीनं लढवणार : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढवणार का? या प्रश्नावर बोलताना सुळे म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी ग्रामपंचायत पासून लोकसभेपर्यंत येणाऱ्या सर्व निवडणुका आम्ही पूर्ण ताकदीनं लढवणार आहोत. ग्रामपंचायत पंचायत, समिती, जिल्हा परिषद या निवडणुका कशा लढवायच्या ते आमचे वरिष्ठ ठरवतील. विधानसभा आणि लोकसभा याच्यात महाविकास आघाडी पूर्ण ताकदीनं लढणार आहे.


हेही वाचा -

  1. 'शरद पवारांसारख्या मोठ्या नेत्यानं साध्या आमदाराला धमकी दिली असेल तर...'; फडणवीसांचा पवारांना खोचक टोला
  2. सुधा मूर्ती यांना राज्यसभेचे खासदार म्हणून नामांकन, पंतप्रधान मोदी यांनी केलं अभिनंदन
  3. "गल्लीतील नेत्यानं...", नितीन गडकरींना उद्धव ठाकरेंनी दिलेल्या ऑफरवर फडणवीसांचं उत्तर

ABOUT THE AUTHOR

...view details