महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

मोहन भागवत-योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा, लोकसभेतील खराब कामगिरीनंतर काय होणार बदल? - Yogi Adityanath meet Mohan Bhagwat - YOGI ADITYANATH MEET MOHAN BHAGWAT

Yogi Adityanath meet Mohan Bhagwat : लोकसभा निवडणूक 2024 च्या निकालानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यात शनिवारी भेट झालीय. उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्या खराब कामगिरीनंतर ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.

Yogi Adityanath meet Mohan Bhagwat
Yogi Adityanath meet Mohan Bhagwat (Source- ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 16, 2024, 1:26 PM IST

Yogi Adityanath meet Mohan Bhagwat :2024 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाच्या खराब कामगिरीनंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा सुरू आहेत. दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी गोरखपूरमध्ये बंद दाराआड चर्चा केल्याची माहिती समोर आलीय.

मिळालेल्या माहितीनुसार, योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी दुपारी कॅम्पियरगंज भागातील एका शाळेत मोहन भागवत यांची पहिल्यांदा भेट घेतली. संघाच्या एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मोहन भागवत येथे आले होते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि मोहन भागवत यांच्यातील दुसरी बैठक पक्कीबाग परिसरातील सरस्वती शिशु मंदिरात रात्री साडेआठ वाजता झाली.

भेटीमुळं चर्चांना उधाण : यूपीमध्ये भाजपाच्या दारुण पराभवानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना याचा फटका सहन करावा लागू शकतो, अशी चर्चा जोर धरू लागली होती. त्यांच्याबाबत भाजप हायकमांड मोठा निर्णय घेऊ शकतं, असंही बोललं जात होतं. मात्र, मुख्यमंत्री योगी यांची सध्याची प्रतिमा पाहता एवढा मोठा निर्णय घेणं भाजपासाठी कठीण मानलं जात आहे. त्याचवेळी निवडणुकीच्या काळात भाजपापासून दूर राहिल्यानंतर मोहन भागवत यांनी अचानक गोरखपूर गाठणं आणि सीएम योगींची भेट घेण्याचा निर्णय घेणं यामुळं अनेकांच्या भुवयादेखील उंचावल्या आहेत.

उत्तर प्रदेशात भाजपला अपयश : मिळालेल्या माहितीनुसार, मोहन भागवत यांनी उत्तर प्रदेशातील पराभवामागील मुख्य कारणांवर आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केली. याच कारणावरून या दोन्ही बैठका झाल्या असण्याची शक्यता आहे. यूपीमध्ये भाजपा सर्वात मजबूत स्थितीत असल्याचं दिसत होतं. परंतु निकाल त्याच्या उलट लागले. येथील 80 जागांपैकी भाजपला केवळ 33 जागा मिळाल्या. तर 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं पक्षानं 71 जागा, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 62 जागा जिंकल्या होत्या. यूपीमध्ये इंडिया अलायन्सनं 43 जागा जिंकल्या आहेत. यापैकी समाजवादी पक्षानं 37 तर काँग्रेसनं 6 जागा जिंकल्या आहेत.

मोहन भागवत भाजपवर नाराज : उत्तर प्रदेशात सर्वात धक्कादायक निकाल अयोध्या लोकसभा मतदारसंघाचे होते. अयोध्या राम मंदिराच्या आधारे भाजपला संपूर्ण देशात चांगले निकाल अपेक्षित होते. परंतु यूपीमध्येच भाजपला मोठ अपयश मिळालं. इतकंच नाही तर अयोध्या राम मंदिर ज्या फैजाबादमध्ये येतं त्या जागेवरही भाजपला विजय मिळवता आलं नाही. लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर संघसंचालक मोहन भागवत यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी नुकतेच म्हटले, " मणिपूर गेल्या एक वर्षापासून शांततेची वाट पाहत आहे. 10 वर्षांपूर्वी राज्यात शांतता होती. पण राज्यात अचानक हिंसाचार पाहायला मिळाला. यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य रतन शारदा यांनीही आरएसएसचं मुखपत्र ऑर्गनायझरमधून भाजपावर निशाणा साधला होता.

हेही वाचा

  1. "बाप बाप होता है!" सिंधुदुर्गनंतर आता रत्नागिरीतही बॅनर वॉर, उदय सामंत यांच्या गावात लागले भाजपाचे बॅनर - BJP Banner War
  2. मंत्री झाल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांचे घरात कसे स्वागत झाले? म्हणाले,"बापाच्या कुशीत शिरताना लेकींना..." - Purandar Airport
  3. भाजपाची 'जैसी करणी वैसी भरणी', विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची टीका - Ambadas Danve Criticizes BJP

ABOUT THE AUTHOR

...view details