महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

अनोखी तडजोड; चेंबूरमध्ये शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकाच शाखेत एकत्र बसणार - ठाकरे गट

Shivsena Branch Issue : शिवसेनेच्या फुटी नंतर शिवसेना पक्ष शिंदे गटाकडे सोपवण्यात आला तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख झाले आहेत. (Thackeray Group) त्यानंतर या दोन्ही गटांकडून शिवसेनेच्या शाखांवर हक्क सांगण्यात आला. (Shinde Group) मात्र, बऱ्याच संघर्षानंतर आता दोन्ही गटाचे कार्यकर्ते चेंबूरच्या शाखेत मात्र एकत्र बसताना पाहायला मिळणार आहेत. (Politics)

Shivsena Branch Issue
शिंदे विरुद्ध ठाकरे

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 20, 2024, 7:22 PM IST

मुंबई Shivsena Branch Issue :शिवसेनेच्या फुटीनंतर शिवसेनेच्या संपत्तीबाबत आणि शाखांच्या मालकीबाबत सातत्यानं वाद सुरू राहिला आहे. (Maharashtra Politics) मुंबईतील चेंबूर येथील शाखेबाबतही शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गट सातत्यानं भिडताना पाहायला मिळालं. (India Politics) शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते तुकाराम काते यांच्या अधिपत्याखाली शाखा चालवत होते. (Thackeray Shinde Group Controversy) शिवसेनेचे दोन गटात विभाजन होण्यापूर्वी शिवसेनेचे दोन नगरसेवक म्हणजेच मंगला काते आणि स्वतः तुकाराम काते या शाखेमधून कारभार पाहात होते. या शाखेचा वाद मात्र कायम राहिला. परंतु, रस्ता रुंदीकरणात ही शाखा गेल्यानंतर शिवसेना शाखा मंगला काते यांच्या कार्यालयात सुरू करण्यात आली.

तरी बैठका एकाच कार्यालयात :17 महिन्यांपूर्वी शिंदे गटाची शाखा दुसरीकडे सुरू करण्यात आली होती. आता जरी शिवसेनेत दोन गट पडले असले तरी आम्ही आमच्या बैठका येथेच घेऊ असे प्रभाग क्रमांक 146 चे शाखाप्रमुख अक्षय रूपवते यांनी सांगितले. ते शिंदे गटाचे कार्यकर्ते आहेत. हे कार्यालय आमच्याच मालकीचं होतं आणि ते आमच्याच मालकीचं राहील. ते शिंदे गटात गेल्यानंतर पोलीस आणि म्हाडा यांनी गैरवापर करून ही जागा बळकवण्याचा प्रयत्न केला; मात्र आम्ही हे होऊ दिलं नाही असं ठाकरे गटाचे विभाग प्रमुख प्रमोद शिंदे यांनी सांगितलं.

आता एकाच शाखेत कारभार :सततच्या संघर्षानंतर आणि भांडणानंतर दोन्ही गटाचे नेते समोरासमोर येत राहिले. शिंदे गटाचे नेते आणि ठाकरे गटाचे विभाग प्रमुख प्रमोद शिंदे यासह शिवसैनिकांनी टाळे लावल्याने अनेक दिवस ही शाखा बंद होती. मात्र, शिंदे गटाच्या वतीनं आताही शाखा दुरुस्त करण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर प्रमोद शिंदे आणि शिवसैनिक तिथे पोहोचले. यामुळे वाद निर्माण झाला. हा वाद मिटवण्यासाठी मोठा फौजफाटा घेऊन पोलीस आले होते. अखेर दोन्ही गटांनी सामंजस्याची भूमिका घेत तोडगा काढला आहे. आता या शाखेचे दोन भाग केले जाणार आहेत. शाखा मध्यभागी लागू नये यासाठी दोन भाग केले जाणार असून एका भागात शिवसेना शिंदे गटाचे तर दुसऱ्या भागात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते बसणार आहेत. त्यामुळे पहिल्यांदाच शिवसेनेच्या दोन्ही गटांचे कार्यकर्ते एकाच शाखेत बसताना पाहायला मिळणार आहेत.

हेही वाचा:

  1. राम जन्मभूमीचा वाद कोणामुळं सुरू झाला? वादग्रस्त जागेभोवती कुंपण कोणी अन् का लावलं?; जाणून घ्या A टू Z इतिहास
  2. विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्नानं अखेर त्यांच्या साखरपुड्याच्या अफवांवर दिली प्रतिक्रिया
  3. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा पाचवा दिवस; आज कोणती पूजा होणार?

ABOUT THE AUTHOR

...view details