पुणे Sunil Shelke Vs Supriya Sule : पुण्यात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत निधी वाटपावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांच्यात खडाजंगी पाहायला मिळाली. या बैठकीला शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, अजित पवार यांच्यासह अनेक आमदार, खासदार उपस्थित होते.
विधानभवनात बोलताना खासदार सुप्रिया सुळे (ETV BHARAT Reporter) सुप्रिया सुळे आणि सुनील शेळके यांच्यात वाद : पुण्यात विधानभवनात अजित पवार यांच्या अध्यक्षेखाली बैठक पार पडली. बैठकीत सुप्रिया सुळे यांनी मावळला सर्वाधिक निधी का दिला जातो? अशी भूमिका मांडली. यावर ''ताई आमच्या मतदारसंघाचा उल्लेख सारखा सारखा का करता. ज्यावेळी बारामतीसाठी मोठा निधी मिळत होता, त्यावेळी आम्ही बारामती, बारामती केले का?'' असा सवाल सुनील शेळके यांनी केला. त्यामुळं दोन्ही नेत्यांमध्ये वाद झाला.
काका-पुतणे आमने-सामने : पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अजित पवार आमने सामने आले. यापूर्वी महाविकास आघाडी सरकार असताना शरद पवारांनी अचानक डीपीडीसी बैठकीला हजेरी लावली होती. राष्ट्रवादीमध्ये मोठी फूट पडल्यानंतर आता पुन्हा एकदा शरद पवार आणि अजित पवार हे आमने सामने आले.
बारामतीत दूषित पाणी येतं : बारामतीत पाणी दूषित येत असून, त्याबाबत कार्यवाही करा, अशी मागणी शरद पवार यांनी केली. यावर अजित पवार म्हणाले की, "बारामती परिसरात काही कारखाने हे प्रदूषण करत आहेत. त्या संदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळला नोटीसा पाठवायला सांगितल्या आहेत. कारखाने बंद केले तर शेतकऱ्यांना अडचण होईल."
हेही वाचा -
- अखेर आमदार अपात्रतेचा महानिकाल लागला! शिंदेंसह ठाकरे गटाचे सर्व आमदार पात्र; खरी शिवसेनाही एकनाथ शिंदेंकडेच
- Monsoon Session of Legislature विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ ते 25 ऑगस्टपर्यंत
- बाहेर वाघाची डरकाळी, विधान परिषदेत मात्र गिळले मूग; कुठे गेला 'ठाकरी बाणा'? - Uddhav Thackeray in Vidhan Parishad