मुंबई : विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारनं अनेक योजनांची घोषणा केली होती. त्यात महत्त्वाची आणि महायुतीसाठी गेमचेंजर ठरलेली योजना म्हणजे 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना'. या योजनेमुळे महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, ही योजना ऐतिहासिक आणि क्रांतिकारी ठरत आहे. या योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद महाराष्ट्रात मिळत आहे. आता या योजनेबाबत एक आनंदाची आणि दिलासादायक बातमी लाडक्या बहिणींसाठी येत आहे.
किती कोटी लाभार्थी महिला? : महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर डिसेंबर महिन्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेतील पहिला हप्ता महिलांच्या खात्यात जमा झाला होता. यानंतर जानेवारी महिन्यातील अखेरचा आठवडा आला. परंतु, या महिन्यातील हप्ता कधी येणार? याकडे लाडक्या बहिणी आस लावून बसल्या होत्या. 24 जानेवारीपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे यायला सुरुवात झाली आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' जानेवारी 2025 महिन्याचा सन्मान निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. 24 जानेवारी 2025 पर्यंत 1.10 कोटी लाभार्थी महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा झाला असून, 26 जानेवारीपर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा होणार आहे. अशी पोस्ट सोशल मीडियावर अदिती तटकरे यांनी केली आहे.
2,100 रुपये कधी येणार? : एकीकडं महायुती सरकार पुन्हा एकदा सत्तेत आलं आहे. परंतु, विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीनं जर आम्ही सत्तेत आलो तर, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये देऊ, असे आश्वासन दिले होते. तसेच महायुतीनं आपल्या जाहीरनाम्यात ही 2,100 रुपये लाडक्या बहिणींना देऊ असं नमूद केलं होतं. मात्र, आता महायुती सरकार सतत आल्यानंतर दोन महिने झाले. तर दुसरीकडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील दोन हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेत. परंतु, जे सरकारने 2100 रुपयाचे आश्वासन दिलं होतं. त्या 2100 रुपयाचा हप्ता कधी देणार? असा लाडक्या बहिंणी सवाल करत आहेत. "दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. या योजनेसाठी पात्र असलेल्या बहिणींना यातून कुणीही वगळणार नाही, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. तसेच या योजनेतील अपात्र महिलांकडून वसुली करणार नसल्याचं सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे".
हेही वाचा :